जीवनाची एकषष्टी
२४.०९.२०२५ - एक दिवसाची ट्रिप - Gogoday Tour यांनी आयोजित माऊंट ओमुरो (उंच पर्वतावर उडान खटोला वरून फेरी, आसपास सुंदर निसर्ग दर्शन, माऊंट फुजी लांबून दर्शन) जोगासाकी कोस्ट (पॅसिफिक महासागर किनारा नजीक खाडी आणि झुलता पूल, समुद्र लाटा) ITO Marine Town ( शॉपिंग मॉल, समुद्र दर्शन)जोगासाकी कोस्ट - पॅसिफिक महासागर येथील समुद्र - लाटा आणि दुधासारखा फेस, स्वच्छ पाणी/किनारा - झुलता पुलावरून फेरफटका - हे पाहून अनुभवून मनास आनंद झाला.
आज मी जीवनाची एकषष्टी पार केली, जोगासाकी कोस्ट - पॅसिफिक महासागर येथील लाटा पाहून - माझे बालपण, नातेवाईक, शेजारीपाजारी मंडळी शाळा, कॉलेज, नोकरी, बदल्या, मित्रमैत्रिणी, यांच्या आठवणींच्या आणि कृतज्ञतेच्या लाटा मनाच्या सागराच्या किनाऱ्यावर उफाळून आल्या. समुद्रापासून खूप शिकण्यासारखे आहे. मनास आनंद झाला आणि समाधान वाटले. शिबुया येथील आंध्र रेस्टॉरंट येथे भारतीय जेवणाचा आस्वाद घेऊन तृप्तीची ढेकर देत रात्री १० वाजता घरी परतलो. सौ. वर्षाचा सहवास आणि श्रेयसचे उत्तम ट्रिपचे नियोजन यामुळे माझा ६१वा वाढदिवस जोरात साजरा झाला. अर्थात यात देवाची कृपा, नातेवाईक मित्रमैत्रीण मंडळी आणि हितचिंतक यांचे शुभ आशीर्वाद, शुभेच्छा, प्रेम आपुलकी आहे. असेच प्रेम कायम राहू दे हीच कुलदेवतेस मनापासून प्रार्थना...धन्यवाद
Comments
Post a Comment