Posts

Showing posts from October, 2025

शिरकावागो - युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज

Image
  शनिवार २५,१०,२०२५ - शिरकावागो आणि कामिकोची दोन दिवसाची ट्रिपसाठी आम्ही शनिवार सकाळी ६ वाजता घर सोडले. श्रेयसच्या ऑफिसमधील जपानी मित्र स्वतःची गाडी घेऊन आला होता. वाटेत उंच पर्वत, धरण, नदी आणि सरोवर, तळी पाहत डोंगराळ भागातून बरीच बोगद्यातून निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत आम्ही दुपारी तीन वाजता शिरकावागो या ठिकाणी येऊन पोचलो.  अधेमधे हायवेय वर ब्रेक घेत नाश्ता, चहा, चाऊ माऊ पदार्थ खानपान सुरु होते.  शिरकावागो हे पर्वतातील एक विरळ वस्तीचे खेडेगाव. या भागात २०० वर्षांपूर्वीची गवताची घरे पाहायला मिळतात. त्याकाळचे जापनीज घर कसे असायचे कळते.  लाकूड आणि गवताचा वापर.. घराचा आकार त्रिकोनी - घराची रचना - gassho zukuri या पद्धतीची.. येथे शेतकरी, छोटे कारागीर, व्यापारी - नॉन सामुराई कोम्मुनिटीचे लोक राहत असत. घराभोवती फुल,फळांची बाग, हॉटेल्स, संग्रहालय, शॉपिंग.. याची सोय आहे.   आता हे टुरिस्ट स्पॉट आहे. १९९५ साली युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज स्थान म्हणून घोषणा केली आहे.  येथे एक डोंगरावरून संबंध गावाचे दर्शन होते. हे एक निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळ आहे.  हे संध्याक...

कावासाकी प्लाझा येथे "जपम" कार्यक्रम

  १८.१०.२०२५ - कावासाकी प्लाझा येथे "जपम" कार्यक्रम आयोजित केला होता. याठिकाणी जपानमधील सारे भारतीय एकत्र येऊन श्री विष्णू सहस्त्रनाम पठण करतात.  श्रेयस आधीपासून जात होता. हे ठिकाण श्रेयसच्या घरापासून साधारण दोन किलोमीटर वर आहे.  आम्ही संध्याकाळी चार वाजता कार्यक्रम स्थळी पोचलो.  गणपती, श्री व्यंकोबा, लक्ष्मी यांची पूजा झाल्यावर श्री विष्णू सहस्त्रनाम सामूहिक पठण झाले. यानंतर भक्तांनी गायनसेवा सुरु केली.  एकानी तामीळमधून कथा सांगितली. मला सारे डोक्यावरून गेले. कथा सुंदर २० मिनिटे कथन केली. काही स्रोते पठण केली गेली शेवटी आरती झाली आरतीनंतर सारी भक्तांनी कुटुंबासह फुले अर्पण करून नमस्कार केला. ऑक्टोबरमध्ये ज्या भक्तांचे वाढदिवस असतात त्यांना शुभेच्छा दिल्या. काही धार्मिक घटना अगर कार्यक्रमाबाबत सूचना दिल्या. महाप्रसाद मध्ये पुलिवोग्रे(भाताचा प्रकार), दहीभात, वेफर्स, बटाटा भाजी, चुन्दल, रवा लाडू, खानतोली, खजूर वडी, बासुंदी... असा मेनू होता. सारे पदार्थ चविष्ट झाले होते. राहिलेले  अन्न पदार्थ जे एकटे राहतात त्यांना दिला जातो. जपानमधील वेगवेगळ्या भागातून (पन्ना...

Team Lab planets - टोकियो

  २६.०९.२०२५ - Team Lab planets    - टोकियो - टीम लॅब प्लॅनेट्स हे टोकियो शहरातील भव्य आणि दिव्य संग्रहालय आहे.  येथे प्रवेशद्वार वर – With your entire body immerse, perceive and become one with the Art - असे लिहिले आहे.  या संग्रहालयात ४ मुख्य भाग आहेत - १) Water २) Garden  ३) forest ४) space  वॉटर भागात तुम्ही गुडघाभर पाण्यात उभे असून तुमच्या पायाबाजूने मासे जात आहेत असे दिसते. चंद्रावर जमिनीवरून कसे चालावे लागते हे एक रूममध्ये आहे.  एक रूममध्ये इन्टेस्टाल्लीरे सारखे संगीत - चांदण्या, चोहोबाजूने आरसे, 3d इफेक्ट, दिव्याचा झगमगाट हे खूप सुंदर आहे.  फॉरेस्ट भागात जंगलातले प्राणी - चालत आहेत असे दिसते.  आपल्या पायाखाली सरपटणारे प्राणी - बेडूक, साप ..  एके ठिकाणी दोरीला धरून एक झोपाळ्यावरून दुसऱ्या झोपाळयावर चढत एका बाजूने दुसरी बाजूस जाणे. मोठाले फुग्याचे बॉल्स धरून ढकलणे, एक रूममध्ये झोपून वर छताकडे पाहणे बरीच फुले वनस्पती आपल्या दिशेने येत आहेत असे दिसते. गार्डन भागात फुले असलेली वेली आपल्याजवळ येतात आणि परत दुसरीकडे फिरत जातात.. ये...

शिंजुकू स्टेशन yamate टनेल

  Gogoday ट्रिप matsuoka सेंट्रल बिल्डिंग - shinjuku भागातून सुटते. हे ठिकाण शिंजुकू रेल्वे स्टेशन जवळ आहे. आता शिंजुकू स्टेशनबाबत - शिंजुकू स्टेशन हे एक मोठे खूप वर्दळीचे जपानमधील स्टेशन आहे. दररोज अंदाजे ८० लाख प्रवासी या स्टेशन मधून प्रवास करतात. जगातले हे जास्त प्रवासी रेल्वे स्टेशन आहे. जमीन आणि तळ मजला मिळून ५२ प्लॅटफॉर्म्स आहेत बऱ्याच भागातून येथे ट्रेन्स सुटतात.  संपूर्ण स्टेशन मध्ये प्रवेश करण्यासाठी जमीन/तळ मजला या ठिकाणी जवळजवळ २०० च्या वर गेट्स आहेत.  प्रत्येक ठिकाणी मात्र इंग्लिश मध्ये पाट्या आहेत. कोठून बाहेर जायचे याबाबत बराच गोंधळ होतो. काही ठिकाणी लिफ्ट/एक्सलेटर, वॉशरूम यांची सोय उत्तम आहे.  शिंजुकू स्टेशन भव्य आणि दिव्य आहे. बस प्रवास करताना yamate टनेल मधून जाते. ही टनेल जवळजवळ १८ km - दोन्ही बाजूने दोन लेन आहेत. जपानमधील सर्वात मोठी आणि जगातील दोन नंबरची टनेल आहे. टनेल मध्ये दिव्याची योजना सुंदर आहे. ही खूप छान टनेल बांधली आहे आणि खूप गजबज असणारी टनेल आहे.

जीवनाची एकषष्टी

  २४.०९.२०२५ - एक दिवसाची ट्रिप - Gogoday Tour यांनी आयोजित माऊंट ओमुरो (उंच पर्वतावर उडान खटोला वरून फेरी, आसपास सुंदर निसर्ग दर्शन, माऊंट फुजी लांबून दर्शन) जोगासाकी कोस्ट (पॅसिफिक महासागर किनारा नजीक खाडी आणि झुलता पूल, समुद्र लाटा) ITO Marine Town  ( शॉपिंग मॉल, समुद्र दर्शन)जोगासाकी कोस्ट - पॅसिफिक महासागर येथील समुद्र - लाटा आणि दुधासारखा फेस, स्वच्छ पाणी/किनारा - झुलता पुलावरून फेरफटका - हे पाहून अनुभवून मनास आनंद झाला.  आज मी जीवनाची एकषष्टी पार केली, जोगासाकी कोस्ट - पॅसिफिक महासागर येथील लाटा पाहून - माझे बालपण, नातेवाईक, शेजारीपाजारी मंडळी शाळा, कॉलेज, नोकरी, बदल्या, मित्रमैत्रिणी, यांच्या आठवणींच्या आणि कृतज्ञतेच्या लाटा मनाच्या सागराच्या किनाऱ्यावर उफाळून आल्या. समुद्रापासून खूप शिकण्यासारखे आहे.  मनास आनंद झाला आणि समाधान वाटले. शिबुया येथील आंध्र रेस्टॉरंट येथे भारतीय जेवणाचा आस्वाद घेऊन तृप्तीची ढेकर देत रात्री १० वाजता घरी परतलो. सौ. वर्षाचा सहवास आणि श्रेयसचे उत्तम ट्रिपचे नियोजन यामुळे माझा ६१वा वाढदिवस जोरात साजरा झाला. अर्थात यात देवाची कृपा, नात...

