Posts

Showing posts from December, 2021

अनिल भाटे - एक कौटुंबिक मित्र

  आज अनिल भाटे याचा निवृत्तीदिन्याच्यानिमित्य आपण शुभेच्छा देण्यासाठी आपण जमलो आहोत.  अनिल हा माझ्या मोठा भाऊ सुहास याचा ऑफिस सहकारी मित्र.  बँकेत नोकरीनिमित्त पुण्यात आलो असताना १९८५ साली आमची ओळख झाली. सांगवी येथे राहत असताना आमचा ५-६ मित्रांचा ग्रुप जमला होता. डेक्कन जिमखाना येथील "लकी " या हॉटेलमध्ये आम्ही अधूनमधून संध्याकाळी ६ वाजता एकत्र जमत असू. चहा पे चर्चा/गप्पा घडत.  मेहेंदळे गॅरेज येथे तो राहत असे.  शनिवार/रविवार आम्ही खानावळीचा एकत्र डब्बे, चहा भाजी/क्रीमरोल, सिनेमा असा कार्यक्रम असायचा.  एकदा सांगवी ते मेहंदळे गॅरेज चालत गेलो होतो. त्याच्या खोलीत आम्ही  TV वर बजेट, टेनिस/फुटबॉल मॅचेस पाहत असू.  शेयर्स गुंतवणूक वर चर्चा घडे. आंब्याचा मोसमात  एक पेटी आंबे आणून आमरस कार्यक्रम असे. नोकरीत नव्याने रुजू झाल्यावर - ऑफिसला जाताना दररोज दाढी कर, इनशर्ट,बेल्ट,बूट आणि बुटाला पोलिश ..वगैरे सल्ला मला देत असे.. आमच्या घरगुती कार्यक्रमात हजर राहून मनापासून सर्व कार्यात मदत करीत असे. आम्ही सात भावंडे - प्रत्येकाच्या विवाह सोहळ्यात अनिलचा सक्रिय ...

माझी लाडकी सखी स्कुटी

Image
  १५ वर्षावरील दुचाकी गाड्या रद्द करणार अशी बातमी वर्तमानपत्रात वाचली.  घरी स्कुटी विकून दुसरी नवी गाडी घ्या अशी चर्चा सुरु झाली.  हे ऐकून मला आणि माझ्या लाडक्या स्कुटीला वाईट वाटले. माझे मन पण नवीन गाडी नको असेच होते.  नंतर नवीन आदेशानुसार १५ वर्षावरील गाड्यांना पुढे ५ वर्षाची परवानगी मिळाली पण RTO एक्स्टेंशन घ्यावे लागणार.  ही बातमी वाचून मला आनंद झाला.  माझ्या स्कुटीने मी परत पुढची ५ वर्षे शिकणार असा आग्रह धरला. ४ सप्टेंबर २००६ रोजी स्कुटी माझ्या दारी आली.  माझ्या चिरंजीवाच्या दहावी/बारावी/ उच्च प्रवेश - क्लास, परीक्षा  यासाठी दूरवर वेळेत पोचवणे हे काम तिने केले. यावेळी माझी अजिबात परीक्षा घेतली नाही.ऊन, पाऊस, थंडी या तिन्ही ऋतूत मला कधीही त्रास दिला नाही.  अगदी बारश्याच्या कार्यक्रम  ते वैकुंठभूमी कार्यक्रम हजेरी असो मला प्रत्येक कार्यक्रमाच्यावेळी वेळेत पोचवण्याची जबाबदारी उत्तम पार पडली.अगदी धो धो पाऊसात घोट्याभर पाण्यातून मला सुखरूप इच्छित स्थळी पोचवले आहे. घरातून ऑफिसला आणि ऑफिसमधून घरी निघताना घरी अगर ऑफिसमध्ये काही वादावादी झाल...

सासुरवाडी नातलगांचे संमेलन

Image
                                                      आमच्या सासुरवाडी नातलगांचे संमेलन "Gubbi Goodu" रिसॉर्ट बंगलोर येथे 11 डिसेंबर ते 13  डिसेंबर रोजी आयोजित केले होते. शनिवारी रिसॉर्ट येथे आगमन वेळी आमचे औक्षण केले गेले. सर्वाना "Family  Fun " याचे T - शर्ट आणि कॅप यांचे वाटप झाले. दुपारी संगीत खुर्ची, संध्याकाळी क्रिकेट खेळ,  कॅरम, टेबलं टेनिस, संध्याकाळी कॅम्प फायर यावेळी सर्व मंडळींना आवडते गाणे, विवाहित स्त्रियांना आपल्या पतीचे थोडक्या शब्दात वर्णन, करावके गाणी कार्यक्रम  झाला.   रविवारी सकाळी Hat game  - समोरासमोर उभे राहून आपल्या साथीदाराची टोपी दुसऱ्या साथीदाराने काढून तिसऱ्याच्या डोक्यावर घालणे. music बंद झाले असताना ज्याच्या कडे टोपी असेल ते दोघेही बाद. या खेळात खूप मजा आली. गाण्याच्यावेळी नाच..पोहणे आणि रेन डान्स याचा आनंद घेतला. संध्याकाळी प्रत्येक आजी आजोबानी डोळ्यावर पट्टी बांधून आपापल्या नातवंडांना हाताच्या ...