IPS श्रीमती स्वाती साठे (विशेष कारागृह महानिरीक्षक कारागृह व सेवा महाराष्ट्र) यांचा सत्कार समारंभ

 



९ ऑगस्ट २०२५ - कर्नल्स क्यूब संस्थेने पुण्याचे भूषण असलेल्या IPS  श्रीमती स्वाती साठे (विशेष कारागृह महानिरीक्षक कारागृह व सेवा महाराष्ट्र) यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.  माजी नगरसेविका श्रीमती माधुरी सहस्रबुद्धे यापण मंचावर हजर होत्या.  प्रमुख पाहुण्यांचे स्वागतानंतर आज रक्षाबंधननिमित्य राखीपण बांधण्यात आली.  संस्थेचे सर्वेसर्वा कर्नल फुले यांनी संस्थेबाबत कार्याची अधिक माहिती दिली.  श्रीमती माधुरीताई यांनी स्वाती साठे यांची ओळख करून दिली. कर्मयोगिनी स्वाती यांच्या कामकाजाबाबत आणि त्यांनी हाती घेतलेले उपक्रम, कैद्यांचे पुनर्वसन, कारागृह बाबत workshops  त्यांचे छंद, शिक्षण, कुटुंब याबाबत माहिती दिली.  श्रीमती स्वाती साठे याना मिळालेल्या पुरस्कार आणि गौरव सम्मान यांचा उल्लेख केला गेला. सन्मान पत्र वाचन करून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.


संस्थेने केलेला विशेष सन्मानाबाबत कृतज्ञता व्यक्त करीत स्वाती साठे यांनी सेवेत असताना कारागृहातील चित्तथरारक अनुभव सांगितले. चार भिंतीतील जगाची कल्पना सामान्यांना नसते. कारागृहातील कैद्यांचे विचित्र अनुभव, प्रसंग श्रोत्यांना सांगितले.  कायद्याच्या चौकटीत काम करत असताना माणुसकी जपणे फार महत्वाचे. कारागृहात नवनवीन उपक्रम, राबवलेल्या पुनर्वसन योजना, अडीअडचणी यांचा थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले.  आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने सुरु केलेला - पैठणी साडी, प्रसाद, शृंखला कॅन्टीन, यांचा उल्लेख केला.  कर्नल्स क्यूब संस्थेने वरिष्ठ नागरिक आणि इतर प्रकल्पाबाबत केलेल्या कामगिरीबाबत   स्वाती साठे संस्थेचे कौतुक केले.


या कार्यक्रमाची सांगता अल्पोपहार, कॉफीपान यांनी झाली. संस्थेच्या कार्यकारणी मंडळींनी विशेष पोशाखात मनापासून सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा अधिक वाढवली.  सत्कार समारंभ सोहळा नेत्रदीपक होता.  संस्थेकडून समाजातील मंडळींच्या रक्षणाचे काम अधिकाधिक हो याच राखीपुर्णिमा निमित्य हार्दिक शुभेच्छा ...कार्यक्रमाबाबत मनापासून आभार आणि धन्यवाद.. चंद्रशेखर मधुकर कुलकर्णी कोथरूड पुणे.

Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा