All Pathies are hand in hand -डॉ. शमा देशपांडे

 


22 फेब्रुवारी २०२५ - कर्नल्स क्यूब संस्थेने - All Pathies are hand in hand -या विषयावर - डॉ. शमा देशपांडे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. 


आज दासनवमी - निमित्य श्री रामदास स्वामी चरणी वंदन करून आपल्या भाषणाची सुरुवात आरोग्यबाबत जागतिक आरोग्य संस्था आणि आपल्या संत, पतंजली .. मंडळी यांचे विचार सांगितले.  ७०% आजारांना औषध नसते. वेळ दिला तर बरा होतो. सत्तरटक्केपैकी -४०% आजार मानसिक - सायकोसोमॅटीक.. ३०% आजार विषाणू, रोगप्रतिकारशक्ती.. ३०% आजार आरोग्य निदान चाचण्या गरज असते. फॅमिली डॉक्टर गरज, फायदे, तिन्ही pathy -आयुर्वेद, होमिओपॅथी, अल्लोपथ्यी - यांची गरज, फायदे,कमतरता याबाबत विचार मांडले. सध्या गुगलोपॅथीचा जोर वाढत आहे.  बरेच रोगी गुगलचा वापर अनाठायी गैरवापर करून आपले आरोग्य धोक्यात घालवत आहेत याबाबत चिंता व्यक्त केली. काही निवडक आजारावर - होमिओपॅथी कशी जास्त गुणकारक आहे  फक्त patience हवे..ब्लू झोन - आरोग्य दायी वातावरण -पाच देश्याबाबत माहिती दिली. आपल्या देशातसुद्धा काही ऋषी,मुनी, साधू  शंभरी पार केलेले महाकुंभ येथे डुबकी मारून हजेरी लावली आहे. 


आपले आरोग्य चांगले टिकवण्यासाठी - योग्य आहार, विहार,विचार हवा -  डाएट, योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नियमित व्यायाम, शांत झोप, सुदृढ नातेसंबध, अती विचार नको,  स्त्रियांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे - व्हिटॅमिन्स आणि कॅल्शिअम .. जागरूकता, काही महत्वाच्या टिप्स दिल्या. एकांत, एकटेपणा, मृत्यूभय.. याबाबत सांगताना - ध्यान, स्वतःशी संवाद, आपल्या मन आणि शरीर याकडे लक्ष, ध्येयपूर्ण जगणे, Forgive and Forget  - नेहमी आनंदी राहणे, अंतर्मुख प्रवास याबाबत आपले विचार व्यक्त केले. यासाठी आपल्याकडे रेडी syllabus - ग्रंथ (भगवदगीता, ज्ञानेश्वरी...) योग - अष्टांग योग - नामस्मरण - सद्गुरुकृपा - आहे.  


आजचे भाषण हे आध्यत्मिक होते असे मत श्री फुले यांनी आपल्या आभार प्रदर्शनपर भाषणात सांगितले.  खरच आजचे व्याख्यान अत्यंत श्रवणीय होते.. श्रोते तल्लीन झाले होते. कर्नल्स क्यूब संस्थेचे आभार आणि धन्यवाद...



Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा