माझे वाचन -8

 


"माझे आजोबा"  - अक्कलकोट स्वामींचे "मंगेश वर्दे" ना आलेले अनुभव -लेखक : मंगेश वर्दे. 



लेखक श्री मंगेश वर्दे याना त्यांच्या जीवनात आलेले अक्कलकोट स्वामींचे अनुभव या पुस्तकात लिहिले आहेत. लेखक हे बँकेत नोकरी करीत असताना ऑफिस कामकाज आणि बदलीनिमित्य इतर ठिकाणी प्रवास करीत असताना काही गोष्टी अगर त्रास दूर होऊन काही बाबी सुखकर झाल्या.  प्रत्येक नवीन गावी गेल्यावर त्यांचा स्वामी मठ/मंदिर शोध सुरु असायचा आणि शोधून ते मुद्दाम भेट देत. भेटीवेळी स्वामींच्या दर्शनावेळी मानसिक अवस्था आणि समाधान, आनंद हे त्यांनी उत्तमप्रकारे व्यक्त केले आहेत. स्वामींचे वचन- "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे" - याचा त्यांनी बऱ्याच प्रसंगी अनुभूती घेतली आहे.   कॉम्पुटर- सर्व्हर -या अनिश्चित गोष्टीवर आपले काहीच चालत नाही त्यावेळी वरून एक अदृश्य शक्ती काम करीत असतात. मी पण बँकेत नोकरी केली असलेने बरेच अनुभव वाचताना सगळे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात आणि जणू आपणच त्या जागी आहोत असा भास होतो. लेखकांनी पहिल्या दोन आवृत्तीच्या विक्रीतून आलेले मूल्य श्री स्वामी चरणी अक्कलकोटला अन्न छत्राला दान केले. ही कौतुकास्पद बाब आहे. २८ पुष्प असणारे हे १६७ पानी पुस्तक वाचनीय आहे. फक्त आपली श्रद्धा हवी.. पुस्तक जरूर वाचावे.  श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ





Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा