त्रिकुटेश्वर मंदिर , वीरनारायण मंदिर गदग, बेलधडी राम मंदिर,बेलधडी राम मंदिर, श्री ब्रह्मचैतन्य महाराज आश्रम - हेब्बळी -
त्रिकुटेश्वर मंदिर गदग - हे मंदिर बाराव्या शतकातील चालुक्य काळातील शिव मंदिर. एकाच दगडातून तीन लिंग (ब्रह्मा,महेश्वर आणि विष्णू बनवली गेली आहेत - एका भागात सरस्वती ,गायत्री आणि शारदा देवींची मंदिर आहेत. खांबावर शिल्प कला कोरली आहे. मंदिराचा आवार मोठा आहे. मंदिरापासून जवळ जोड मारुती मंदिर आहे. हे दोन मारुतीच्या वेगवेगळ्या मूर्ती एकाच ठिकाणी आहेत. वीरनारायण मंदिर गदग - हे होयसळा काळातील १२ व्या शतकातील मंदिर राजा विष्णूवर्धन यांनी बांधले. मुख्य मूर्ती नारायण (विष्णू) या देवाची आहे. मंदिराचे प्रवेशद्वार, गोपूर आणि आवारातील वृक्ष, परिसर देखनीय आहे.
वीरनारायण मंदिर गदग - हे होयसळा काळातील १२ व्या शतकातील मंदिर राजा विष्णूवर्धन यांनी बांधले. मुख्य मूर्ती नारायण (विष्णू) या देवाची आहे. मंदिराचे प्रवेशद्वार, गोपूर आणि आवारातील वृक्ष, परिसर देखणीय आहे. या मंदिरातील एका खांबाला टेकून कन्नड कवी कुमार व्यास यांनी महाभारत कन्नड भाषेतून लिहिले. कवींना देवीकडून स्फुर्ती लाभली. गदग गावातील त्रिकुटेश्वर, जोड मारुती, वीरनारायण मंदिर पाहण्याचा योग आला.
बेलधडी राम मंदिर - श्री गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य श्री ब्रह्मानंदमहाराज यांनी राम मंदिर स्थापले. मंदिर, प्रदक्षिणा मार्ग सुंदर आहे. हे मंदिर दुमजली आहे. मेन रस्त्यापासून ५ km वर हे मंदिर आत गावात आहे. येथे बसची सोय दिसत नाही.
व्यंकटपुरा मंदिर - गदग पासून १५ km सोरटुर गावी व्यंकटपुरा मंदिर आहे. एक भक्तास श्री बालाजी तिरुपती येथे जाणे जमत नव्हते म्हणून स्वप्नात श्री बालाजी यांनी दर्शन देऊन शेतातील गायीच्या शेण्याच्या ठिकाणी एक दगडावर बालाजी आणि पद्मावती, दुसऱ्या दगडावर लक्ष्मी प्रगट झाले आहेत. ही स्वयंभू मूर्ती आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार श्री ब्रह्मनंद महाराज यांनी केला आणि येथे साधना केली. या मंदिराचा आवार प्रशस्त आहे. बाजूस भक्तनिवास - राहण्याची सोय आहे. रोज दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद असतो. गदग येथून या मंदिरापर्यंत बसची सोय आहे. आम्ही शनिवार दिवशी गेलो होतो. त्यावेळी कल्याण उत्सव कार्यक्रम सुरु होता. दुपारी पालखीसेवा योग आला. रणरणते उन्हात पाय पोळत होते तरीपण पालखी सेवा पूर्ण कार्यांत देवाचीच कृपा.. यावेळी धोतर नेसावे लागते. या साऱ्या सेवा श्रेय वर्षाच्या चुलत भाऊ श्री वेंकण्णा जाते. काय योगायोग नाव पण वेंकण्णा...या मंदिराच्या आसपास शेती आहे.. काही दुकाने नाहीत. हे ठिकाण अत्यंत प्रसन्न आणि रमणीय आहे
श्री ब्रह्मचैतन्य महाराज आश्रम - हेब्बळी - धारवाडहुन १५ km अंतरावर हेब्बळी या ठिकाणी आश्रम आहे. येथे श्री गोंदवलेकर महाराज यांच्या पादुका आहेत. महाराजांचे शिष्य श्री दत्ताना अवधूत यांनी या ठिकाणी उपासना केंद्र स्थापन केले. गोंदवले येथील आश्रम यांची प्रतिकृती म्हणजे हेब्बळी आश्रम आहे. येथे भक्त निवास आणि दैनंदिन उपासना आणि इतर सेवा चालते. हा आश्रम आणि मंदिर पाहून मनास आनंद आणि समाधान झाले. बरेच दिवसापासून हेब्बळी आश्रम पहावयाचे होते तो संकल्प पूर्ण झाला. श्री राम जय राम जय जय राम ...
जाता जाता वाटेवरील कोळीवाड या गावातील श्री वेंकण्णा यांचे घर, शेत गावास भेट दिली. गावची ग्रामदेवी श्री महामाया देवी मंदिर पाहिले.
धारवाडहून गदग येथील त्रिकुटेश्वर, जोड मारुती, वीरनारायण मंदिर, बेलधडी राम मंदिर, व्यकंटपुरा वेंकटेश मंदिर, कोळीवाड मंदिर, हेब्बळी आश्रम .. या ठिकाणी ट्रिपचे नियोजन करणे याबाबत वर्षाच्या मामी आणि चुलत भाऊ वेंकण्णा याना जाते. एक दिवसाची ट्रिप मस्त झाली
Comments
Post a Comment