पुणे टोकियो प्रवास

  टोकियोला प्रवासासाठी आम्ही १९.०९.२०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता मुंबईकडे प्रस्थान केले. गाडीत नाश्ता करीत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे १२.३० वाजता पोचलो.  आमचे दुपारचे एअर इंडियाचे दिल्ली विमानासाठी लग्गेज विभाग, तिकीट चेक, बोर्डिंग पास एअर इंडियाच्या कक्षात झाले.  सेक्युरिटी चेक झाल्यावर दिल्ली कडे जाण्याऱ्या - ४०ब गेट येथून प्रयाण करण्याऱ्या विमानात बसलो.  विमानात केक,रगडा पॅटिस, चहा कॉफी पदार्थ दिले. आमचे विमान दिल्लीला नियोजित वेळेच्या १५ मिनटे आधीच पोचले. जपान टोकियो शहरात दोन विमानतळ - हानेडा आणि नारीटा आहेत, आमचे विमान हानेडा येथे जाणार होते. नंतर आंतरराष्ट्रीय ट्रान्सफर येथे परत सेक्युरिटी चेक आणि इम्मीग्रेशन फॉर्मॅलिटीएस पूर्ण करत आम्ही ६ वाजता गेट क्र ६ येथे आलो.  हानेडा टोकियो चे विमान नंतर ४अ गेट येथून सुटणार त्यामुळे आम्ही तिथे गेलो आणि ७.३० वाजता एअर इंडिया आंतरराष्ट्रीय विमानात बसलो. अधेमधे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वर्षांनी बनवलेले पोळी पराठा, दही भात, कोबी भाजी आणि मटकी यांचा आस्वाद  पण घेतला.    आमचे विमान ह...

माझे वाचन -14

  मी एक संन्याशी  - मूळ इंग्रजी लेखक  पुरोहित स्वामी - अनुवाद  मृणालिनी चितळे  आपला वडिलांचे आत्मचरित्र - An  Indian Monk या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद मृणालिनी चितळे यांनी केला आहे. लहानपण ते अध्यात्मिक गुरु या जीवनाचा प्रवास या पुस्तकात व्यक्त केला आहे.  श्री दत्तगुरु यांची भक्ती, उपासना करणे महत्वाचे.  नरसोबावाडी आणि गिरनार या तीर्थक्षेत्रांचे महत्व स्वामींनी सांगितले आहे. संन्यासी जीवन जगत असताना आलेले अनुभव,खडतर दिनचर्या, आहार, विहार याबाबत लेखकांनी लिहिले आहे. थोडे दिवस संसारी जीवन जगल्यावर नंतर गुरूंच्या आज्ञेनुसार  भारतभर भ्रमण करून अनेक तीर्थ स्थानास भेटी देत असताना काही मंदिरातील, जंगलातील अद्भुत दैवी अनुभव हे पण सुंदर व्यक्त केले आहेत.  परमेश्वरावर श्रद्धा हवी.. आपल्या कसोटीच्यावेळी तेव्हा पॅरामेश्वराचाच आसरा असतो याची स्वामींना प्रचिती येते.  याचे बरेच दाखले स्वामींनी पुस्तकात दिले आहेत. हे सारे अनुभव उत्तमप्रकारे लेखकांनी पुस्तकात लिहिले आहेत.  लेखिकेने उत्तम अनुवाद केला आहे. हे पुस्तक वाचनीय  आहे. हे पुस्तक माझ...

माझे वाचन -13

  वंशवृक्ष - मूळ लेखक डॉ. एस एल भैरप्पा - अनुवाद - सौ. उमा कुलकर्णी - डॉ. भैरप्पांची ही अत्यंत लोकप्रिय आशयसंपन्न कादंबरी.  सनातन धर्मपरंपरा आणि बदलती जीवन मूल्ये या विषयावरची कौटुंबिक कादंबरी - दोन कुटुंबातील कौटुंबिक प्रश्न आणि धर्म नीती यांची घालमेल आणि गुंतागुंत यांचे उत्तम चित्रण या कादंबरीत व्यक्त केले आहेत. पुढे काय घडणार यांची उत्कंठा या पुस्तकात लागते. सौ. उमा कुलकर्णी यांनी उत्तम अनुवाद केला आहे.  या पुस्तकास - साहित्य अकादमी पहिला अनुवाद पुरस्कार (१९८९) आणि महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्रगौरव पुरस्कार (१९९०) लाभला आहे. हे पुस्तक वाचनीय आहे.

माझे वाचन -12

  आवरण  - मूळ कन्नड लेखक - डॉ. एस. एल भैरप्पा - अनुवाद उमा कुलकर्णी  डॉ. एस. एल भैरप्पा यांची ही गाजलेली ऐतिहासिक कादंबरी. कन्नडमध्ये या पुस्तकाच्या दोन वर्षात बावीस आवृत्या निघाल्या आणि तिच्यावर दहा पुस्तके प्रकाशीत झाली. डॉभैरप्पा  यांनी जाती-धर्माविषयी अध्ययन करून चिंतनपर विषय मांडले आहेत. सौ. उमा वि. कुलकर्णी यांनी या कन्नड पुस्तकाचा अनुवाद केला आहे.

सहावे स्नेहसंमेलन

  सहावे स्नेहसंमेलन १) वासोटा riverside रिसॉर्ट - मुनावळे  तालुका जावळी सातारा - आम्ही ११ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता रिसॉर्ट वर पोचलो. ABCD  , टोपीखेळ आणि रिसॉर्ट तर्फे संगीत खुर्ची, गाणी कार्यक्रम मजेत पार पड २) त्रिवेणी संगम, श्री दत्त मंदिर, वासोटा किल्ला बोट फेरी - १२ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता बोटीने आम्ही प्रथम त्रिवेणी संगम - (तीन नद्या - कोयना, सोळशी, कंदाती)  या त्रिवेणी संगमाखाली २०० फूट खोल पाण्याखाली महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराची प्रतिकृती म्हणून शेजारी ब्रविमश्वर महादेव मंदिर आहे. हे मंदिर भुयाराखाली आहे. या ईश्वरलिंगात ब्रह्म+विष्णू +महेश हे विराजमान आहेत. श्री नारायण महाराज यांनी त्याठिकाणची निवड केली यामागे एक आख्यायिका आहे. या भागात गणपती, गुरुदेव पादुका मठ, एक मुखी दत्त, एक खांबी अष्टकोनी गुरुचरित्र पारायण सभामंडप, एक झाडाच्या खोडातून तीन वृक्ष- वड, पिंपळ, औदुंबर उगवले, अशी छोटीमोठी देवळे आहेत. आजूबाजूनी झाडी आणि नदीचे पाणी अश्या निसर्गरम्य परिसर लाभलेला आहे. हे खूप पाहण्याजोगे आहे.   नंतर  वासोटा किल्ला हा दुरून पाह...

IPS श्रीमती स्वाती साठे (विशेष कारागृह महानिरीक्षक कारागृह व सेवा महाराष्ट्र) यांचा सत्कार समारंभ

  ९ ऑगस्ट २०२५ - कर्नल्स क्यूब संस्थेने पुण्याचे भूषण असलेल्या IPS  श्रीमती स्वाती साठे (विशेष कारागृह महानिरीक्षक कारागृह व सेवा महाराष्ट्र) यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.  माजी नगरसेविका श्रीमती माधुरी सहस्रबुद्धे यापण मंचावर हजर होत्या.  प्रमुख पाहुण्यांचे स्वागतानंतर आज रक्षाबंधननिमित्य राखीपण बांधण्यात आली.  संस्थेचे सर्वेसर्वा कर्नल फुले यांनी संस्थेबाबत कार्याची अधिक माहिती दिली.  श्रीमती माधुरीताई यांनी स्वाती साठे यांची ओळख करून दिली. कर्मयोगिनी स्वाती यांच्या कामकाजाबाबत आणि त्यांनी हाती घेतलेले उपक्रम, कैद्यांचे पुनर्वसन, कारागृह बाबत workshops  त्यांचे छंद, शिक्षण, कुटुंब याबाबत माहिती दिली.  श्रीमती स्वाती साठे याना मिळालेल्या पुरस्कार आणि गौरव सम्मान यांचा उल्लेख केला गेला. सन्मान पत्र वाचन करून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संस्थेने केलेला विशेष सन्मानाबाबत कृतज्ञता व्यक्त करीत स्वाती साठे यांनी सेवेत असताना कारागृहातील चित्तथरारक अनुभव सांगितले. चार भिंतीतील जगाची कल्पना सामान्यांना नसते. कारागृहातील कैद्यांचे विचित्र अन...

