Posts

Showing posts from June, 2022

पुणे आकाशवाणी - "भारतरत्न" उस्ताद बिस्मिल्ला खान

Image
  २९ मे २०२२ - पुणे आकाशवाणीवर सकाळी "भारतरत्न" या कार्यक्रमात सकाळी १०.३० वाजता - उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्यावर माहिती ऐकली.  वयाच्या १४ वर्षी प्रथम संगीत परिषद बनारस येथे सनई वंदन केले.  गंगेच्या घाटावर तासंतास रियाज करीत असत. संगीताला ते ईश्वर समजत. खान यांचे एकत्र कुटुंब होते. कुटुंबात ६० लोक होते. शहनाई - याला ते दुसरी पत्नी म्हणायचे.  प्रत्येकवेळी आकाशवाणीला नेहमी प्राधान्य देत कारण शेकडो श्रोते मंडळी त्यांची सनई ऐकत. देशातील सर्व आकाशवाणी केंद्राची पहाट सनईच्या सुरांनी होते. आकाशवाणीसाठी सकाळी आणि संध्याकाळी त्यांनी सनई धून केली. आपल्या स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी त्यांना सनई साठी निमंत्रण विशेष दिले गेले.  जगात १५० देशात सनई लोकप्रिय केली.  "किनारा" , "गुंज उठी शहनाई" या चित्रपटात सनई वादन केले.  २१ ऑगस्ट २००६ रोजी सनईच्या सुरांचे चैतन्य हरपले.  आजही आपली पहाट सनईच्या सुरानीच होते. या कार्यक्रमाचे लेखन मधुसूदन पत्की आणि निवेदन श्री प्रसाद कुलकर्णी यांनी केले. हा कार्यक्रम अत्यंत श्रवणीय होता. भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खान यान...

पुणे आकाशवाणी - "चिंतन"

  पुणे आकाशवाणी केंद्रावर आज सकाळी ६.३० दरम्यान "चिंतन" या कार्यक्रमात श्री मकरंद वझे यांचे "संसार" याविषयावर विचार ऐकले.  आपल्या वाटेला आलेला संसार देवाच्या इच्छेने आला आहे असे समजून  आनंदाने संसार करावा. आपले कर्तव्यकर्म  नियमित करावे. एक हाताने संसार करावा आणि दुसऱ्या हाताने देवाला घट्ट धरून ठेवावे.  आपण काय करतो दोन्ही हाताने संसार करतो आणि वेळ मिळाल्यास देवाला धरण्याचा प्रयत्न करतो.  भगिनींना स्वतःचा संसार, मुलां-मुलींचा संसार असतो.  भगिनींनी वेळेची सबब न सांगता परमार्थ करावा - देवाचे नामस्मरण, जप, ध्यान जरूर केलेच पाहिजे (अर्थात आपला संसार सांभाळून हं - ...).  परमार्थात संसारापलीकडे "आत्मज्ञान " जाणणे महत्वाचे.  संसारापलीकडे आत्महित साधणे जरुरीचे आहे.  असो ऐकायला सोपे आचरणात आणणे अवघड हे खरे.. पण "चिंतन" चिंतनीय श्रवणीय होते. सर्व महिला आपापला संसार उत्तम करीत आहातच ..(संसारात स्त्रियांना 'रिटायरमेंट' नसते) हे कौतुकास्पद आहेच.. परमात्मा आपल्या हृदयात नेहमीच वास करो हीच प्रार्थना...श्री राम जय राम जय जय राम ...