Posts

Showing posts from November, 2026

माझा वाढदिवस - 24.09.2026

Image
  २४ सप्टेंबर २०२६ - प्रथम श्री दत्तगुरु, श्री चतुःश्रींगी देवी दर्शन आणि नंतर  गणेशखिंडी येथील श्री गणपतीचे दर्शन घेतले.  वाढदिवसानिमित्य देवीकडे /  देवाकडे कृतज्ञता  व्यक्त करून आशीर्वाद मागितले.  देवदर्शनानंतर  सौ वर्षा आणि श्रेयससह पॅव्हिलिओन मॉल येथे फेरफटका मारला. मॉल येथे प्रथम टाइम्स झोन येथे विडिओ गेम्सचा आनंद लुटला. आजबाजूचे नुसते विंडो शॉपिंग करत रमत गमत फूड कोर्ट येथे पेट पूजा केली. PVR  सिनेमागृहात "हनुमान अंश" हा सध्या गाजत असलेला  हिंदी सिनेमा पाहिला. बऱ्याच दिवसांनी चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहिला. सिनेमा आवडला. संध्याकाळी डेक्कन, FC  रोड येथे विंडो शॉपिंग आणि चालणे झाले.  श्रेयसच्या जुन्या कंपनीमधील तिघी मैत्रिणीच्या कंपनीमध्ये "शिवसागर" हॉटेल मध्ये भोजनाचा गप्पा मारत आस्वाद घेतला.  त्याच्या तिघी मैत्रिणींपैकी दोघींच्या नावात "शिव"  असल्यामुळे त्याने बहुतेक "शिवसागर" हॉटेलची निवड केली असावी.  तिघी अगदी घरच्यासारख्या आहेत. तिघीनी हॉटेलमध्येच दहा मिनटात मला एक सुंदर भेट दिली (thanks to digital world...

वाचन कट्टा - 32 - क्षमा - सहना विजयकुमार अनुवाद अपर्णा नायगावकर.

Image
  क्षमा - सहना विजयकुमार  अनुवाद अपर्णा नायगावकर. लेखिका सहना विजयकुमार यांची ही पहिली कौटुंबिक नीती मूल्यावर आधारित कादंबरी. आपला संसार आणि वर्गमित्र वरील  प्रेम  यांच्या द्वंदात  मध्ये पल्लवी सापडते. तिच्या मनाची घालमेल आणि इतर अवस्था त्यांचे वर्णन या कादंबरीत केले. या कादंबरीचा अनुवाद अपर्णा नायगावकर यांनी उत्तम केला आहे.  या लेखिकेची "कशीर"  ही कादंबरी पण काश्मीर मुद्द्यावर आहे. दोन्ही पुस्तके वाचनीय आहेत. हवाईसुंदरी विचित्र आवाजात म्हणाली, "मॅम, तुमचा ब्रेकफास्ट घ्या." तिनं खाण्याची प्लेट पुढे केली; पण मला खायची इच्छाच नव्हती. "नो, थैंक्स." असं म्हणून मी ती नाकारली. मग तिनं चहा, कॉफी असं काही हवं आहे का, असंही विचारलं. नको सांगून तिला पिटाळून लावलं. समोरच्या टीव्हीवर आमचं विमान कुठून चाललं आहे, ते पाहत बसले. खाली समुद्र, वाळू होती वाटतं. काही समजत नव्हतं. कानाशी गुय.. असा आवाज येत होता. रेल्वेची आठवण आली. किती मजा यायची रेल्वेचा प्रवास करताना. म्हैसूरहन नंजनगुडीला जायचं म्हणजे केवढा उत्साह असायचा. पुलावरून जाताना गाडीचा धडकधडक असा आवाज मोठ्यानं ये...

वाचन कट्टा - 3 1 - मी कोकणचो डॉक्टर - डॉ. दिलीप कुलकर्णी.