गोल्डन मेमरीज प्रस्तुत स्वरयात्री बाबूजी

  ३०.०७.२०२५  - गोल्डन मेमरीज प्रस्तुत स्वरयात्री बाबूजी - तापपूर्ती सोहळा - बाबूजींच्या स्मृतिदिनानिमित्य त्यांच्या सुमधुर युगलगीतांचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आयोजित केला होता.  दीपप्रज्वलनानंतर प्रो. मिलिंद जोशी यांनी तपपूर्ती कार्यक्रमाबाबत धन्यवाद आणि आगामी वाटचालीसाठी चैत्राली अभ्यंकर शुभेच्छा यांना दिल्या. गेली बारा वर्षे नियमित २९ जुलै दरम्यान बाबूजी यांच्या गाण्यावर आणि संगीतावर  चैत्राली अभ्यंकर विनामूल्य कार्यक्रम करतात. यामध्ये जवळजवळ एकवीस मराठी गाणी गायकांनी गायली.   1)फिटे अंधाराचे जाळं 2) अनोळखी सिनेमा - धुंद एकांत हा 3) अवघाचि संसार - रूपास भाळलो मी 4) नवीन आज चंद्रमा 5) आम्ही जातो आमच्या गावा स्वप्नांत रंगले मी 6) तुझ्या गळा माझ्या गळा 7) रात चांदणे गंध चंदनी हवास तु 8) धुंदी कळ्या ना धुंदी फुलांना 9) आज चांदणे उन्हात हसले 10) जाशील कोठे मुली तू 11) विठू माउली माऊली तु जगाची 12) असा शालू नेसून नवा 13)  क्षणात कळली क्षणात जुळली तुझी माझी प्रीत जगावेगळी 14) तुलान कळले कसे प्रितीचे धागे जुळले 15) तुझ्या माझ्या संसाराला आणखीन...

मस्त बिनधास २४ तास " - डॉ. संजय उपाध्ये

  २९ जुलै २९२५ - डॉ. संजय उपाध्ये यांचा "मस्त बिनधास २४ तास " हा कार्यक्रम पुणे सकाळ, सह्याद्री कवच आणि स्वस्तिश्री सोसायटी यांनी स्वस्तिश्री सभागृह गणेशनगर पुणे येथे आयोजित केला होता. आपले गुरु ग. दि. मा. याना वंदनपर गीत सादर करून मस्त बिनधास २४ तास यासाठी नेहमी हसतखेळत राहावे. आजोबा नातू - कुत्र्याची शेपूट - याचे उदाहरण देत सुख मागून येत असते -" मागून" मिळत नाही.  आयुष्य sincerely घ्या seriously  नको. दुसऱ्याचे कौतुक करा -देण्यात आणि कौतुक करण्यात कंजुषी नको साठीनंतर विचारले तर सल्ला द्या नाहीतर मौन पाळा. आपल्या जीवनसाथी, मुलेमुली, सून, नातवंडे आणि इतरांशी - सर्वांशी प्रेमाने वागा. शांतिमय आणि  निरपेक्ष बुद्धीने जगा. appreciation होते. आपला देह "Asset  " म्हणून नको तर "Trustee " म्हणून माना.  Appreciation हवे नाहीतर "Asset  " म्हटले तर depreciation येते. निवृत्तिपर जीवन स्वीकारा.. Accept  the fact and act rationally .. स्वतःला बदला.. मी पणा गळू दे अहंकार नको..सोडून द्या - Art of Leaving and not living ..हवे. म्हातारपणी धरून ठेवण्यामध्...

माझे वाचन -11

  परतवारी - ले. सुधीर महाबळ पंढरीची वारी ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. परतवारी म्हणजे पंढरीहून परत आळंदीकडे प्रस्थान..लेखक सुधीर महाबळ आपल्या निवडक मित्रासह २००५ सालापासून परतवारी करत आहेत.  रोज ३५  कि.मी. पायी प्रवास..परतवारी समयी कष्टप्रद प्रवास, सोयी-सुविधा यांचा अभाव असतो.  या पुस्तकात लेखकांनी भेटलेले भक्त, निसर्ग, माणसे आणि इतर प्रसंग यांचे उत्तम चित्रण आहे.  आपल्याला मिळालेल्या नवीन गोष्टी आणि माणसाशी माणुसकीचे नाते - यातून आपला अहंकार कसा गळून पडतो हे दिसून येते.  हे पुस्तक सवड काढून वाचण्याजोगे आहे.

सौ. शुभांगी कोपरकर यांचा स्वरचित कविता वाचनाचा "काव्यछंद"

  २६ जुलै २०२५ -कर्नल्स क्यूब संस्थेने सौ. शुभांगी कोपरकर यांचा स्वरचित कविता वाचनाचा "काव्यछंद"  कार्यक्रम आयोजित केला होता. स्नेहालय स्नेहाधार - या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्या कविता रचणे आणि स्वरचित कविता वाचन करणे हा छंद याबाबत ओळख सौ. साधना डांगी यांनी करून देत त्यांचे स्वागत केले. सुरुवातीस वृत्त आणि त्यांचे प्रकार - अक्षरगण आणि मात्रावृत्त  -  ह्र्स्व आणि दीर्घ -  याबाबत अधिक माहिती सांगितली. पाऊस, रानवाट, श्रावण, गोकुळात रास रंगला, प्राणियिनीची भावना, पाऊसाची साद, श्रोत्यांना आर्जव, गावातला जुना वाडा खंतावला, जीवनाचे सिहावलोकन, वीरगाथा, दोन योगी - हिमालय आणि सागर - साठीनंतर मी काय - आपल्याला काय वाटते - स्पर्शभुल, निसर्गसखा आणि मी, सांजवेळी - किती पावसाळे उन्हाळे, अश्या जवळजवळ सोळा स्वरचित कविता सादर केल्या. प्रत्येक कविता सादर करताना त्यामागची पार्श्वभूमी कथन केली.  कार्यक्रमाची सांगता कारगिल विजयदिनानिमित्य लहान मुलासाठी प्रेरणादायी कारगिल कथा या  कविता वाचनाने झाली. शेवटी सर्वानी दोन मिनिट मौन पाळून वीरांना सलाम श्रद्धांजली वाहिली. आपल्या...

माझे वाचन -10

  भगवंताचं न्यूजलेटर  - ले. राजेंद्र वैशंपायन ..आपल्या सामान्यांच्या मनातले विचार, प्रश्न आणि प्रत्येकाच्या जीवनातील घटना, प्रसंग याबाबत लेखकांनी लेखात व्यक्त केले आहेत. या पुस्तकात ५२ लेख आहेत. जनाचे श्लोक या लेखात दशसूत्री खूप छान आहे. कृतज्ञतेचा निर्देशांक  हा लेख मनास भावून जातो. या पुस्तकातील सारेच लेख वाचनीय आणि बोधपर आहेत. दोन पानी लेख छोटेखानी हे पुस्तक जरूर वाचावे आणि संग्रही ठेवण्याजोगे आहे.

