गोल्डन मेमरीज प्रस्तुत स्वरयात्री बाबूजी

 



३०.०७.२०२५  - गोल्डन मेमरीज प्रस्तुत स्वरयात्री बाबूजी - तापपूर्ती सोहळा - बाबूजींच्या स्मृतिदिनानिमित्य त्यांच्या सुमधुर युगलगीतांचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आयोजित केला होता.  दीपप्रज्वलनानंतर प्रो. मिलिंद जोशी यांनी तपपूर्ती कार्यक्रमाबाबत धन्यवाद आणि आगामी वाटचालीसाठी चैत्राली अभ्यंकर शुभेच्छा यांना दिल्या. गेली बारा वर्षे नियमित २९ जुलै दरम्यान बाबूजी यांच्या गाण्यावर आणि संगीतावर  चैत्राली अभ्यंकर विनामूल्य कार्यक्रम करतात. यामध्ये जवळजवळ एकवीस मराठी गाणी गायकांनी गायली.  


1)फिटे अंधाराचे जाळं 2) अनोळखी सिनेमा - धुंद एकांत हा 3) अवघाचि संसार - रूपास भाळलो मी 4) नवीन आज चंद्रमा 5) आम्ही जातो आमच्या गावा स्वप्नांत रंगले मी 6) तुझ्या गळा माझ्या गळा 7) रात चांदणे गंध चंदनी हवास तु 8) धुंदी कळ्या ना धुंदी फुलांना 9) आज चांदणे उन्हात हसले 10) जाशील कोठे मुली तू 11) विठू माउली माऊली तु जगाची 12) असा शालू नेसून नवा 13)  क्षणात कळली क्षणात जुळली तुझी माझी प्रीत जगावेगळी 14) तुलान कळले कसे प्रितीचे धागे जुळले 15) तुझ्या माझ्या संसाराला आणखीन काय हवं 16) माझ्या प्रीती फुला 17) डोळ्यात वाच माझ्या तु गीत माझ्या भावनांचे 18) नको तुला ह्या फुलांची शपथ 19) चंद्र आहे साक्षीला 20) रंगू बाजाराला जाते जाऊ द्या 21) वेदांनाही नाही कळला


त्येक गाण्याची पार्श्वभूमी निवदेन आणि इतर माहिती याबाबत उत्तम निवेदन स्नेहल दामले यांनी केले. निवेदनास बरेच वेळा रसिकाची दाद मिळत होती.  सादर केलेली युगुलगीते सर्व गायकांनी उत्तम गायली. वादकमंडळींनी उत्तम साथ दिली. अनेकवेळा वन्स मोर मिळत होता. सभागृह रसिकांनी भरून गेले होते. एक श्रवणीय कार्य्रक्रमाबाबत चैत्राली अभ्यंकर आणि त्यांच्या ग्रुपला मनापासून धन्यवाद आणि आभार.  कार्य्रक्रम झाल्यानंतर प्रवेशद्वार येथे असलेल्या देणगी बॉक्स मध्ये आशीर्वाद देऊन बाबूजींच्या गाण्याच्या धूंदीत घरी परतलो .

Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा