Posts

Showing posts from December, 2022

२०२२ साल निरोप

Image
  २०२२ साल संपत येत आहे.  या वर्षाचा आढावा... २०२२ मध्ये वाचलेली पुस्तके, घडलेला प्रवास, मनोरंजनपर कार्यक्रम हजेरी याबाबत नमूद करत आहे.  पुस्तकाबाबत, प्रवासाबाबत, आणि कार्यक्रम आणि इतर प्रसंग/आठवणी याबाबत  ब्लॉग मधून लिखाण केले आणि आनंद इतरांना वाटला. दररोज सकाळी श्री दासबोध (एक समास), आणि मनाचे श्लोक, आणि रात्री श्री गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने यांचे वाचन केले.  मनास आनंद आणि समाधान मिळाले. पुणे आकाशवाणी वर काही उत्तम कार्यक्रम ऐकण्याची संधी लाभली.डिसेंबर मध्ये माझ्या चिरंजिवास कॅम्पस selection मध्ये Rakutem - टोकियो जपान येथे निवड... ही सारी देवाची कृपा आणि पूर्वजांची पुण्याई आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा  साऱ्या रसिकांचा भरभरून प्रतिसाद आणि प्रेम लाभले .लेखनातून नकळत कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर मनापासून क्षमस्व...झाले गेले विसरून जाऊ ..आपल्यास आपुलकी, प्रेम आणि प्रतिसाबाबत मनापासून धन्यवाद आणि आभार...२०२२ वर्षाला कृतज्ञपूरक नमस्कार आणि धन्यवाद 

श्रीशैल्यम

Image
  20 ते 22 डिसेंबर 2022 - पुणे ते श्रीशैल्यम ट्रीप - 12 ज्योतिर्लिंग पैकी  श्रीशैल्यम एक  - हैदराबाद येथुन गाडी करुन  श्रीशैल्यमला 20 संध्याकाळी पोचलो.  २१ डिसेंबर रोजी सकाळी दर्शन - धर्मदर्शन रांगेतून घेतले  बऱ्यापैकी गर्दी होती. ओम नमः शिवाय, नमो शंकरा या नामस्मरणात - गाभाऱ्यातील पिंडी पर्यंत कसे पोचलो कळले नाही  १ तासात दर्शन झाले.पाताळगंगा येथे रोपवे आणि बोट फेरी केली. पळसधारा आणि पंचधारा, शिखरम, साक्षी गणपती, छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्ती केंद्र, श्री अक्कमहादेवी मंदिर, या ठिकाणी भेटी दिल्या. सर्व ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. श्री शिवाजी स्फूर्ती केंद्र हे प्रेक्षणीय 👌स्थळ आहे. आवर्जून पाहावे.श्रीशैल्य परिसर शांत आणि निसर्गाचे सौंदर्य, एक घाट उतरून दुसरा चढण आणि जंगल.. खूप रमणीय आहे. वाघ आणि इतर प्राणी काही दिसले नाही पण एक हरीण आणि चिल्ली पिल्ली वानर सेना रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसलेली होती. बहूतेक पुणेकरांना भेटण्यास आली असावी🤣🤪 मुख्य देवळाजवळ आमचे हॉटेल होते.  दर्शनास जाताना मोबाईल काउंटर वर जमा करावा लागतो.  श्री अक्कमहादेवी गुफास...

मी काय वाचले - 20

Image
  "ब्लॅक अँड व्हाईट "- द्वारकानाथ संझगिरी  या पुस्तकात लेखकाने अशोककुमार, देव आनंद, राज कपूर, दिलीपकुमार, मीनाकुमारी, मधुबाला, नर्गिस, वैजयंतीमाला, साधना, शम्मी कपूर.. या नट नट्या बाबत आपले विचार मांडले आहेत. प्यासा - गुरुदत्त - या चित्रपटाबाबत सविस्तर लेखन केले आहे.  सपने मे मिलती है - यामध्ये अनेक गाजलेल्या नात्याचे अभिनयाबाबत विचार उत्तम मांडले आहेत. मीनाकुमारी बाबतची ट्रॅजेडी, चांद फिर निकला या गाण्याबाबत, वन  मन इंडस्ट्री - राज कपूर-- सुंदर लिहिले आहे.  द्वारकानाथ संझगिरी यांचे क्रिकेटबाबत लिखाण वाचले होते. पण चित्रपटाबाबत प्रथमच वाचले. काही नटाबाबत भेटून मुलाखती घेतल्या आहेत. त्यांची विनोदी शैली जास्त भावून जाते. पुस्तक वाचायला हवे.