ती. उदयराव देहावसान

  ती. उदयराव याना देहावसान बातमी वाचली आणि मनास वाईट वाटले.  तीस वर्षांपूर्वी साऱ्या स्मृती जाग्या झाल्या.  मुबईस असताना घाटकोपर, अंधेरी, गोरेगाव, पुणे आणि शिरूर येथे माझ्या बदली ठिकाणी त्यांनी  आमच्या घरी भेट दिली होती.  त्यांचा स्वभाव रॉयल,चेष्टेखोर, खवये, चवीने खाणार, सर्वांशी मिळूनमिसळून, क्रिकेट, राजकारण याविषयावर भरपूर गप्पा..पत्ते खेळ.. त्यांच्या सहवासात वेळ कसा मजेत जात असे.  प्रत्येक ठिकाणी कमालीचा समजूतदारपणा (अर्थात मुबईकर..) यामुळे ते सर्वांचे लाडके होते. वाढदिवसानिमित्य फोनवरून शुभेच्छा देत आणि Blue Diamond  (पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल) येथे पार्टी पाहिजे असे चेष्टेने म्हणत.  आपला लाडका "Diamond " अचानक "Blue " आकाशात आधीच पोचला. ..त्यामुळे "Blue  Diamond " चे स्वप्न अधुरे राहिले. असो.   ती. कै. अप्पाजी यांच्या वर्षश्रद्धानिमित्य बेंगलोर येथे दोन तीन दिवस शेवटचे त्यांच्या सहवासात आनंदात गेले होते. त्यांची तब्येत बरी नसताना ते "ती. बाळासाहेब" (ती. अप्पाजी)  यांच्या प्रेमापोटी ते बेंगलोर येथे मुद्दाम आले होते. अर्थात स...

प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समिती पुणे यांच्यातर्फे पुरस्कार आणि सम्मान डॉ.शंकर अभ्यंकर

  15 जुलै २०२५ - प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समिती पुणे यांच्यातर्फे पुरस्कार आणि सम्मान डॉ.शंकर अभ्यंकर यांना मूर्तिशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांचा हस्ते दिला गेला. हा कार्यक्रम एस एम जोशी सभागृह येथे आयोजित केला होता. श्रवण संस्कृती प्रसार बाबत  वसंत व्याख्यानमालेचे आयोजक श्री रवींद्र माळवदकर यांचाही सत्कार करण्यात आला. प्राचार्य शिवजीराव भोसले यांनी महाराष्ट्राला ऐकायला शिकवले. अफाट वाचन, चिंतन आणि मनन यांनी व्याख्यानाचा बाज निर्माण केला होता. बुद्धीची सखोलता, वाणीची निर्मळता, आणि प्रज्ञेची अथांगता म्हणजे शिवाजीराव भोसले असे उदगार डॉ. शंकर अभ्यंकर यांनी व्यक्त केले. प्राचार्यानी अनेक विषयावर भरपूर व्याख्याने देऊन सर्वाना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक भाषणात तुकोबा यांचे वचन असायचे. प्राचार्यांचा आवाज कधीच चढला आहे आणि ते कधीच रागावले नाहीत. बहुश्रुत, श्रवण, धारण, स्मरण, चिंतन, उहापोह, अर्थांतर, आचरण या अष्टांग शिवाजीराव भोसले यांनी उत्तम कामगिरी करून व्याख्याने समृद्ध केली. महाराष्ट्राचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले.या पुण्यात या कार...

Mental Health - डॉ. अनिल वर्तक

  १२ जुलै २०२५ रोजी कर्नल्स क्यूब संस्थेने - Mental Health - या विषयावर डॉ. अनिल वर्तक यांचे व्याख्यान आयोजित केले होते. World Health  Organisation - नुसार " No health without mental health ". ५० वर्षांपूर्वी शारीरिक स्वास्थ म्हणजेच आरोग्य असे समजले जायचे. मानसिक स्वास्थ दुर्लक्षित होता. मेंदूसंबंधी अभ्यास कमी केला जात असे. सध्या  - भास होणे, भ्रमनिरास, काळजी, भीती, नैराश्य, नकारात्मता असे  मानसिक आजार वाढले आहेत. मानसिक आजारासाठी कोणतीच लॅब टेस्ट नाही. विभक्त कुटुंबपद्धती, स्पर्धा, रस्त्यावरील वाहतूक, मोबाईलचा अतिवापर, कमी संवाद यामुळे मानसिक आजारात वाढ होत आहे. भारतात १०% लोक मानसिक आजाराने त्रस्त आहेत. मानसिक आजाराबद्दल  सामाजिक दृष्टिकोनात बदल व्हावा. मानसिक रोगी आणि त्यांच्या कुटुंबियांना सकारात्मक पाठींबा आणि आधार देणे हे महत्वाचे. पुरेशी झोप, संतुलित आहार, बागेत निसर्गदर्शन करीत फिरणे, आपला छंद जोपासणे, रोजनिशी (डायरी) लिहिणे, आपल्या जीवनात आनंदी आणि समाधानी राहणे ..यासारखे काही उपाय मानसिक आजारावर करणे गरजेचे. सुदृढ नातेसंबध, आपली दैनंदिन रुटीन सांभाळणे,...

माझे वाचन - 9

  अस्तित्व - मूळ कन्नड लेखिका सुधा मूर्ती - अनुवाद प्रा. ए आर यार्दी - एक कुटुंबात घडलेली ही घटना कौटुंबिक कादंबरी.  ही लेखिकेची पहिली मराठी भाषेत प्रकाशित झालेली कादंबरी. या कादंबरीवर दूरदर्शन मालिकाही खूप गाजली. नंतर या कादंबरीचे इतर भाषेत अनुवाद झाले आहेत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय होते ही उत्सुकता पुस्तक वाचताना जाणवते. ही छोटीशी कादंबरी वाचनीय आहे.

"सहज सुचलं म्हणून" - बहिणाबाई चौधरी - पुणे आकाशवाणी केंद्रावर वनिता मंडळ कार्यक्रम

  10 july - पुणे आकाशवाणी केंद्रावर वनिता मंडळ कार्यक्रम अंतर्गत "सहज सुचलं म्हणून" या सदरात - बहिणाबाई चौधरी यांच्याबाबत कार्यक्रम ऐकला.  शालेय जीवनात बहिणाबाई कश्या भेटल्या - त्यांचे जीवन संघर्ष, कष्टमय आयुष्य, संकटातसुद्धा कविता कशी सुचली याबाबत माहिती थोडक्यात सांगितली.  संसाराची गाणी, माणूसपणाची कविता, जीवनग्रंथातील तत्वज्ञान, त्यांच्या कवितेतून आखा जीवनपट उभा राहतो. अरे संसार संसार ...जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर...हे गाणे ऐकत असताना माझे मन पन्नास वर्षांपूर्वीचे माझे बालपणात - आमच्या स्वयंपाकघरात गेले.  चुलीवर माझी आई भाकरी करत असताना चे दृश्य माझ्या डोळ्यासमोर आले.  आटोपशीर स्वयंपाक घरात दोन चुली होत्या, एक खिडकी थोडी उंचावर या खोलीलगत परसू होते.  येथे आई भाकरी करीत असताना आम्ही सात भावंडे आणि आजी/दादा असे ऐकून आम्ही  ८ जण भोजनास बसत होतो.  प्रत्येकास नंबरनुसार भाकरी पानात पडत असे.  उन्हाळ्यात वाऱ्याची झुळूक साठी आपली जागा खिडकी/प्रवेशद्वार जवळ मिळण्यासाठी आम्हा भावंडात स्पर्धा असे.  पावसाळ्यात अगर थंडीदिवसात...

एक डॉक्टर घडताना - डॉक्टर्स डे निमित्य

  १ जुलै २०२५ - डॉक्टर्स डे निमित्य - एक मुलाचा/मुलीचा डॉक्टर होण्याआधीपासून ते डॉक्टर झाल्यानंतरचा प्रवास, अर्थातच .. एक डॉक्टर घडताना  या विषयावर -  शिरीष थिएटर्स आणि रियाज ग्रुप आयोजित API पुणे प्रस्तुत हिंदी गाण्याचा कार्यक्रम बालगंधर्व पुणे येथे संध्याकाळी आयोजित करण्यात आला होता.  MBBS  ला प्रवेश घेतल्यानंतर कॉलेज जीवन, इंटरशिप, पीजी परीक्षा, स्वतःचा व्यवसाय, लग्न,संसार .. या प्रवासावर साजेशी जुनी हिंदी गाणी ...कार्यक्रमाची सुरवात गजाननास वंदन - गणनायका ..कथक नृत्याने झाली. हिंदी गाण्यामध्ये - जिंदगी आ रहा हू मै, दिल है छोटासा, यो सिकंदर है वो, उन्से मिली नजर, दिलबार मेरे, नजा मेरे दिल को, कोरा कागज था, भली भली सुरत, शायद मेरा शादी का, नखरेवाली, उठे सब के कदम, मौसम मस्ताना रस्ता अंजाना, मेरे सपणो की रानी, मायेरी मै कहांसे कहू, रुक जाना नही, सामने ये कौन आया, जिंदगी कैसी ये पहेली है. काहीजणांनी स्वरचित कविता, मौथ ऑर्गन वर बडे अच्छे लगते, सिन्थेसाझर वर नीले नीले अंबर पर चांद.. गाण्याचे वादन केले. कार्यक्रमाची सांगता जिंदगी मिल के गायंगे या गाण्यांनी झाली. का...

"आरोग्यम धनसंपदा" - डॉ कल्याणी बडवे

  स्वास्थ, सात्विक आहार, संवाद-सत्संग, संगीत आणि सहल या पंचसूत्री आपल्या जीवनात आचरणात आणली तर आपले आरोग्य उत्तम राहते असे मत डॉ कल्याणी बडवे यांनी "आरोग्यम धनसंपदा" या कर्नल्स क्यूब संस्थेने आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. आज विनायक चतुर्दशी निमित्य कार्यक्रमाची सुरुवात गजाजनांस वंदन करून जागतिक आरोग्य संस्था (WHO ) यांनी केलेली आरोग्याच्या व्याख्या यांनी केली. शारीरिक, सामाजिक, अध्यात्मिक, मानसिक या स्थरावर स्वास्थ असणे हे महत्वाचे. स्वास्थ कसे राहावे यामध्ये पहाटे ब्राह्मीमुहूर्तावर उठून शांत बसून ध्यान करणे - व्यायाम करणे प्राणायाम..सात्विक आहाराबाबत भगवदगीतेत उल्लेख आहे. घराचे अन्न, फळे खाणे जरुरीचे.  सध्याच्या BP , डायबेटीस, ऍसिडिटी, ताप, गुडघेदुखी  या रोगावर काही नैसर्गिक उपचारांबाबत माहिती सांगितली. आपले शरीर नेहमी आपणास सूचना देत असते. त्याचे आपण ऐकले पाहिजे.  आपली जीवनशैली निसर्गाशी अनुरूप हवी.  आपले मन निरपेक्ष,स्वच्छ हवे हळवे नको - नामस्मरण नियमित करावे. अहंकार बाबत गोष्ट सांगून आपल्यातील इगो नाहीसा होणे गरजेचे. अहमदाबाद येथे काही कार्यक्रमानिमित्य ग...

चिकोडी येथे श्री दत्त मंदिर येथे महापूजा आणि पालखी

  २१ जून २०२५ - चिकोडी येथे श्री दत्त मंदिर येथे महापूजा आणि पालखी कार्यक्रमासाठी आम्ही साताऱ्याहून गाडीने चिकोडीस प्रयाण केले.  पोचल्यावर नेहमीप्रमाणे  महादेव मंदिर, श्री शाकंभरी मंदिर, श्री मारुतीमंदिर आणि व्यंकेटेशमंदिरास भेटी दिल्या.  दुपारी श्री मंदिर मंदिरात आरती आणि प्रसाद याचा लाभ घेतला. दत्ताची पूजा सजावट सुरेख झाली होती.  संध्याकाळी आम्ही तोरणहल्ली या गावी श्री हनुमान मंदिरास भेट दिली. चिकोडीपासून हे १० किलोमीटर अंतरावर संकेश्वर रोड वर आहे. हे हनुमानाचे १२ व्या शतकातील स्वयंभू मंदिर आहे. मंदिराचा आवार मोठा आहे मुख्य मंदिरात काचेचे नक्षीकाम सुंदर केले आहे. आजूबाजूस भक्तांना राहण्यासाठी खोल्या आहेत.  अजुनी मंदिराचे काही बांधकाम सुरु आहे.  या मंदिरात मोठ्या चामड्याच्या चपला आहेत. रात्रीच्यावेळी मारुती या चपला घालून गावातून फेरफटका मारतो आणि चपलांचा करकर आवाज जाणवतो असे गावकरी सांगतात.  परत येथे काही लहान चपला पण आहेत. त्या चपला आपल्या दुखऱ्या भागावर मारल्यावर दुखणे कमी होते त्यामुळे बरेच भक्त हळुवारपणे मारून घेत होते.  माझ्या सौ. ने चप...

जागतिक बाप दिना

  आम्ही वडिलांना "दादा" असे म्हणत असू. लहानपणी आमचे दादा कडक शिस्त, संस्कारी, सत्य बोलणे .. असे होते. अर्थात ५० वर्षांपूर्वी वडिलांचा धाक आणि आदरयुक्त भीती असे. घरी सात भावंडे, आजी असा मोठा परिवार. त्यामुळे मुलांचे कौतुक लाड, प्रेम जवळजवळ नसायचे. आपल्या मुलांचे कौतुक इतरांनी करायला हवे असा त्यांचा दृष्टिकोन. भावाबहिणीत ते सर्वात मोठे त्यामुळे आपल्या सर्व भाऊ बहिणी संसारात मदत करणे. वेळातवेळ काढून साऱ्या नातेवाईकाना भेटून अगर पत्राने विचारपूस करणे करीत. आम्हाला पत्र लिहायला सांगत (त्यावेळी पत्रलेखन कंटाळवाणे वाटायचे).  कोकणात नोकरी करीत असताना आमच्या गावी (तीन बस बदलून यावे लागत) शनिवार रविवार येताना देवगड हापूस आंबे, फणस, करवंदे, जांभळे -- भरभरून घेऊन येत आणि प्रथम गल्लीत शेजारीपाजारी आणि कामवाली बाई - यांना काही भाग द्यायला सांगत आणि नंतर आम्ही मुले कोकण फळांचा आस्वाद घेत असू.  आमची कामवाली बाई मुलींच्या लग्न आणि इतर सांसारिक अडीअडचण यावेळी तत्पर मदत करीत .जीवनात बचत, जेष्ठांचा आदर, देवधर्म कुलदैवत वर्षातून एकदातरी भेट, गरजूना नेहमी मदत, परोपकार,पुस्तकवाचन, पत्रलेखन, नात...

Yog and Harmony for you - डॉ. प्रेरणा बर्वे

  १४ जून २०२५ - कर्नल्स क्यूब संस्थेने - Yog and Harmony for you - या विषयावर डॉ. प्रेरणा बर्वे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. डॉ प्रेरणा या योग शिक्षिका आहेत. प्रारंभी योग म्हणजे काय? योग कोणी करावा , योगाचे फायदे, स्ट्रेचिंग,  याबाबत थोडक्यात माहिती सांगितली. आत्माचे परमात्माशी संयोग, सुख दुःख यात समतोल राखणे.श्वास नियंत्रण - शरीर आणि मनाचा समतोलपणा राखण्याचे काम श्वास करतो. योगामुळे समाधान आणि सुख मिळते. योग करताना posture महत्वाचे.  How you do is imporant than what you do .नंतर प्रात्यिक्षिके योग करून दाखवली. संपूर्ण शरीराची हालचाल - स्ट्रेचिंग - बाबत अनेक योगाचे प्रकार साऱ्या उपस्थित श्रोत्यांकडून करवून घेतले. प्राणायाम यात अनुलोम विलोम, भ्रामरी, ओंकार याबाबत थोडक्यात माहिती सांगून हे कसे करावयाचे सांगितले आणि करवून घेतले. साऱ्या श्रोत्यांनी आपापल्या जागी खुर्चीवर बसून सारे योग आनंदाने केले.  संस्थेचे प्रमुख कॅप्टन फुले हे सगळीकडे फिरून निरीक्षण आणि मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने झाली. उपस्थित मंडळींनी मन लावून योग केला..प्रत्येकाचा ...

