Posts

Showing posts from February, 2023

कांचनसंध्या - सदाबहार हिंदी व मराठी गीतांची मैफिल

Image
  स्नेहवर्धन ज्येष्ठ नागरिक संघ शिवतीर्थनगर पुणे यांच्या २१ व्या वर्धापन दिनानिमीत्य कांचनसंध्या - सदाबहार हिंदी व मराठी गीतांची मैफिल कार्यक्रम आयोजित केला होता. गायिका डॉ सौ अनघा राजवाडे.  स्वातंत्रवीर  सावरकर यांना आदरांजली वाहून जय जय देव शिवराया या आरतीने मैफिलीचा प्रारंभ झाला. उंबरठा सिनेमातील - गगन सदन तेजोमय, भाभी की चुडिया सिनेमातील ज्योती कलश झलके, ऊन पाऊस सिनेमातील ग दि मा चे - खेड्यामधले घर कौलारू ..अनपढ मधील जिया लेके जियो. सुरेश भट यांचे मी मज हरपून बसलेग ..बोले रे पप्पी हरा, कुसुमाग्रजांचे - हे सुरांनो चंद्र व्हा ,हसले मनी चांदणे, आझाद सिनेमातील - अपलम चपलम, सुधीर मोघे यांचे  साजणा पुन्हा स्मरशील का, अमरभूपाळी सिनेमातील लावणी - लटपट लटपट तुझे चालणे ..तिसरी कदम सिनेमातील पान खाये सय्या हमारो,..कट्यार काळजात घुसली मधील - मन मंदिरा तेजाने .. ही गाणी गायली. आरती, प्रार्थना, आईची आठवण, नाट्यगीत, लावणी, भावगीत अशी १४ मराठी हिंदी गाणी सुरेल आवाजात गायली आणि रसिक श्रोत्यांचे मनोरंजन केले. काही गाण्यांना वन्स मोर मिळाला.  कार्यक्रम छान पार पडला. डॉ  अ...

अस्वस्थ स्वात्रंत्र्य

Image
  २५ फेब्रुवारी २०२३ - कर्नल्स  क्यूब यांच्या वतीने " अस्वस्थ स्वात्रंत्र्य " - हा कार्यक्रम आयोजित केला होता. मैत्री ग्रुप पुणे यांनी सादर केला.  कार्यक्रमाच्या सुरुवातीस व्यंकटेश माडगूळकर यांची "पिंजरा" या कथेचे वाचन सादर केले गेले. कथा वाचन आणि सादरीकरण मस्त. विशेषतः - कथेतील "गोप्या " सुतार याची भूमिका खूप छान होती . कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अस्वस्थ शतकाची कविता यात कवी श्री वसंत आबाजी डहाके यांच्या कवितांचे अभिवाचन मैत्री ग्रुप यांनी सादर केले. स्मृतीभंश काळात, विचार झाला पाहिजे, निवड, नकार, पत्र, वाचकांचा पत्रव्यवहार, वास्तव, वाट, खेळ, अमिताभ बच्चन, वास्तववाद,  मुले हसताहेत,पात, उंदीर मारण्याचे औषध, यंत्रणा, प्रश्न या कविता वाचन झाले.  या सामाजिक, कौटुंबिक, राजकीय, धार्मिक ... विषयावरील वास्तव आणि सामान्य माणसाच्या भावना यांचे चित्रण सुंदर शब्दात केले गेले.   प्रत्येक कवितावाचन वेळी पडद्यावर कवितेशी साजेसे चित्र आणि गाणे दाखवले गेले.  यातील शेवटची "प्रश्न" या कवितेस रसिकांनी उत्तम दाद दिली. यामध्ये सामान्य माणसास पडणारे प्रश्न - यावेळी का...

अष्टविनायक प्रवास

Image
  11 फेब्रुवारी शनिवारी सकाळी थेऊर कडे गाडीने प्रयाण करीत  अष्टविनायक प्रवासाचा  श्रीगणेशा केला. थेऊर चिंतामणी  गणपती दर्शन घेतले. आमची अष्टविनायक सहल सुखरूप पार पडू दे ही मनातील चिंता व्यक्त केली आणि मनोमनी प्रार्थना केली. मोरगांव गणपती जाताना वाटेत नाष्टा शिवनेरी मिसळ वर ताव मारला. मोरगांव येथे मोरेश्वर गणेशाचे दर्शन घेऊन पुढे सिद्धटेक कडे वाटचाल केली. सिध्दटेक सिद्धिविनायक मंदिर खूप छान प्रशस्त आणि प्रदक्षिणा  आवर मोठा आहे. रांजणगाव मार्गात दुपारी जेवण झाल्यावर चार वाजता रांजणगाव येथील महागणपती दर्शन घेतले. नजीकच्या बागेत वाघ सिंह यांच्या समवेत ग्रूपफोटो काढले. फोटोवेळी सगळे प्राणीच घाबरलेले दिसले. ओझर येथे आम्ही संध्याकाळी 7.30 दरम्यान पोचलो. शनिवार असल्याने बरेच भक्त जमल्यामुळे भक्त निवासमध्ये रूम मिळाली नाही. मंदिराजवळ एक लॉज मिळाले. मंदिरात विघ्नेश्वर गणपतीचे दर्शन घेऊन प्रसाद लाभ घेऊन विश्रांती घेतली. रविवारी सकाळी सहा वाजता लेण्याद्री कडे गाडीने प्रयाण केले आणि मंदिरांच्या पायथ्याशी पोचलो. गेट सकाळी 7वाजता उघडते.गेट नेहमी ८ वाजता उघडते. ७ ते ८ वेळेत दर्...

ती. आप्पाजी वर्षश्राद्ध कार्यक्रम

Image
  1 आणि 2 फेब्रुवारी रोजी ती. आप्पाजी वर्षश्राद्ध कार्यक्रम व्यवस्थीत पार पडला. विधी छान पार पडले. भोजनातील सर्वच पदार्थ चविष्ट झाले होते. आचारी यांनी व्यवस्थीत वाढले. संध्याकाळी संगीत मैफील कार्यक्रमात गायकांनी आपली कला सादर केली. राजगोळी बाबत कविता वाचन झाले. संगीत,वादनाची सांगता..श्री राम जय राम जय राम.. यांनी झाली.ग्रूप फोटो काढले. रसिकांनी उत्तम प्रतिसाद देऊन मैफील ची शोभा वाढवली. कार्यक्रमासाठी राजगोळी इनामदार मंडळी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होती. ही सारी ती. आप्पाजीची आपुलकी आणि प्रेम यांची पावती नाही का...? आपल्या आयुष्यात ती आप्पाजी यांनी आपल्या स्वभावामुळे सर्वांचे प्रेम आणि स्नेह यांची भरपूर Fixed Deposit जमा केली हे अनुभवले. दोन दिवसात सगळ्यांनी ती. आप्पाजी यांच्या आठवणी जाग्या केल्या. सर्वांची उपस्थिती, आनंदी सहभाग...हे पाहून ती. आप्पाजी यांना समाधान आणि आनंद झाला असता. अर्थात् आकाशातून याचा आनंद लुटला असेलच. त्यांच्या आशिर्वाद आणि कृपा यामुळे सर्व कार्यक्रम उत्तम पार पडले. यात शंका नाही.. अंदाजे 40 नातेवाईक यांची नाश्ता चहा पाणी,भोजन आणि मुक्काम यांची सारी व्यवस्थ...

दावनगिरे प्रवास

  आम्ही पुणे दावनगिरे बस ने रविवारी सकाळी पाच वाजता सुखरूप पोचलो. बस स्टॉप वर श्री समीर आणि श्रुती गाडी घेऊन हजर होते. संध्याकाळी आम्ही श्री साई बाबा मंदिर, AVK women's college,  रामकृष्ण मठ, आणि इतर भागास भेट दिली. वर्षा पूर्वी कॉलेज शिक्षणासाठी येथे होती. 1993 साली हे गाव सोडले. आपले घर परिसर, मैत्रिणी, शेजारी, मठ मंदिर याबाबत साऱ्या आठवणी जाग्या झाल्या. वर्षा nostalgic झाली. सोमवारी आम्ही कोर्ट येथे भेट दिली आणि श्री समीर रावांची चेंबर, कोर्ट रूम पाहिले. श्री समीररावांचा मान,थाट आणि माट, रुबाब अनुभवला. हे सर्व पाहून मनास आनंद झाला. आमच्या मुक्कामी श्रुतीने उत्तम अन्नपदार्थ चविष्ट बनवले होते. दावनगिरे स्पेशल बेने डोसे याची प्रथम चव चाखली.Quarters मधील निवास प्रशस्त आणि श्रुतीने व्यवस्थीत ठेवले आहे. आपली मंडल art आणि इतर कलाकुसर आम्हास दाखवली. मंडल art कला अति उत्कृष्ट झाली आहे. श्रृती आणि समीररावांनी आमचे आदरतिथ्य आणि पाहुणचार उत्तम मनापासून केले. मनास बरे वाटले. 30  वर्षापूर्वी सांगावीस असताना स्वयंपाक होईपर्यंत ऑफिसमधून घरी आल्यावर मी लहानपणी श्रुतीस कडेवरून अर्धा तास...

"शुभम बंगलो" - गृह प्रवेश सोहळा कार्यक्रम

Image
  २ फेब्रुवारी - आज आपला गृह प्रवेश सोहळा कार्यक्रम .. हार्दिक शुभेच्छा.. आपले छोटेसे रोपटे आता वृक्षात रूपांतरित झाले याचा आनंद आहे. आई-वडील आणि कुटुंबीय, सारे हितचिंतक यांचे आशीर्वाद या पाठबळाचा भक्कम पाया असलेला "शुभम बंगलो" सुंदर असणार यात शंका नाही. आपला वास्तू-शांती कार्यक्रम भव्य आणि दिव्य असणारच.  आपला कोणताही प्रकल्प हा नेहमीच नेत्रदीपक असतोच याचा अनुभव आम्ही आमच्या पहिल्या गेट टू गेदर - पन्हाळा येथे नेत्रांनी घेतला आहे. "शुभम बंगलो" - ही वास्तू नेत्रदीपक असणारच रोपट्याचे वृक्षात रूपांतरित करण्यात आपल्या कुटुंबियांचे अविरत कष्ट आणि मेहनत आहे. आपल्या कुटुंबियांचे कौतुक आणि अभिनंदन. या कामी सौ वैभवी वाहिनी यांचे कौतुक करावे तितके कमीच. त्यांची कामगिरी अभिमानास्पद आहे. घरगुती कारणामुळे आम्ही आपल्या वास्तू शांती कार्यक्रमास हजर राहू शकत नाही क्षमस्व.आपल्या नव्या वास्तूत आपण सर्वाना सुख शांती आणि समाधान लाभो.  आपल्या कुटुंबीयांची सदैव्य भरभराट हो हीच वास्तुदेवतेस मनापासून आपल्या साऱ्या RDHS ग्रुपच्या वतीने.प्रत्यक्ष हजर राहता येत नाही म्हणून हा शब्दरूपी शुभेच्छा...