Posts

Showing posts from November, 2022

सुनहरी यादे

Image
  कर्नल्स क्यूब यांनी सुनहरी यादे जुन्या  हिंदी गाण्याच्या कार्यक्रम आयोजित केला होता. गायक डॉ.सौ. अनघा राजवाडे आणि श्री संजय मरळ होते. कार्यक्रमाची सुरुवात २६/११ च्या हुताम्यांना श्रद्धांजली वाहिली गेली. प्रथम अनघा राजवाडे यांनी  सत्यम शिवम सुंदरम  या गाण्याने गाण्याची सुरुवात झाली. रोमँटिक गाण्यामध्ये - ना तुम हम जाने, जो वाद कियाथा निभाना पडेगा, रहे ना रहे हम, नखरेवाली,   बाबूजी धीरे चलना,  आजसे पहिले आजसे जादा, सैया चलके छम छम, प्यार हुआ एक रार..याद किया तो . कहा हो तुम..तुझे जीवन की दोर से बांध, गाणी गायली.  कव्वालीचे - है मेरी जोहर जबी ,,निगाहे निगाहे जी चाहता ..आणि गझल मध्ये रात है फुलों की..डम डम डिगा,, किसिकी मुस्कारो ... जीना इसिका नाम ..लावणीमध्ये चंद्रा - रात रंगी रंगुनी ..हाल कैसा है जनाब का .. कार्यक्रमाची सांगता श्री संजय मरळ यांनी  भैरवी गाणे लागा चुनरी मे दाग यांनी झाली. दोघा गायकांनी तलत मेहूबुब , लता, किशोर, महंमद रफी, मुकेश, सुमन कल्याणपूर,  श्रेया घोषाल ..यांनी गायलेली गाणी म्हणून  रसिकांना सुरात चिंब भिजवून सोड...

मी काय वाचले - 18

Image
  स्वर्णीम बचपन  - ओशो - एक बुद्धपुरुष का विद्रोही बचपन - हे हिंदी पुस्तक. Glimpses of  a Golden  childhood  - या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद.   आपल्या आजी - आजोबा यांचेबरोबर पहिले ९ वर्ष राहिले. कुचवाड गावातील निसर्ग कुशीत त्यांचे बालपण गेले.  स्वातंत्र्य  त्यांना बालपणी होते. काही चुकले तरी त्यांची आजी त्यांच्या पाठीशी कायम असायची. ओशोंचे बालपण जगण्यासाठी मोठे साहस आणि हिम्मत हवी. - "मधुमालती" झाडाची आठवण.  संसारात संवादाला महत्व.  पूर्वजन्मीची आठवण- एक गरीब पण दाम्पत्याची निवड - दोघे एकमेकाप्रति प्रेमळ आणि संतुष्ट पण गरीब दाम्पत्य.. आपल्या आई-वडिलांना एकदाही भांडलेले पाहिले नाही असे ओशो सांगतात. - पत्नी आणि स्त्री फरक - पत्नी "विकर्षित" करती है.  स्त्री "आकर्षित" करती है. सातव्या वर्षी "बुद्ध" होणार ही भविष्यवाणी.  - बुद्ध चा अर्थ खूप बुद्धिमान समजूतदार व्यक्ती.  ओशोंचा भविष्यावर अजिबात विश्वास नाही. पाचव्या सत्रात पुस्तकात - नमो अरिहंतानं नमो नमो - जैनांचा मंत्र याचा अर्थ विस्ताराने सांगितला ओशोंनी मृत्यूनंतर अग्नी द...

श्री अनिल देवधर ७५ वा वाढदिवस सोहळा

Image
  20 नोव्हेंबर २०२२ - आज श्री अनिल देवधर यांच्या ७५ वा वाढदिवसानिमित्त अंतराह हॉल विक्रोळी मुंबई येथे कार्यक्रम आयोजित केला होता.  सकाळी होम हवन विधी शास्त्रोक्त कोकणातून गुरुजींनी पार पाडले. याप्रसंगी तुलाभार विधी झाला.  तुलाभारातील शिधा हॉलनजीक असलेल्या" वात्सल्य"  या संस्थेस  दान म्हणून दिली गेली.  नंतर विशेष बनवून घेतलेला सुंदर थीमचा (बाबा आणि आजोबा) केक कापण्यात आला.  त्यांच्या एका नातेवाईकांनी एक सुंदर चित्रफीत बनवली होती. ७५ वर्षी अमृतकलाशातून अमृत प्राशन करून - १०० व्या वर्षी औदुंबर झाडाखाली बसलेले देवधर ,,ही संकल्पना खूप छान होती.  श्री देवधर यांच्या नातेवाईक आणि मित्रमंडळी यांनी कॅट वॉक करत स्टेज वर येऊन उत्सवमूर्तीस शुभेच्छा देऊन फोटो कार्यक्रम होता. कविता वाचन, देवधर यांच्याविषयी आपल्या भावना मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी व्यक्त केल्या. भाग्यद लक्ष्मी .. हे कानडी गाणे, नातवंडांनी आजोबाबाबत दोन शब्द व्यक्त केले. सौ देवधर यांनी ४३ वर्ष सहजीवन, आपल्या पतिदेवांचे गुणांचे वर्णन, परोपकारी स्वभाव..या शब्दांचा सुंदर फुलांची अनोखी भेट दिली. मुलीं...