माझे वाचन -8

  "माझे आजोबा"  - अक्कलकोट स्वामींचे "मंगेश वर्दे" ना आलेले अनुभव -लेखक : मंगेश वर्दे.  लेखक श्री मंगेश वर्दे याना त्यांच्या जीवनात आलेले अक्कलकोट स्वामींचे अनुभव या पुस्तकात लिहिले आहेत. लेखक हे बँकेत नोकरी करीत असताना ऑफिस कामकाज आणि बदलीनिमित्य इतर ठिकाणी प्रवास करीत असताना काही गोष्टी अगर त्रास दूर होऊन काही बाबी सुखकर झाल्या.  प्रत्येक नवीन गावी गेल्यावर त्यांचा स्वामी मठ/मंदिर शोध सुरु असायचा आणि शोधून ते मुद्दाम भेट देत. भेटीवेळी स्वामींच्या दर्शनावेळी मानसिक अवस्था आणि समाधान, आनंद हे त्यांनी उत्तमप्रकारे व्यक्त केले आहेत. स्वामींचे वचन- "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे" - याचा त्यांनी बऱ्याच प्रसंगी अनुभूती घेतली आहे.   कॉम्पुटर- सर्व्हर -या अनिश्चित गोष्टीवर आपले काहीच चालत नाही त्यावेळी वरून एक अदृश्य शक्ती काम करीत असतात. मी पण बँकेत नोकरी केली असलेने बरेच अनुभव वाचताना सगळे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात आणि जणू आपणच त्या जागी आहोत असा भास होतो. लेखकांनी पहिल्या दोन आवृत्तीच्या विक्रीतून आलेले मूल्य श्री स्वामी चरणी अक्कलकोटला अन्न छत्राला दान...

अध्यात्म सरिता अंतर्गत "संवाद" श्री अभय टिळक, श्री अभय भंडारी आणि डॉ धनश्री लेले

  यूटुबवर इंद्रधनू आयोजित वसंत व्याख्यानमाला ठाणे अध्यात्म सरिता  अंतर्गत "संवाद"  श्री अभय टिळक, श्री अभय भंडारी आणि डॉ धनश्री लेले यांच्याबरोबर संवाद - संवादक श्री विनायक पाचलग हा कार्यक्रम पाहिला. सामान्यांना पडणारे प्रश्न - अध्यात्म म्हणजे काय, मानसिक तणाव, शांती, धर्म आणि पूजापाठ कर्मकांड, कर्म आणि भक्ती योग यासारखे अनेक प्रश्न श्री विनायक सरानी विचारले आणि या तिघा मंडळींनीही संवाद साधला. मुलांच्यावर कसे आणि काय संस्कार करावेत याबाबत - मोबाईलचा वियोग कसा सहन करायचा, ४५ मिनिटे स्थिर बसणे, तपस्या दीर्घकाळ हवी easy going काही नाही, नक्कल नको अस्सल हवे, जसे नाही तसे दाखवणे नको, प्रामाणिकपणा, कष्ट, स्वतःच्या क्षमता शोधून वाढवणे. आत्मभान, लोकसंग्रह करणे, सातत्य, लक्ष ठेवणे, आरोग्यपूर्ण जीवन, परद्रव्य, परनारी, परान्न टाळणे.. ईश्वर दर्शनासाठी काय करावे - जाणिवांचा स्तर बदलायला हवा, प्रामाणिक असावे, मनामध्ये करुणा, भय, लालसा यत्किंचितही नको. बुद्धी स्थिर हवी.  आपल्या क्षमता ओळखा.  आपल्याला काय इच्छित आहे जे झेपेल तेच करावे. पृथ्वीवर सगळीकडे पाणी आहे पण आपण आपल्याला ...

माझे वाचन -6

  No Mud, No Lotus " - The art oftransforming suffering  by -  Thich Nhat Hanh  The author says - most people are afraid of suffering. But suffering is a kind of mud to help the lotus flow of happiness grow.  There can be no lotus flower without the mud.  The  author is from Vietnam and Budhist monk - Zen master.  Giving herebelow some of the useful  points from the book for implementation in ones life : We can condition our bodies and minds to happiness with the five practices of - letting to, investing positive seed, mindfulness, concentration,insight.  Mindfulness is the best way to be with our suffering without being overwhelmed by it. Mindefulness is the capacity to dwell in the present moment to know what is happening in the here and now.  to be mindful means to be aware.  with mindfulness, you can recognise the presence of the suffering in you and in the world. The most effective way o show compassion to another is to li...

श्री अप्रेमय स्वामी, करीघट्टा, निमिशाम्ब, श्री आदी रंग मंदिर - एक दिवसाची ट्रिप के

  श्री अप्रमेय स्वामी मंदिर - हे मंदिर चन्नापट्टण - बेंगलोर म्हैसूर रोड वर आहे. अप्रमेय स्वामी हे भगवान विष्णूचे रूप. अप्रमेय म्हणजे अनंत - अप्रमेय स्वामींच्या शक्ती, ज्ञान, प्रेम याना सीमा नाही म्हणून याना अप्रमेय स्वामी म्हणतात प्रत्येक सूक्ष्म गोष्ट ही त्यांच्याच कृपेने घडते. असे असलेतरी स्वामी अलिप्त असतात. हे मंदिर चोला राजवटीत ११ व्य शतकात बांधले आहे.   मंदिराच्या परिसरात अरविंदवल्ली देवी (म्हणजे महालक्ष्मी देवी) आणि आंबेगालू कृष्णा (बालकृष्ण), मारुती मंदिर आहेत. या मंदिरास भगवान राम भेट देऊन गेले आहेत म्हणून या ठिकाणास दक्षिण अयोध्या असे संबोधले जाते. संत पुरंदरदास यांनी पण भेट दिली आणि बाळकृष्णाच्या मूर्तीने ते अत्यंत प्रभावित झाले. देवदर्शनांतर "पाकशाला" या हॉटेलमध्ये नाश्ता घेतला.  या हॉटेलमध्ये बरीच गर्दी होती हॉटेल मोठे आहे. गर्दी असलीतरी पाच मिनिटात टेबलावर आपले खाद्यपदार्थ येतात. सेवा तत्पर आणि उत्तम आहे. दक्षिण नाश्ता पदार्थ चविष्ट आहेत. करीघट्टा मंदिर - करीघट्टा म्हणजे  कन्नडमध्ये "हत्ती डोंगर" - हा डोंगर बेंगलोर- म्हैसूर मार्गावर श्रीरंगपट्टणम ज...

माझे वाचन -5

  "अशी पाखरे येती"  मिताली वर्दे - हे पुस्तक वाचले.आपण आपल्या आयुष्यात भेटलेल्या माणशाविषयी उत्तम लिखाण केले आहे. सर्वच गोष्टी वाचनीय आहेत. "असाही एक योगायोग" आणि "सिस्टर मीना" या गोष्टी मला अधिक भावून गेल्या.  मी पण बँकेत नोकरी केल्यामुळे बँकेत कामकाज बाबत लिहिलेल्या गोष्टी विशेष आवडल्या. प्रत्येक  गोष्टीतून जीवनाबाबत काहीनाकाही संदेश दिला गेला आहे. हे आवडले. पुस्तकातील गोष्टी वाचताना पुढे काय होईल ही उत्कंठा लागते. पुस्तक संग्रही ठेवण्याजोगे आहे.  

त्रिकुटेश्वर मंदिर , वीरनारायण मंदिर गदग, बेलधडी राम मंदिर,बेलधडी राम मंदिर, श्री ब्रह्मचैतन्य महाराज आश्रम - हेब्बळी -

  त्रिकुटेश्वर मंदिर  गदग - हे मंदिर बाराव्या शतकातील चालुक्य काळातील शिव मंदिर. एकाच दगडातून तीन लिंग (ब्रह्मा,महेश्वर आणि विष्णू  बनवली गेली आहेत -  एका भागात सरस्वती ,गायत्री आणि शारदा देवींची मंदिर आहेत. खांबावर शिल्प कला कोरली आहे.  मंदिराचा आवार मोठा आहे. मंदिरापासून जवळ जोड मारुती मंदिर आहे. हे दोन मारुतीच्या वेगवेगळ्या  मूर्ती एकाच ठिकाणी आहेत. वीरनारायण मंदिर गदग - हे होयसळा काळातील १२ व्या शतकातील मंदिर राजा विष्णूवर्धन यांनी बांधले. मुख्य मूर्ती नारायण (विष्णू) या देवाची आहे. मंदिराचे प्रवेशद्वार, गोपूर आणि आवारातील वृक्ष, परिसर देखनीय आहे. वीरनारायण मंदिर गदग - हे होयसळा काळातील १२ व्या शतकातील मंदिर राजा विष्णूवर्धन यांनी बांधले. मुख्य मूर्ती नारायण (विष्णू) या देवाची आहे. मंदिराचे प्रवेशद्वार, गोपूर आणि आवारातील वृक्ष, परिसर देखणीय आहे. या मंदिरातील एका खांबाला टेकून कन्नड कवी कुमार व्यास यांनी महाभारत कन्नड भाषेतून लिहिले. कवींना देवीकडून स्फुर्ती लाभली. गदग गावातील त्रिकुटेश्वर, जोड मारुती, वीरनारायण मंदिर पाहण्याचा योग आला. बेलधडी राम मंदिर...

गाऊ कथा तुकोबाची - डॉ. सलील लाटे

  १२ एप्रिल २०२५ - कर्नल्स क्यूब संस्थेने - गाऊ कथा तुकोबाची -या विषयावर - डॉ. सलील लाटे यांचा व्होकल सोनाटा कार्यक्रम आयोजित केला होता.   १६०८ ते १६५० या कालखंडातील तुकाराम महाराज यांच्या जीवनाबाबत श्री सतीश काळे यांनी भावगीत लिहिली आहेत.  गीतांची सुरुवात देहू गावी पालखी, बालपणी कनक आई पोटी जन्म, भंडारा डोंगरावर तुकोबांच्या तोंडी एकामागून एक अभंग - तुकोबा शिखरावर एकटे ही गाणी सुरेल आवाजात श्री लाटे यांनी गायली. डोंगरावर काट्याकुट्यातून वाट काढत तुकोबांच्या पत्नी अवली जेवण घेऊन जाताना एक गुराखी बाळाची भेट आणि तिथेच पांडुरंग दर्शन, तुकाराम महाराज यांच्या कीर्तनावेळी शिवाजी महाराज यांची उपस्थिती आणि विठ्ठलाचा धावा.. याबाबत अनुभूती सांगून त्यावर गीते सादर केले. श्री शिवाजी महाराज यांनी पाठवलेली भेट तुकाराम महाराज यांनी नम्रपणे परत केली, अभंग इंद्रायणी नदीत बुडवले, पांडुरंगाचे सगुणरूप दर्शन हाक, शेवटी विठ्ठलाच्या गावा जाण्यासाठी वैकुंठ गमन, यावरची गीते सादर केली. श्री सलील लाटे यांनी सारी भावगीते सुरेल आवाजात सादर करून साऱ्या श्रोतुवर्गास मंत्रमुग्ध केले.गीते गाताना स्वत...

२४.०३.२०२५ - अकरा मारुती ट्रिप

  २४.०३.२०२५ - अकरा मारुती ट्रिप  अकरा मारुती ट्रिप  सातारा येथून सकाळी ७ वाजता आम्ही अकरा मारुती ट्रीपसाठी प्रस्थान केले. श्री रामदास स्वामी यांनी स्थापन केलेले अकरा मारुती क्रमाने दर्शन घेतले ते असे - १)उंब्रज - प्रताप मारुती २) माजगाव - मारुती ३) चाफळ - श्री राम मंदिर आणि - दासमारुती, ४) चाफळ - वीरमारुती  ५) शिंगणवाडी - खडीचा मारुती  6) मसूर - सुंदर मारुती 7) बहे बोरगाव - मारुती 8) बत्तीसशिराळा - श्री वीर मारुती  9) पारगाव  मारुती १० ) शहापूर - वीर मारुती  11) मानपाडळे- विशाल मारुती. प्रत्येक मारुतीबाबत विस्तृत माहिती देणे टाळले आहे. चाफळ येथील श्री राम मंदिर भव्य आणि सुंदर बांधले आहे. बहे बोरगावला जाताना कोळे- नरसिहपूर येथील उग्र नृसिह मंदिर खाली गुफेत आहे.  बहे बोरगाव याठिकाणी बेटामधील श्री शिवलिंग मंदिर आणि मारुतीचे मंदिर छान आहे. बहे बोरगाव - येथे कृष्णा नदी जोरात खळखळ करीत वाहते. श्री राम लक्ष्मण आणि सीता यांचे याठिकाणी वास्तव होते. येथील बेटावर श्रीरामांनी ईश्वराची पूजा करीत असताना कृष्णा नदी जोरात वाहत येते. त्यावेळी मारुती रायांनी ...

संयुक्ता “ कार्यक्रम - “ अरुणिमा “ प्रस्तुत कार्यक्रम

  “ अरुणिमा “ प्रस्तुत कार्यक्रम ( कथा , कविता , नाट्यवाचन , गप्पा आणि गाण्यांनी युक्त …“ संयुक्ता “ कार्यक्रम  श्रीराम लागू रंग अवकाश हिराबाग पुणे  येथे १० मार्च २०२५ रोजी  आयोजित केला होता. गांधारी आणि द्रौपदी संवाद, संत सोयरबाई,संत कान्होपात्रा.. झाशीची राणी... अहिल्या... जिजामाता..सीड मदर - राहीबाई पोरे, बहिणाबाई चौधरी.यांच्यासारख्या महान कर्तृत्वान महिला यांची माहिती आणि कार्य ..सावरकर कुटुंबियातील ३ महान महिला - येसूबाई, माई आणि लक्ष्मी यांचा स्वर्गातील संवाद, आदर्श पतिपत्नी - आनंदी गोपाळ, साधना आमटे, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे..यांचा उल्लेख, साधना आमटे यांच्याशी गप्पा, कंबोडिया येथील जंगलातील खेडेगावात जन्मलेल्या - सोमाली माम यांच्या जीवनाबाबत संघर्ष कथावाचन झाले.सरस्वती, लक्ष्मी आणि गौरी - यांचा त्रिवेणी संगम एकवटलेल्या - सौ. सुधा मूर्थी - यांचा कार्य आणि जीवनाबाबत माहिती  ऍसिड अटॅक मधून वाचलेली आणि जिद्दी आणि इतर मुलींना जगण्याची प्रेरणा देणारी लक्ष्मी आगरवाल, अरुणिमा सिन्हा एवरेस्ट सर करणारी -कहाणी कथन केली. १९७१ सालच्या युद्धातील - सहमत - सिक्का य...

All Pathies are hand in hand -डॉ. शमा देशपांडे

  22 फेब्रुवारी २०२५ - कर्नल्स क्यूब संस्थेने - All Pathies are hand in hand -या विषयावर - डॉ. शमा देशपांडे यांचे व्याख्यान आयोजित केले होते.  आज दासनवमी - निमित्य श्री रामदास स्वामी चरणी वंदन करून आपल्या भाषणाची सुरुवात आरोग्यबाबत जागतिक आरोग्य संस्था आणि आपल्या संत, पतंजली .. मंडळी यांचे विचार सांगितले.  ७०% आजारांना औषध नसते. वेळ दिला तर बरा होतो. सत्तरटक्केपैकी -४०% आजार मानसिक - सायकोसोमॅटीक.. ३०% आजार विषाणू, रोगप्रतिकारशक्ती.. ३०% आजार आरोग्य निदान चाचण्या गरज असते. फॅमिली डॉक्टर गरज, फायदे, तिन्ही pathy -आयुर्वेद, होमिओपॅथी, अल्लोपथ्यी - यांची गरज, फायदे,कमतरता याबाबत विचार मांडले. सध्या गुगलोपॅथीचा जोर वाढत आहे.  बरेच रोगी गुगलचा वापर अनाठायी गैरवापर करून आपले आरोग्य धोक्यात घालवत आहेत याबाबत चिंता व्यक्त केली. काही निवडक आजारावर - होमिओपॅथी कशी जास्त गुणकारक आहे  फक्त patience हवे..ब्लू झोन - आरोग्य दायी वातावरण -पाच देश्याबाबत माहिती दिली. आपल्या देशातसुद्धा काही ऋषी,मुनी, साधू  शंभरी पार केलेले महाकुंभ येथे डुबकी मारून हजेरी लावली आहे.  आपल...