Image
  मी कोकणचो डॉक्टर  -  डॉ.  दिलीप कुलकर्णी. कोकणातील तळेरे या छोट्या गावी डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांनी वैद्यकीय सेवासाठी दवाखाना काढला. आपल्या व्यवसायातील कोकणी माणसे, दवाखान्यातील पेशंट, कर्मचारी, रिक्षावाले आणि इतर कोकणी लोकांचे अनुभव, आठवणी आणि गंमतशीर किस्से या पुस्तकातून वाचायला मिळतात. हे पुस्तक वाचताना आज काही ठिकाणी हसू  येते तर कधी डोळ्यातून पाणी येते. कोकणातील खेडेगावातील ग्राम संस्कृती यांचे उत्तम दर्शन येथे पाहायला मिळते. डॉक्टर व्यवसायातील लोकांनी जरूर हे पुस्तक वाचावे. पुस्तक वाचनीय आणि संग्रही ठेवण्यात यावे.

वाचनकट्टा -30 - वाटेवरच्या सावल्या - ग दि माडगूळकर

Image
  वाटेवरच्या सावल्या   - ग दि माडगूळकर  ग दि मा यांच्या आत्मचरित्र मनोहर मासिकातून प्रसिद्ध होत होते. त्याचे पुस्तक.  आपल्या बालपणीच्या आठवणी, इतर चित्रपट क्षेत्रातील गाजलेल्या दिग्दर्शक आणि कलाकार, लेखक, गायक यांच्या काही आठवणी आणि अनुभव  लेखकांनी पुस्तकात व्यक्त केले आहेत.  आपले आई-वडील, पत्नी आणि संसार बाबत काही आठवणी नमूद केल्या आहेत.  पुस्तक वाचनीय आहे. 

वाचनकट्टा - 29 बुकमार्क - ले. प्रज्ञा ओक

Image
  बुकमार्क - ले. प्रज्ञा ओक  लेखिकेच्या जीवनात भेटलेली माणसे - त्यांचा स्वभाव, भावलेले विशेष गुण, आठवणी यांचा सुंदर संग्रह. हे पुस्तक वाचनीय आहे.  यातील सर्वच लेख आवडले.  पुस्तकाच्या शेवटचा लेख - माणसं - भावून गेला. जयश्री फडणवीस यांच्या लेखातील काही भाग -    एक माणूस म्हणून एक कणखर आणि आनंदी स्त्री म्हणून तिची ओळख करून द्यावीशी वाटते. मार्केटिंगसारख्या विषयात तिनं एमबीए केलं असल्यानं अनेक वेळा विद्यार्थिनी तिला विचारतात, "मॅडम, मार्केटिंगसारख्या पुरुषांच्या क्षेत्रात काम करताना तुम्हाला अडचणी येत नाहीत का?" त्यावर जयश्रीचं उत्तर असं असतं - "तुम्ही पुरुषांमधले कोणते गुण अॅक्टिवेट करता, यावर बरंचसं अवलंबून आहे. तुमचा पेहराव, बोलण्यातली सभ्यता आणि परिपक्वता तसंच तुमचा 'सवंग'पणाचा लवलेशही नसणारा वावर यात फार महत्त्वाची भूमिका बजावतो." जयश्री म्हणते,

