Posts

Showing posts from March, 2021

मी काय वाचले -४

"असीम आनंद "- राजयोगिनी शिवानी यांचा सुरेश ओबेराय यांच्याशी संवाद - मराठी अनुवाद : माधव जोशी संपादन : चेतन कोळी - असीम आनंद म्हणजे - जी कोणत्याही सीमित गोष्टीच्या, एका व्यक्तीच्या किंवा परिस्थितीच्या अधीन नाही. अशी अवस्था. जी अप्रतिबंधित स्वातंत्र्य आणि अनियंत्रित आहे. जी कशाच्याही अधीन नसल्यानं तिला अपयशाची चिंता नाही. नातेसंबध म्हणजे काही कृती नव्हेत तर त्या कृती करताना आपण ज्या ऊर्जेची देवघेव करतो, ते म्हणजे नातेसंबध. वस्तू, मालमत्ता, सुखसुविधेची साधनं या गोष्टी आपल्याला केवळ आराम देण्याच्या दृष्टीने निर्माण करण्यात आल्या आहेत. आनंद ही आपली अंतर्गत निर्मिती असून तो बाह्यवस्तूवर कधीच अवलंबून नसतो. अध्यात्म आपल्याला सांगत, जे करायचं ते आनंदानं करा. अध्यात्म मला स्वतःवर ताबा मिळवण्यासाठी आणि त्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी शक्ती देते.  असे अनेक शिवानी दीदींचे विचारासाठी हे पुस्तक जरूर वाचा.  या पुस्तकात आनंदाचा पासवर्ड, रहस्यभेद, सजग समृद्ध शांत आयुष्याची गुरुकिल्ली, आनंद म्हणजे काय? भावनिक परिपक्वता, ताणतणावातून मुक्त... वगैरे मुद्धे या पुस्तकात दिले आहेत. मी BK शिवानी या...

मी काय वाचले - ३

  विश्वास ग्रंथालयातून "बुकमार्क'" - लेखिका प्रज्ञा ओक. आपल्या आयुष्यात भेटलेल्या अनेक कर्तबगार आणि आदरणीय व्यक्ती बाबत सुंदर मनोगत..लेखिका एक लेखात म्हणते -  "मनांनी, गुणांनी तसच कर्तृत्वान अस्सल अशी माणसे मला आयुष्यात वारंवार भेटली, ही माझ्या आययूष्यातील समृद्धी समजते मी! त्या दृष्टीने  भरपूर श्रीमंत आहे मी.  बरं ही माणसं नुसती आयुष्यात येऊन जाताजाता भेटली असं नाही, तर ती माझ्या आयुष्यात कायम वसतीला आली. हे माझे भाग्य !" हे पुस्तक माझ्या वाचनात आले आणि मला भावले हे पण माझे भाग्यच..प्रत्येक लेखामध्ये लेखिकेने माणसाच्या गुणाबाबत मनोगत व्यक्त करतांना जीवनाविषयी आपले विचार सुंदर शब्दात मांडले आहेत. ते आपल्या जीवनात उपयोगी पडतात आणि आपले जीवन सुखकर होते. पुस्तकातील शेवटी "माणसं " हा लेख मला खूप भावला.  या लेखिकेची मी आधी - ओशोंच्या प्रवंचनावर काही पुस्तके वाचली होती. लिखाण सुंदर आहेच.  "बुकमार्क" - हे बुक आपल्या संग्रही ठेवण्यासारखे असल्याने "मार्क' करून ठेवायला हरकत नाही...
 मी काय वाचले 📖-2 Sohamano Suryast - दिनकर जोषी या गुजराती पुस्तक सुरम्य सूर्यास्त - अनुवाद प्रतिभा काठीकर.. आपले वृद्धत्व आनंददायी आणि सुखकर होण्यासाठी लेखकाने उपयुक्त मार्गदर्शनपर विचार या पुस्तकात वाचावयास मिळतात. कोणी म्हणेल हे नुसते सांगायला जाते काय? पण मला वाटते हे विचार 50 व्या वर्षानंतर आचरणात आणले तर आपली सत्तरी आनंदात आणि समाधानात गाठू शकू यात शंका नाही. असो वेळ काढून पुस्तक जरुर वाचा आणि जमल्यास आचरणात आणावे.. ही विनंती..🙏 चंद्रशेखर मधुकर कुलकर्णी..14 मार्च 2021.