माझे वाचन -4

  गोष्ट  पैशापाण्याची "-   ले. प्रफुल्ल वानखेडे   सकाळ' च्या "अवतरण" पुरवणीमधली प्रफुल्ल वानखेडे यांची गोष्ट पैशापाण्याची ही लेखमालिका गाजली होती. त्या लेखाचे पुस्तक सकाळ प्रकाशनाने घेतला. पैश्याचे नियोजन, खर्च, बचत, गुंतवणूक, कर्ज,जोखीम,  या आणि अनेक आर्थिक बाबीबाबत आपले विचार उत्तम प्रकारे मांडले आहेत.  व्यावसायिक मंडळींना आपल्या व्यवसाय सांभाळताना आलेले बरेवाईट अनुभव आणि त्यातून काय शिकावे याबाबत विस्तृत लेखन पुस्तकात आहे. जवळजवळ ३१ लेखांचा समावेश पुस्तकात आहे. श्रीमंतीचा दिखाऊपणा, पुस्तकवाचनातून अर्थसाक्षरतेकडे, माणुसकीतील गुंतवणूक, डाउन टू अर्थ, माणुसकीची श्रीमंती, प्रवास करा जगभर, व्यवहार लॉक - अनलॉक, जाणितो महत्व वेळेचे... हे लेख मनास भावून जातात. माझ्या निवृत्तीनंतर  साहित्यिक आणि वाचनप्रेमी मैत्रीण सौ. माधुरी देशमुख यांनी मला हे पुस्तक भेट म्हणून दिले. ही "मौल्यवान" भेट संग्रही ठेवण्याजोगी आहे. सर्वानी हे  Best Seller - पुस्तक जरूर वाचावे. 

१३ फेब्रुवारी - रेडिओ दिन .

  १३ फेब्रुवारी - पहाटे रेडिओवर  पुणे आकाशवाणी केंद्र लावले होते. आज रेडिओ दिन ...रेडिओचा वाढदिवस.. माझे मन बालपणी काळात गेले.  घरी मोठा रेडिओ (४ बँडचा) (तेव्हा TV नव्हता - हा रेडिओ म्हणजे छोटा TV ). पहाटे सांगली आकाशवाणीवर ट्यूनने सुरुवात होई.  स्तोत्र, सनई,बातम्या,भक्तीगीत, चिंतन यांनी सकाळची सुरुवात. चालू घडामोडीवर चर्चा, श्रुतिका, भारतीय संगीत, बातम्या यांनी दिवसाची सांगता..   इतरवेळी क्रिकेटची, हॉकीची  कॉमेंट्री, सोमवारी बिनाका संगीत, चित्रपट गीत,.. कार्यक्रम.. कधीकधी रेडिओ आवाज येत नसल्यावर आम्ही मुले दोन्ही बाजूने हाताने कधी हळुवार कधी जोरात फटके मारत असू.  कधी पूर्ण आजारी पडल्यावर वर रेडिओस डॉक्टरकडे दाखवायला घेऊन जात असे. गावात एकच दुरुस्ती दुकान.. तेव्हा बरीच रेडिओ यांची गर्दी.  दुकानदार आज नाही उद्या असे चालढकल करे. आम्हाला बऱ्याच चकरा मारायला लागे. कधीकधी माझी मोठी बहीण दुकानात येऊन अजून का रेडिओ झाला नाही असे विचारायला आल्यावर रेडिओ घरी येत असे. क्रिकेट वेळी आम्ही रेडिओला खूप मिस करीत असू.  पुढे नोकरीनिमित्य पुण्याला आल्यावर...

स्वेच्छा निवृत्ती कार्यक्रम

  मी आज स्वेच्छा निवृत्ती घेत आहे. मला आज कै. सुभाष सरांची आठवण येते. मला त्यांच्याबरोबर काम करत असताना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. ऑफिसमधील काम करण्याऱ्या सर्वांचे ते आपुलकीने काळजी घेत अडीअडचणीवेळी घरच्यासारखे मदत करत असत. नवनवीन  गोष्टी शिकणे, परोपकारीवृत्ती, पैश्याचा योग्य नियोजन आणि विनियोग, उत्साह.. या बाबी मला अधिक भावून गेल्या. कै. सुभाष सरांना जीवन गौरव पुरस्कार मिळाला हे अनगळ ग्रुप मध्ये काम करणारे कर्मचारी , अनगळ परिवार यांच्यासाठी अभिमानास्पद आणि कौतुकास्पद बाब.  या पुरस्कार सोहळा कार्यक्रम क्षणाचा आनंद मी कधीच विसरू शकत नाही. काय योगायोग पहा त्यांना जीवन गौरव पुरस्कार याच वास्तूत दिला गेला आणि आज निवृत्ती सोहळा पण याच वास्तूत .. मला आशीर्वाद देण्यासाठी श्री सुभाष सर येथे नक्कीच असणार यात शंका नाही... कै. सुभाष सरानानंतर - श्री दिलीप आणि श्री नितीन सर यांनी अनगळ ग्रुपचा व्यवसाय उत्तम रीतीने सांभाळला.  आता तिसरी पिढी - सोनिया मॅडम, सोहनसर - करण आणि रिया - ही तरुण मंडळी नवनवीन कल्पना आणि जोमाने अनगळ ग्रुप ची धुरा वाहत आहे...

माझे वाचन -3

Image
  "सत्ता, भ्रष्टता आणि भगवदगीता" - न्या. धनंजय देशपांडे  आजच्या मोहमायी आणि भ्रष्ट राजकारण परिस्थिती मध्ये समाजाच्या प्रगतीसाठी भगवदगीता च उपयोगी पडते याबाबत न्यायधीश धनंजय देशपांडे यांनी आपले विचार व्यक्त केले आहेतकाही अध्यायातील काही महत्वाचे गीतेतील विचार यावर विस्तृत प्रकाश टाकला आहे.. मोह, आत्मज्ञान, कर्मयोग रहस्य, कर्मसंन्यास योग, दहाव्या अध्यायातील विभूती (६७ विभूती) , १२ व्या अध्यायातील भक्त आणि भक्तीची लक्षणे, स्थितप्रज्ञ, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, यावरचे विवेचन वाचनीय आहे.

माझे वाचन -2

Image
  "माझ्या खुणा माझ्या मला" - डॉ. सरोजिनी बाबर. पूर्वी सह्याद्री दूरदर्शन केंद्रावर संध्याकाळी "रानजाई" हा कार्यक्रम आमची आई न चुकता पाहत असे. यात शांता शेळके आणि सरोजिनी बाबर यांच्यात लोकगीत जुनी खेडेगावातील विविध सणसमारंभ यावेळी गायली जाणारी गाणी आणि ओव्या यावर चर्चा .. मी पण हा कार्यक्रम बघत होतो. यातील ओव्या आणि गीत ऐकायला बरे वाटे. त्यावेळी सरोजिनी बाबर म्हणजे फक्त एक कवियत्री/लेखक एवढीच काय ते ज्ञान.  हे आत्मचरित्रपर पुस्तक वाचल्यावर लोकजीवन,कला, राजकारण, समाजकारण, साहित्य या क्षेत्रात केलेले कार्य याबाबत अधिक माहिती कळाली.   नामवंत राजकारणी आणि साहित्यिक मंडळी यांच्याशी डॉ सरोजिनी बाबर यांचा दांडगा संपर्क आणि मैत्रीचे नाते होते.  आपल्या प्रत्येक कामात त्यांना त्याच्या वडिलांचा पाठिंबा आणि मार्गदर्शन लाभले. आपल्या उत्तम वर्क्तृत्व कलेमुळे अनेक सभा, विधानसभा आणि राज्यसभा गाजवून सोडली.  आणि मान्यवरांची वाहवाह मिळवली. भारतीय लोकसाहित्य यात अभ्यास करून लोकसंस्कृतीचा ओळख याबाबत प्रबन्धलेखन केले.  अनेक ललितलेख , कविता, गाणी लिहून मराठी साहित्यात मो...

माझे वाचन -१

Image
  "सुखाची एक पाकळी"  - रविंद्र पिंगे  हा ललितकथा संग्रह.  यात सप्तेश्वर,गरुडेश्वर, सिद्धेश्वरस्वामी कल्याणमंटप, विजापूर या भागाचे प्रवास वर्णन. आपल्या वडिलांबाबत कृतज्ञता भावना सुंदर आठवणी, लेखन, लेखक, लेखन कला याबाबत ललित. आपल्या कथेबाबत वाचकांचे अनुभव आणि प्रतिक्रिया मनास भावून जाते. आपले मनोगत खूप छान आहे. सर्वच लेख वाचनीय आहेत.  हे पुस्तक माझ्या धाकट्या भावाच्या बदली वेळी त्याच्या ग्रंथालयातून माझ्या दारी आले. भावाने ०७.०९.२००६  भोपाळ ते रतलाम प्रवासात हे पुस्तक वाचले. १८ वर्षांनी मी हे वाचले.  पुस्तकाचा प्रवास .. खूप आनंददायी  नेहमीच असतो.. नव्या वर्ष - पुस्तक वाचन प्रवासाचा श्रीगणेशा छान झाला.