" रंग मैफिलीचा" - निखिल महामुनी

Image
  २४ डिसेंबर २०२२ - कर्नल्स क्यूब तर्फे " रंग मैफिलीचा" - काही गाणी आणि काही आठवणी - सादरकर्ता  - गायक आणि संगीतकार - निखिल महामुनी - हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  कार्यक्रमाच्या  प्रारंभी संस्थेचे मुख्य श्री कुमार फुले यांनी हा कार्यक्रम श्री श्रीनिवास करमरकर याना अर्पण करीत आहोत असे सांगितले. संस्थेचे सचिव श्री श्रीनिवास करमरकर यांचे काही दिवसापूर्वी देहावसान झाले होते. श्रद्धांजलीपर आपल्या भाषणात कर्नल फुले यांनी श्रीनिवास यांच्या १९६० पासूनचा आपल्या आठवणी जागवल्या. एक हसतमुख व्यक्तिमत्व, सुंदर लेखन - एक चांगल्या मित्रास गमावले याबाबत सांगून प्रथम दोन मिनटे मौन पाळून श्रद्धांजली सादर केली. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सौ. माधुरीताई सहस्रबुद्धे यांनी पण हसरे व्यक्तिमत्वास आपण गमावलो - दोन शब्द श्रद्धांजली अर्पण केली.   श्री निखिल महामुनी यांनी कार्यक्रमाची सुरुवात तू माझा देवा केवळु  या भक्तिगीताने करून नामसंकीर्तन बाबत सांगितले हरी सुंदर नंद मुकुंदा या भजनाने साऱ्या श्रोतुवृन्दाना - श्री राम .. हे राम हे राम.. श्री स्वामी समर्थ जय जय..दिगंब...

मी काय वाचले - 19

Image
  " निर्मितीचा क्षण " - लेखिका सौ. प्रियंवंदा प्रकाश करंडे - आपल्या जीवनातील आलेले अनुभव, घटना, प्रसंग याबाबत लेखिकेने आपले विचार व्यक्त केले आहेत. हा ललितलेख संग्रह आहे. दुधाचे पातेले आणि साय पाहिल्यावर आपल्या मनातील भावना "पहारेकरी" या लेखात मांडले आहेत. - आई आहेस म्हणून तर - हा लेख नव्या पिढीसाठी मार्गदर्शक - लेखन एक साधना पण ती अविरत हवी - यात लेखनाबाबत लिहिले आहे. अध्यात्म विचाराची आजची गरज- लिव्ह इन - हे लेख आणि इतर लेख वाचनीय आहेत. पुस्तक संग्रही ठेवण्याजोगे आहे.

पर्णकुटी homestay

Image
  Alumni meet साठी आम्ही शनिवारी रात्री इचलकरंजी येथे मुक्काम केला होता. शुभम डायनिंग येथे जेवण झाल्यावर दीपकने "पर्णकुटी homestay" येथे राहण्याच्या व्यवस्था केली होती. पर्णकुटी म्हणजे अगदी घरगुती.. येथील निवास व्यवस्था, रुंममधील सोयी, चहापान, रूम पुढे विविध प्रकारची झाडी, कुंड्या, वेली.. झोपाळा...सकाळी अभंग, आरती, नामस्मरण.. चहा घेत ऐकायला मिळाले. एकूण येथील मुक्काम वातावरण.. मनास आनंद झाला. प्रत्येक घरगुती कुटुंबीयांनी जरूर लाभ घ्यावा. सकाळी 8.30 वाजता- चिकोडी येथे जाण्यासाठी दीपक आणि सौ वैभवी वहिनी गाडी घेऊन हजर... गप्पा मारत चिकोडी BK college कधी आले कळले नाही. Alumni meet कार्यक्रम उत्तम पार पडला. संध्याकाळी साडेपाच वाजता कॉलेज वरून चीदु आणि उज्ज्वला यांच्या घरी धावती भेट दिली. गाडीत आणि बाहेर वर्षा 🌧️होतीच.. शिरगाव येथील श्री बसवेश्वर मंदिरास जाता जाता भेट दिली. हे एक जागृत देवस्थान आहे. शंकराची पिंड.. मंदिराचा आवर प्रशस्त आहे.. मंदिर खूप छान 👌आहे..  रात्री दहाच्या संजय ट्रॅव्हल बसने पुण्यास परतीचा प्रवास... सदैव busy असणाऱ्या दीपक आणि सौ वैभवी वहिनी यांनी आमची पुणे त...

1985 Commerce Alumni

Image
  The function of Reunion of 1985 Commerce Batch was conducted in B K College Chikodi on 11.12.2022.The function began with prayer songs.  Afterwards some of the students spoke about the alumni fuction and expressed their gratitude to the college and teaching staff and grief for the departed teachers/students.   The students committee felicitated the chief guest and all the professors who taught right from PUC - I to  B.Com final.  The Chief guest Mr. Mahantesh M Kavatagimath (Director of KLE Society) spoke about the KLE Society and informed the students about role played by KLE Society in upliftment of eduction in unreached areas.   He expressed gratitude to the founders of College and stressed the need of "knowledge" in ones life.  Some of professors expressed their happines for the honour done by the commerce batch and appealed to the students for contributing to the development of college.   Some of the students on the spot...