वाचनकट्टा -28 - स्नेहतरंग - ले. रवींद्र पिंगे

Image
  स्नेहतरंग -  ले. रवींद्र पिंगे  हा एक व्यक्तीचित्रांचा संग्रह .  यातील  - १) अमृता प्रीतम  - निरंतन साहित्यसेवेचा कित्ता , श्रीमती चंद्रा कर्नाटकी - १००  (३)  आशा भोसले - मधुरतम स्वरांचं कारंज  (४) गजानन वाटवे - कविता गायनाचा जरीपटका  (५) अरविंद गजेंद्रगडकर  यांचे लेख वाचनीय.  आशा भोसले लेखातील काही भाग  आशाताई कमालीच्या साधेपणाने वागल्या, बोलल्या, काही तरी सुरुवात करायची म्हणून मी विचारलं, "आपलं गाणं कायम टवटवीत राहावं ह्यासाठी तुम्हा काही पथ्यपाणी करता?"   त्यावर आशाताई म्हणाल्या, पाहा, मी गायिका आहे. परफॉर्मिंग आर्टिस्ट आहे. रोजच्या रोज गाणारी गायिका आहे. म्हणजे मला माझा आवाज ऐवजासारखा जपलाच पाहिजे. माझ्या आवाजावर माझं नि माझ्या कुट्बाच चालत. म्हणून माझा आवाज खराब होणार नाही ह्यासाठी डोळ्यांत तेल घालून असते. पाहा, माझ्या उभ्या हयातीत मी आईस्क्रीमला स्पर्शही केलेला नाही. मी जन्मात कधी थंड पाणी प्यायलेली नाही. माझ्या नातेवाइकांना मी फ्रीज घेऊन दिले, पण माझ्या पोटात फ्रिजमधल्या पाण्याचा एक थेंबही गेलेला नाही. म...

चिंतन - द्वारकानाथ लेले. जीवनाचे उद्दिष्ट काय असावे. पूर्वी सलमान ग्रंडी नावाची कविता होती प्रत्येक दिवशी जीवनाचा एक एक घटना आणि शनिवारी मृत्यू आणि अखेर असा आशयाची. जीवनाचे उद्दिष्ट काय असावे. उद्दिष्ट आपल्या आवडीनुसार बदलते. स्वतः आनंदी राहणे आणि इतरांना आनंद देणे हे जीवनाचे उद्दिष्ट. चांगले खाणे, ऐकणे, सुगंध घेणे, कपडे परिधान करणे हे सर्व ज्ञानेंद्रियांचे साठी. चांगलं बोलून वाचून मनाला आनंद घेणे हे महत्त्वाचे. सामूहिक आनंद द्या. माणसाला विचारशक्ती ही दिली आहे त्याचा उत्तम वापर करणे. पु ल देशपांडे असे म्हणत चरितार्थासाठी पैसा मिळवा. कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात एखादा छंद जोपासा. छंद आपल्याला का जगायचे आणि कशासाठी जगायचे हे सांगतात. वयाच्या पंचविसाव्या वर्षी पर्यंत कसे जगायचे आणि का जगले पाहिजे हे आपल्या शेवटी कळले पाहिजे. आजचे चिंतन आवडले म्हणून शेअर केले. धन्यवाद 🙏

  पुणे आकाशवाणी केंद्र - पुणे आकाशवाणी केंद्र - चिंतन - द्वारकानाथ लेले. जीवनाचे उद्दिष्ट काय असावे. पूर्वी सलमान ग्रंडी नावाची कविता होती प्रत्येक दिवशी जीवनाचा एक एक घटना आणि शनिवारी मृत्यू आणि अखेर असा आशयाची. जीवनाचे उद्दिष्ट काय असावे.  उद्दिष्ट आपल्या आवडीनुसार बदलते. स्वतः आनंदी राहणे आणि इतरांना आनंद देणे हे जीवनाचे उद्दिष्ट. चांगले खाणे, ऐकणे, सुगंध घेणे, कपडे परिधान करणे हे सर्व ज्ञानेंद्रियांचे साठी. चांगलं बोलून वाचून मनाला आनंद घेणे हे महत्त्वाचे. सामूहिक आनंद द्या. माणसाला विचारशक्ती ही दिली आहे त्याचा उत्तम वापर करणे. पु ल देशपांडे असे म्हणत चरितार्थासाठी पैसा मिळवा. कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात एखादा छंद जोपासा. छंद आपल्याला का जगायचे आणि कशासाठी जगायचे हे सांगतात. वयाच्या पंचविसाव्या वर्षी पर्यंत कसे जगायचे आणि का जगले पाहिजे हे आपल्या शेवटी कळले पाहिजे. आजचे चिंतन आवडले म्हणून शेअर केले.  धन्यवाद 🙏. जीवनाचे उद्दिष्ट काय असावे. पूर्वी सलमान ग्रंडी नावाची कविता होती प्रत्येक दिवशी जीवनाचा एक एक घटना आणि शनिवारी मृत्यू आणि अखेर असा आशयाची. जीवनाचे उद्दिष...

