Posts

Showing posts from September, 2023

मी काय वाचले -14

Image
  "सोनेरी पाने"  - डॉ, सुषमा जावडेकर  लेखिका व्यवसायाने डॉक्टर - त्यांनी आपल्या व्यवसायात आलेले रुग्ण आणि इतर परिस्थती याबाबत सुंदर लेख लिहिले आहेत. त्यांचे अनुभव विलक्षण आणि विस्मयकारक आहेत. पण थोडक्यात कथन केले आहेत.  सर्व लेख आणि रुग्ण कथा वाचनीय आहेत.  त्यांच्या पतीच्या कामामुळे त्यांनी सौदी अरेबिया देशातील मुस्लिम स्त्रियांचे प्रश्न आणि राहणीमान याबाबत सौदी कथा या प्रकरणात छान लिहिले आहे.

मी काय वाचले -13

Image
  "प्रिय बाबुअण्णास" - नंदा पैठणकर  नंदा पैठणकर या जी,ए. कुलकर्णी यांच्या मावस बहीण ... जी ए  यांनी आपल्या दोन मावस बहिणी - प्रभावती आणि नंदा यांचा लहानपणापासून सांभाळ केला.  आपले गाव बेळगाव, धारवाड येथील  शाळा कॉलेज -शिक्षण आणि जीवन - या काळातील साऱ्या आठवणी जागवल्या आहेत. जी. ए यांच्या स्वभाव, कॉलेजमधील प्रोफेसर नोकरी आणि साहित्य लेखन याबाबत आठवणी, प्रसंग यांचा उल्लेख उत्तम प्रकारे व्यक्त केला आहे.साधी राहणी, त्यागी वृत्ती आणि उच्च विचारसरणी, आपल्या कामाचा कोठेच गाजावाजा न करणे.. असे अनेक गुणांचे दर्शन पुस्तकातून लेखिकेने वर्णन केले आहेत.  त्यांचा पत्रसंवाद हा आवडता उद्योग - पत्र लेखन हा विस्तृत  आणि सुंदर आहेत. माझे गाव चिकोडी (जिल्हा - बेळगाव) यामुळे आणि पत्रलेखन ... यामुळे हे पुस्तक मला अधिक भावून गेले. बाकी जी ए लेखन उत्तम.. त्यांची काही पुस्तके माझ्या घरी आहेत.  पुस्तक वाचनीय आहे.

गगनबावडा - गेट टू गेदर - सकाळी फेरफटका

Image
  उज्जवलानी गगनबावडा get-to -gether चे विस्तृत आणि सुंदर मनोगत लिहिले आहे. माझे मनोगत लिखाणाचा भार बराच कमी केला याबाबत आणि तत्पर लिखाणाबाबत धन्यवाद..मी अधिक काय लिहणार म्हणा.. परत मनापासून धन्यवाद... गगनबावडा -गेट टू गेदर - विविध खेळ आणि भेट आदान-प्रदान कार्यक्रमाच्या सुरुवातीस - भारताने चांद्रयान -३  हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरवले. या कामगिरीबाबत ISRO च्या चांद्रयान मोहिमेतील साऱ्या शास्त्रज्ञांचे आभार आणि कौतुक केले.  तसेच आपला मित्र दीपक हा इचलकरंजी रोटरीचा अध्यक्ष झाला. रोटरीच्या कामामुळे गेट टू गेदरला उपस्थित राहू शकला नाही. या दिपकच्या कामगिरीबाबत सन्मान म्हणून सर्वानी उभे राहून टाळ्या वाजवून गौरव केला.  या दोन्ही गोष्टी कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहेत.  आपल्या भावना त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोचतात असे मला वाटते. आपले ग्रुपचे सुधारित बॅनर खूप छान झाले आहे. बँनरसाठी उज्ज्वलाला धन्यवाद... गगनबावडा - गेट टू गेदर - सकाळी फेरफटका - रविवार २७ ऑगस्ट - सकाळी साडेसहा वाजता सगळ्यांनी फिरायला जायचे असे आदले दिवशी ठरवले. सकाळी सहा दरम्यान "वर...