श्री देवधर साहेब 75 -वाढदिवस

Image
   ७५ व्या वाढदिवस कार्यक्रमासाठी आम्ही पुणे- बोरिवली बस ने प्रवास सुरु केला. बसमध्ये बसल्यावर देवधर साहेब यांचावर काय बोलावे हा विचार. विचार करता करता सायन circle स्टॉप कधी आला कळले नाही. सायन Circle  आल्यावर मला Circle ऑफिस येथील आठवणी जाग्या झाल्या.माझे मन कॅनरा बँकेत  LBA  Section Circle Office सायन येथे काम करत असताना दिवसात गेले. आमच्या विभागातील माझे  सारे सहकारी मित्र आणि मॆत्रिणी यांच्या एकमेकांची चेष्ठा-मस्करी, सुखसंवाद,कॅन्टीनमधील विशेष भजी यावर गप्पा मारत ताव मारणे  विभागात खूप मजा असायची.  आमच्या विभागाचे श्री देवधर साहेब हे कधीच साहेब बॉस या नात्यांनी न वागता ते नेहमीच  आम्हा सर्वांचे "मित्र" या नात्यांनी वागून त्यांनी आमच्या विभागाचे सौंदर्य वाढवले होते.  आमचा विभाग ऑफिसच्या प्रवेशद्वाराच्या अगदी उजव्या बाजूस होता.  तेव्हा येता जाता सर्वाशी ते नेहमीच हसतखेळत सर्वाशी बोलून चौकशी करत.  ऑफिसमधील अगदी पार्ट time स्टाफ पासून उच्च पदावरील वरिष्ठ (GM ) यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते.  सर्व शाखाप्रमुखाशी त...

अनगळ अँड कंपनीचा 56 वर्ष पूर्ती आणि दिवाळी सोहळा कार्यक्रम

Image
  21 ऑक्टोबर 2022 रोजी अनगळ अँड कंपनीचा  56 वर्ष पूर्ती आणि दिवाळी सोहळा  कार्यक्रम आयोजीत केला होता.     अनगळ कंपनीची स्थापना आणि 56 वर्ष वाटचाल पूर्ण केलेली बांधकामे याबाबत माहिती दिली. कंपनीच्या व्यवसायात यशस्वी भरारी घेताना ज्यांनी आपले योगदान देऊ केले असे सल्लागार,सप्लायर,कॉन्ट्रॅक्टर,.. यांना सर्वांना पदक देऊन कौतुक केले. याप्रसंगी विशेष 💐सन्मान आणि सोनिया madam क्रेडाई च्या पदावर निवडीबाबत सन्मान करण्यात आला. श्री सुभाष अनगळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सोनिया मॅडम विशेष सन्मान आणि इतर कार्यक्रमा बाबत आपले विचार व्यक्त केले. नेहा मॅडमनी कविता सादर केली. सोहन अनगळ यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा मॅडमनी उत्तम👌 केले. कार्यक्रमची सांगता चविष्ट👌 भोजनांनी झाली. अनगळ कुटुंबीय आणि सर्व कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम उत्तम आणि आनंदात पार पडला. आपल्या सर्वांचे असेच सहकार्य लाभो आणि कंपनीची  भविष्यात भरभराट हो हीच श्री चतु: श्रुंगी देवीस प्रार्थना. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..🙏🙏

मी काय वाचले - 15

Image
  मला हे सांगायला हवं - मृदुला भाटकर  लेखिका न्यायमूर्ती आणि प्रसिद्ध मराठी नट रमेश भाटकर यांची पत्नी.  रमेश भाटकर याना बलात्काराच्या खोट्या केसमध्ये गुंतवले गेले होते.  या दरम्यान भाटकर कुटुंबियांना झालेला मानसिक आणि शारीरिक त्रास  याबाबत लेखिकेने सांगितले आहे.  या पुस्तकात कायदेशीर तरतुदी आणि इतर माहिती पण लिहिली आहे.  स्वतः न्यायाधीश असल्यामुळे त्यांची झालेली  घालमेल आणि समाजात झालेला अपमान, हाल .. हे वाचताना मनास वाईट वाटते.  शेवटी या कायद्याच्या लढाईत भाटकर यांचा विजय होतो आणि ते निर्दोष सुटतात. हे पुस्तक जरूर वाचावे. 

मी काय वाचले - 14

Image
  " सागरतळाशी "  - ले. सुजाता लोखंडे  आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर भेटलेल्या सर्वसामान्य व्यक्तीपासून त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या व्यक्तीवर सुजाता लोखंडे यांनी लेख लिहिले आहेत. आपले आईवडील, गुरुजन, परिचारिका म्हणून काम करताना हॉस्पिटलमधील वरिष्ठ, कनिष्ठ आणि इतर सहकारीमंडळी यांचे भावलेले गुण लेखिकेने उत्तम शब्दांकन केले आहेत.  लेखिकेने सागरतळाशी - शंखशिंपल्यासोबत मोतीसुद्धा शोधून काढले आहेत. या पुस्तकास सुप्रिया अय्यर यांची प्रस्तावना लाभली आहे. सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करताना आपली संसार आणि इतर व्यापातून अनुभवलेले प्रसंग आणि आठवणी या पुस्तकात आहेत. पुस्तक वाचनीय आहे.