मी काय वाचले - 1

  ही सृष्टी ज्याने घडवलीय ती किती सुंदर घडवलीय, आपणच त्याचे रसग्रहण करायला कमी पडतो. अवतीभोवती बऱ्याच सुंदर गोष्टी असतात पण त्यांना एक चौकट दिल्यावर त्या मनाला जास्त भावतात. डॉ. श्रीनिवास गोखले यांनी त्यांच्या भटकंतीच्या दरम्यान काढलेल्या हजारो फोर्टोपैकी काही निवडक फोटो सुंदर काव्यपंक्तींसह आपल्यापुढे ठेवले आहेत. रोजच्या धावपळीच्या दिवसातले काही क्षण हे फोटो वाचकांना 'आनंदयात्रा' घडवून आणतील व विरंगुळा देतील अशी आशा आहे. हे सर्व पुस्तकाच्या मागील पृष्ठावर लिहिले आहे. मी आनंदयात्रा पुस्तक वाचले/पाहिले. खुप सुंदर फोटो काव्यपंक्तीसह 👌 जमल्यास जरुर पाहून आनंद घ्या...

महिला दिन

  ८ मार्च .. जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.  कर्तृत्वान महिलांचा गौरव केला जातो. अर्थात आपल्या संस्कृतीत ३६५ दिवस महिलांचे असतात.  आपण वर्तमानपत्रात इतर महिलांच्याविषयी वाचतो, ऐकतो.  माझे मन मला म्हणाले तू तुझ्या कुटुंबियातील महिलांच्या कामगिरीबाबत कधी विचार केला आहेस का ..?  आणि एकदम माझे मन शालेय जीवनात असताना  माझ्या  कोल्हापूरच्या आत्याच्या घरी गेले. घर कसले ते एक आठ बाय दहाची खोली (खोलीत बऱ्याच गैरसोयी अधिकच) होत्या. आत्याच्या घरी काका आणि ४ मुले आणि १ मुलगी असा संसार.  स्वतः आत्या पायाच्या आजारांनी त्रस्त..काकांचा भविष्य आणि भटकी व्यवसाय.. तरीपण तिच्या घरी नातलग, इतर गावावरून आलेली मंडळी बरीच असायची. सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत जवळजवळ किमान ४०-५० कप चहा होत असे.  दुपारी ४-५ लोक सहज जेवायला असत. आत्या आपले दुःख विसरून नेहमी  सर्वांचा पाहुणचार आनंदाने करत असे.  स्वयंपाक उत्तम - विशेषतः " वांगी" भाजी आणि आमटी अधिक चविष्ट असे.  मला तिचा संसार बघितल्यावर बहिणाबाई चे गाणे - अरे संसार संसार .हे आठवते. जणू बहिणाबाईंचे क...

साहेबांचा वाढदिवस

  आज ८ मार्च ..अनगळ अँड कंपनी चे सर्वेसर्वा श्री सुभाष अनगळ यांचा वाढदिवस. सरांनी आज वयाची ८५ वर्षे पूर्ण केली आणि ८६ मध्ये पदार्पण केले.  त्यांचा दांडगा स्टॅमिना चिरतरुण मुद्रा यामुळे ते ८५ वर्षाचे वाटत नाही.  कालच मी सुविचारांची वही चाळत असताना मला ओशो यांचा एक विचार वाचनात आला. ते म्हणतात -  "If  you have lived your youth totally, you will remain young to the very last breath of your life.  Your body may become old but your freshness and youthfulness is a totally different phenomenon to your aging.  Aging is physcial, youthfulness is your approach towards Life ... हा विचार तंतोतंत सरांना लागू पडतो.  याचा थोडक्यात अर्थ - माणसाने मनाने तरुण असावे..या वयात त्यांची नवीन शिकण्याची जिद्द, हौस,मोबाईल/whatsapp  वापर... हे कौतुकास्पद.. त्यांच्याबरोबर काम करीत असताना मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांनी बांधकाम व्यवसायात पदार्पण केले त्यावेळी खूप कष्ट घेतले आणि आपल्या कामामुळे आपला बांधकाम धंदा जोमाने वाढवला आणि यश संपादन केले.  त्यांची ...

दासनवमी

आज दासनवमी.. श्री समर्थ रामदास स्वामी यांचे साहित्य काव्य.. मनाचे श्र्लोक, दासबोध, आरती... मनास भावून जातात. लहानपणी शाळेत असताना स्पर्धेसाठी मनाचे श्र्लोक पाठ करीत होतो. त्यावेळी काहीच अर्थ कळत नव्हता...(अर्थात आता खुप काही कळते असे नाही).. पण बराच विचार केल्यावर गाडी मनापाशी येऊन थांबते.. आणि तेथे श्री रामदास स्वामींचे मनाचे श्र्लोक कामी येतात... ' दिसामाजी काहीतरी लिहीत जावे. प्रसंगी अखंडित वाचीत जावे...' यानुसार श्री रामदास स्वामींचे स्मरण करून मी माझ्या ब्लॉग वर मनातले विचारांच्या लेखनाचा ✍️ श्री गणेशा करीत आहे..  जय जय रघुवीर समर्थ.. श्री राम जय राम जय जय राम... चन्द्रशेखर मधुकर कुलकर्णी.  मो नंबर 7767091069.