Posts

Showing posts from December, 2025

प्रार्थनेतील शक्ती

Image
  १५ डिसेंबर - लोणी काळभोर येथील डोम पाहण्याचे ठरवले.  सकाळी PMT बसमध्ये चाळीस रुपयाचा   एक दिवसाचा पास काढून हडपसर येथे गेलो. तिथे उरळीची बस पकडून लोणी गावात विश्वराज हॉस्पिटल येथे उतरून काही अंतर चालून डोम या ठिकाणी पोचलो.  तिथे आधी दर्शन पास घ्यावा लागतो. पासचे रु १०० .  गेटवर रखवालदारास डोमचा पास दाखवला आणि डोमकडे वाटचाल केली  डोमच्या वास्तूच्या पायऱ्यांवर काही सुंदर सुविचार कोरलेले आहेत.  गोलघुमट सारख्या डोमच्या इमारतीत साऱ्या धर्माच्या संत आणि गुरु यांचे पुतळे आणि माहिती यांचे दर्शन होते. जगातील सर्वात मोठा डोम म्हणून हा प्रसिद्ध आहे. या भव्य इमारतीत  आपला आवाज घुमतो.  इथे मी खिश्यात हात घालून बघितले तर माझा PMT पास गायब. मी इतर खिश्यात शोधू लागलो तर मला पास मिळाला नाही.  गेटपाशी बहुतेक खिश्यातुन पडला असावा असे वाटले. - गेटपाशी जिथे पास पडला असेल तिथेच पास असू दे .. मी या शांती हॉलमध्ये देवाकडे प्रार्थना केली. एक मन म्हणत होते - वाऱ्याने पास उडून गेला असेल का...?  स्वच्छता कर्मचारी झाडू मारून तो कदाचित कचऱ्याच्या पेटीत गे...

सायोनारा - जपान दौरा

  जड अंतकरणाने आम्ही तुझा निरोप घेऊन सोमवारी पहाटे तीन वाजता घरी सुखरूप येऊन पोचलो. जपान मुक्कामात माझा 61 वा वाढदिवस, तुमच्या दोघांचा वाढदिवस, दिवाळी, दसरा आणि आमच्या लग्नाचा तिसावा वाढदिवस असे कार्यक्रम जोरात साजरे झाले. जपान दौऱ्यात टीम लॅब, माऊंट टकाऊ, हाकोने , माउंट इझु, जोगासाकी, कामिकोची, शिरकावाग...अशा निसर्गरम्य परिसरात भेट देण्याचा योग आला. सर्वच ठिकाणी अत्यंत रमणीय होती. तुझ्या कंपनीत फॅमिली डे कार्यक्रमास हजेरी लावता आली आणि तुझे ऑफिस, कॅन्टीन पाहता आले  आणि इतर करमणूक आणि मनोरंजनाचे प्रदर्शन पाहून मनास  आनंद झाला. तुझ्या घरी तू टेबल खुर्ची घेतल्यामुळे तुझ्या ऑफिसमधील मित्रांना आणि सहकारी मंडळींना भोजनास बोलवता आले. त्यावेळी वर्षाने महाराष्ट्रीयन आणि साउथ इंडियन डिशेस बनवून सर्वांना भारतीय अन्नपदार्थांचा आस्वादची संधी दिली. तुझ्या ऑफिस बॉस आणि इतर सहकाऱ्यांनी तुझी जपान भाषेवरची प्रगती आणि संवाद यातील प्रगतीबाबत पावती दिली हे ऐकून मनात बरे वाटले. तुझ्या बिल्डिंग मधील तुझ्या शेजारी यांनी मला जापनीज  भाषेबाबत दररोज मला मार्गदर्शन केले. आम्हाला जापनीज पदार्थ ...

नॅशनल डायट लायब्ररीस भेट

Image
  काल टोकियोमधील नागाताचो भागातील नॅशनल डायट लायब्ररीस भेट दिली.  हे ग्रंथालय जपानमधले  आणि जगातल्या मोठ्या ग्रंथालयापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे.  जपानमध्ये पार्लमेंट हाऊसला डायट म्हणतात ही लायब्ररी पार्लमेंट च्या बाजूला आहे त्यामुळे नॅशनल डायट लायब्ररी असे नाव आहे. जपान मधली जी काही पुस्तके किंवा नियतकालिक प्रकाशित होतात त्याची एक प्रत या ग्रंथालयात ठेवली जाते.  या लायब्ररीमध्ये एक कोटीच्या वर पुस्तक आहेत यामध्ये तंत्रज्ञान, विज्ञान, अध्यात्म, भाषा, सिनेमा, कला, मेडिसिन अशा अनेक विषयावर पुस्तके आहेत.  90% पुस्तके जापनीज भाषेमध्ये आहेत. या सहा मजली इमारतीमध्ये असणाऱ्या लायब्ररी काही भागातील काही पुस्तके,विश्वकोश, नॅशनल जीओग्राफिक, नकाशे पाहण्याचा आणि चाळण्याची मला संधी मिळाली. वर्तमानपत्रात - अमेरिका. फ्रान्स, ब्रिटन येथून प्रकाशित - The New York Times , Le Monde , The Times - ही वर्तमानपत्रे ५०-६० पानी आहेत.  पुस्तक मांडणी, टेबल खुर्ची आसन व्यवस्था आणि इतर सोयी बघून प्रशस्त हवेशीर हॉल्स बघून मनास बरे वाटले. कॉम्प्युटर वर जवळ एका रूम मध्ये ५०- 60 लोक ब...

श्री व सौ भाटे यांच्या पंचाहत्तर आणि सत्तरी वाढदिवस

                                           श्री व सौ भाटे यांच्या पंचाहत्तर आणि सत्तरी वाढदिवस  श्री भाटे यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. एकमेकांच्या घरगुती समारंभात एकमेकांच्या मदतीचा सहभाग नेहमी असतोच. अनिल भाटे माझ्या ज्येष्ठ बंधूंचा ऑफिस मित्र नंतर माझी ओळख पुण्यात असताना घडवून आमची मैत्री झाली. बॅचलर लाईफ मध्ये पुण्यात असताना आमच्या गाठीभेटी चहापान, जेवणावळी, फिरणे वगैरे वरचेवर घडत असे. त्याच्या रूमवर त्याचे आई-बाबा आले असताना अनिलचा मुक्काम करण्याचा आग्रह असे तेव्हाच त्याच्या आई-बाबांची ओळख झाली. प्रत्येक वेळी घरी गेल्यावर आई आम्हास  चहा, जेवण इतर पदार्थ करून घालत. एक तीळ सात जणांत वाटून खावा.. या म्हणीप्रमाणे आई आम्हास खाऊ देत. या वयात स्वयंपाक पाणी करताना बघून मला नेहमी संकोच वाटे पण त्यांच्याबद्दल कौतुक वाटे आणि त्या आपल्या लेकराप्रमाणे आम्हा भावंडांची विचारपूस करीत.  त्या नेहमी काळजी पण करत अर्थात त्यांचा स्वभाव थोडा काळजी करण्याचा आहेच म्हणा.. अनिलच...