चिंतन - श्री चंद्रशेखर फणसाळक - 01.11.2026

  आज सकाळी पुणे आकाशवाणी  केंद्रावर श्री चंद्रशेखर फणसाळकर यांचे चिंतन ऐकले. विपश्यना योग शिबिरास गेलो होतो. श्वास सोडणे श्वास घेणे यावर लक्ष केंद्रित करायचे होते. डोळे मिटल्यावर माझ्या मांडीवर एक मांजर येऊन बसले. एक कुत्रा चालला असता पण मांजर नको मांजर मला आवडत नाही. मी त्याला बाहेर हाकलले. परत थोड्या वेळाने ते माझ्या मांडीवर येऊन बसले. परत मी माझ्या तंबूबाहेर त्याला सोडून आलो. परत ते माझ्या मांडीवर येऊन बसले. असे तीन-चार वेळा घडले. नंतर मी मांजरास  सांगितले तू पण बस आपण दोघे ध्यान करू. असे म्हटल्यावर ते उडी मारून बाहेर निघून गेले परत आले नाही. गौतम बुद्ध म्हणतात "आवडत्या गोष्टी मनात राहत नाही पण नावडत्या गोष्टी मनात ठाण मांडून बसतात." मांजराचा अडथळा नव्हता पण मांजराविषयी नावड ही मनात ठाण मांडून होती. ती नावड स्वीकारल्यावर अडथळा दूर झाला. आवडत्या गोष्टीचा स्वीकार करणे शिकायला पाहिजे. आजचे चिंतन चिंतनशील होते. मला आवडले म्हणून आपणास शेअर केले. धन्यवाद

वेबिनार - "पालकांचा मुलांच्या वैवाहिक आयुष्यातील सहभाग: जवळीकही, मोकळीकही! "

Image
  दुसऱ्याचा दृष्टिकोन समजून घेणे फार महत्त्वाचे असे उद्गार डॉ. अरुणा कुलकर्णी यांनी  "पालकांचा मुलांच्या वैवाहिक आयुष्यातील सहभाग:  जवळीकही, मोकळीकही! " या वेबिनार कार्यक्रमात व्यक्त केले. नात्यांमध्ये स्पर्धा नको. " Catch them good  "  या म्हणीप्रमाणे आपल्या पाल्यातील चांगले काय आहे हे बघा.  त्याचे कौतुक करा. प्रत्येकाने एकमेकांना व्यवस्थित ऐकून घेणे गरजेचे आहे. ऍक्टिव्ह लिसनिंग फार महत्त्वाचे. सध्या पेशन्स कमी होत चालला आहे. आपणास  जन्मापासून नकारात्मक गोष्टीचा  विचाराची सवय लागली आहे. नात्यामधील "इगो" बाजूला ठेवून पहिले पाऊल पुढे आपण ठेवूया.  Focus on  co-operation and not कंट्रोल.  वय वाढल्यावर Impatience  वाढतो. लेट गो करायला शिका. Learning to let go leads to let us go . पाल्याशी  उत्तम सुसंवाद साधा. आजकाल कम्युनिकेशन चॅनेल ओपन ठेवणे हे आव्हानात्मक  झाले आहे.  ओपन अटीट्युड ठेवा. आजकाल मुलं मुली ओपन होत नाहीत. "मुल"  होण्याबाबत हा मुद्दा आपल्याला का महत्वाचा वाटतो त्यावर चर्चा करा आजकाल काळ बदलेला आहे....