Posts

Showing posts from January, 2026

"आजी आणि नात - सिनेमा.

  नुकताच "आजी आणि नात" हा सुभाष फडके दिग्दर्शित मराठी सिनेमा पाहिला. आजीला दुरावलेले नातवंडांचे संबध आणि मुलांना घरी आजी नसणे .. या विषयावर आधारित हा सुंदर सिनेमा.. आजीची भूमिका सुलभा देशपांडे आणि नातीची भूमिका - तेजश्री वालावलकर यांनी उत्कृष्ट भूमिका केली आहे.मला आईची आई आणि वडिलांची आई या दोघा आज्यांचे  प्रेम आणि आपुलकी लाभली. मी या दोघांची जमेल तेवढी सेवा केली. तसेच इतर नात्यातील आजी यांचे प्रेम पण मिळाले. बँकेत नोकरी करत असताना लग्नाच्या पूर्वी मी वडगाव बुद्रुक येथे राहत होतो. तेथे एका आजींच्याकडे खानावळ लावली होती. आजी वयस्कर साधारण सत्तरी च्या आसपास होत्या. पण स्वयंपाक पदार्थ उत्तम बनवायच्या. कधी कधी सकाळी डबा घ्यायला गेल्यावर त्यांची तब्येत बरी नाही म्हणून डबा नाही अशा सांगत होत्या. त्यावेळी मी ऑफिसच्या मागच्या गल्लीमध्ये "स्वयंपाक घर"  येथून पोळी, भाजी, आमटी भात असे पदार्थ घेऊन जात असे.. आजींना कधी कधी भाजी आणून देत असे. आजींची आर्थिक परिस्थिती बघता मी जेवणाचे खाडा याचे पैसे कापत नसे. आजींचे एकुलती एक विवाहित मुलगी पेठेमध्ये (स्थळ अर्थात..)  येथे राहत होती. ...

शास्त्रीय गायन बैठक

Image
  १७ जानेवारी २०२६ - श्रीकृपा हॉस्पिटल पिरंगुट आणि बिजनेस कंपास यांनी अखिलेश कुलकर्णी आणि डॉ. सौ. रेवा नातू यांची शास्त्रीय गायन बैठक - कार्यक्रम सहकार सदन भारतीय निवास को-ऑपरेटिव्ह सोसायटी सभागृहामध्ये आयोजित केला होता.  प्रारंभी अखिलेशने भीमपलास राग सादर केला त्यानंतर "आली कुठून अशी कानी" हा अभंग गायला. अखिलेश हा डॉ. सौ. रेवा नातू यांचा शिष्य. डॉक्टर सौ. रेवा नातू यांनी यमन रागातील बंदिशी आणि  द्रुतबंदीशी सादर केल्या. आपला शिष्य अखिलेश याची शास्त्रीय  गायनाची प्रगती आणि सादरीकरण याबाबत कौतुक उद्गार काढले. विशेषता: अखिलेशचा प्रामाणिकपणा त्याचा  रियाजाबाबत कष्ट  यांचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. अखिलेशला गायनाबाबत  प्रोत्साहन याकामी त्याच्या आई बाबा आजी आजोबा आणि इतर नातलग, हितचिंतक यांचे आभार मानले. या बैठकीस संवादिनी, तबला आणि तंबोरा यांची उत्तम साथ लाभली. कार्यक्रमाची सांगता "निघालो घेऊन दत्ताची पालखी"  या गाण्याने झाली. कार्यक्रमाचे निवेदन श्री नरहर गोसावी यांनी केले. डॉक्टर आशुतोष कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले. सभागृहातील रसिकांनी या श...

" माझे अश्वपुराण"

Image
  घोड्यावरची  विविध वैशिष्टपूर्ण माहितीपर - " माझे अश्वपुराण"  हा कार्यक्रम कर्नल्स क्यूब संस्थेने आयोजित केला होता.  सौ. वासंती खाडिलकर यांनी दृकश्राव्य माध्यमातून हा कार्यक्रम सादर केला. लहानपणी शिवाजी महाराज राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याकडे पाहून आणि टांगेवाला यांच्याकडे पाहून घोड्या विषयी  कुतूहल -अधिक माहिती जाणणे याची प्रेरणा मिळाली असे सांगितले.  जगामध्ये जवळजवळ सहा कोटी घोडे आहेत आणि तीनशे जाती आहेत. घोड्यांच्या जात, वंशावळ, घोड्यांचा रंग, वजन, उंची, खाणे, घोड्यांच्या शरीराच्या लकबी, अवयव  या आणि अनेक विषयावर अधिक माहिती सांगितली. घोड्याचे आयुर्मान 20 ते 30 वर्षे असते आणि वजन कमीत कमी  400 किलो ते जास्तीत जास्त अडीच हजार किलो असते. घोडा हा शाकाहारी आहे. उभ्यानेच तो झोपतो. घोडा तोंडाने श्वास घेत नाही. सर्व बुद्धिमान प्राण्यांमध्ये घोड्याचा चौथा नंबर लागतो आणि घोड्याला लाल रंग दिसत नाही.                                            ...

वाचनकट्टा - 1 - " Focus on what matters " -

Image
  " Focus on what matters " - A Collection of Stoic Letters on Living Well  - By Darius Foroux In this book, the author Darius Foroux has written wisdoms of Stoicism into 70 insightful letters and essays dealing with vital topics such as happiness, wealth, health and relationships. This book is a practical guide for mental clarity, peace and purpose.   Stoic philosophy teaches  how to fucus on what is within your control and let go distractions, comparisions and emotional feelings etc.  The book has been categorised into two parts - inner world and other outer world.   Under the inner world - the topics - managing your emotions, thoughts, knowing yourself better, making better decision, living a fulfilled life, building a better version of yourself.  Under the outer world - pursuing wordly success, building weath, managing your career, being with people, dealing with hard time. The book is worth is reading.  Some of exceperts of Book - F...

"जिप्सीचे जीवनगाणे" - पुणे आकाशवाणी

  30 डिसेंबर मंगेश पाडगावकर यांच्या स्मृतिदिन निमित्त पुणे आकाशवाणी केंद्राने वनिता मंडळ या कार्यक्रमांतर्गत "जिप्सीचे जीवनगाणे"  हा श्रेयसी वझे  यांचा कार्यक्रम लावला होता.  मंगेश पाडगावकर यांनी कवितेची ४० पुस्तके.  एक पुस्तकांमध्ये पन्नास  साठ कविता.  त्यांनी  प्रेम, निसर्ग, दासबोध वात्रटिका या विषयावर कविता लेखन केले आहे. त्यांनी अनुवादित साहित्य - मीरा,  कबीर आणि इतर ललित लेख लिहिले आहेत. वेंगुर्लाचा समुद्र आणि निसर्ग यावर त्यांच्या कवितेत ठसा उमटवला आहे. वेंगुर्ला येथे उंच झाड उंच उंच झाडावर बांधलेला झोपाळा या आठवणीवर त्यांनी "सावर रे सावर रे उंच उंच झुला"  ही कविता लिहिली. झोका घेताना त्यांना झोपाळ्यावर बसवले जात असते तेव्हा त्यांना भीती वाटायची. मंगला  खाडिलकर  यांनी मंगेश पाडगावकर यांच्या मुलाखती घेतल्या. त्याबाबत त्यांचे विचार आणि मंदार आपटे यांनी  - या जन्मावर या जगण्यावर या गाण्यावरच्या आठवणी सांगितल्या.  हा कार्यक्रम अत्यंत  श्रवणीय होता. या कार्यक्रमाबाबत पुणे आकाशवाणी केंद्राचे मनापासून आभार धन्यवाद...

ज्योती कलश" - देहबोलीतून कवितेशी संवाद

Image
  कर्नल्स क्यूब संस्थेने "ज्योती कलश" -  देहबोलीतून  कवितेशी संवाद  - असा काव्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. डॉ. ज्योती ढमढेरे  आणि डॉ. अवनी दमदार -  आजी आणि नातीने हा कार्यक्रम सादर केला.  देहबोलीतून कविता जास्त भावते असे विचार डॉ. ज्योती यांनी व्यक्त केले. गणेश वंदना नंतर गवळण, लावणी आणि हिंदी स्वरचित कविता सादर केल्या.  डॉ अवनी ढमढेरे यांनी आपल्या सुरेल स्वरात काही कविता सादर करून साथ दिली.  कविता सादरी करणावेळी डॉक्टर ज्योती यांनी देह बोलीतून  हावभाव सादर करीत कवितेशी संवाद साधला.   राया कसा करू शिंगार या लावणीस महाराष्ट्र साहित्य पहिले बक्षीस मिळाले. बक्षीस कार्यक्रमादरम्यान या लावणीवर  मधू कांबीकर यांनी नृत्य केले या आठवणी डॉ. ज्योती  यांनी जागवल्या.  रंगाच्या  लावणीबाबत बाजीराव पेशवे यांच्यावर केलेली केसरी रंगाची लावणी सादर करून कार्यक्रमाची सांगता केली. गाण्याचे पैलू आणि लावणी याचे विशेष कौतुक करत डॉ. ज्योती रॉक म्युझिक मध्ये लावणी सादर करतील  अशी आशा व्यक्त करीत  कर्नल फुले यांनी  आ...