१३ फेब्रुवारी - रेडिओ दिन .
१३ फेब्रुवारी - पहाटे रेडिओवर पुणे आकाशवाणी केंद्र लावले होते. आज रेडिओ दिन ...रेडिओचा वाढदिवस.. माझे मन बालपणी काळात गेले. घरी मोठा रेडिओ (४ बँडचा) (तेव्हा TV नव्हता - हा रेडिओ म्हणजे छोटा TV ). पहाटे सांगली आकाशवाणीवर ट्यूनने सुरुवात होई. स्तोत्र, सनई,बातम्या,भक्तीगीत, चिंतन यांनी सकाळची सुरुवात. चालू घडामोडीवर चर्चा, श्रुतिका, भारतीय संगीत, बातम्या यांनी दिवसाची सांगता.. इतरवेळी क्रिकेटची, हॉकीची कॉमेंट्री, सोमवारी बिनाका संगीत, चित्रपट गीत,.. कार्यक्रम.. कधीकधी रेडिओ आवाज येत नसल्यावर आम्ही मुले दोन्ही बाजूने हाताने कधी हळुवार कधी जोरात फटके मारत असू. कधी पूर्ण आजारी पडल्यावर वर रेडिओस डॉक्टरकडे दाखवायला घेऊन जात असे. गावात एकच दुरुस्ती दुकान.. तेव्हा बरीच रेडिओ यांची गर्दी. दुकानदार आज नाही उद्या असे चालढकल करे. आम्हाला बऱ्याच चकरा मारायला लागे. कधीकधी माझी मोठी बहीण दुकानात येऊन अजून का रेडिओ झाला नाही असे विचारायला आल्यावर रेडिओ घरी येत असे. क्रिकेट वेळी आम्ही रेडिओला खूप मिस करीत असू.
पुढे नोकरीनिमित्य पुण्याला आल्यावर पुणे आकाशवाणी केंद्र,विविधभारती केंद्र - जयमाला संगीत, भुलेबिसरे गीत, हे रात्री रेडिओ ऐकता कधी झोप लागे पत्ता नसे. पहाटे पुणे आकाशवाणीवर धून लागल्यावर जाग येई आणि तेव्हा लक्षात येई बिचारा रेडिओ मात्र रात्रभर जागाच असे. रेडिओवरील ज्ञान, मनोरंजन, माहिती, संगीत आणि इतर विविध कार्यक्रमामुळे वेळ मजेत जात असे. आजकाल मोबाईलवरसुद्धा बरेच रेडिओ केंद्र अँपद्वारे ऐकायला मिळतात. आजसुद्धा माझ्या निवृतीजीवनात मी दररोज TV पेक्षा जास्त वेळ रेडिओला देणे पसंत करतो. रेडिओचे अनन्यसाधारण महत्व जीवनात खूप आहे. याबाबत मी अधिक काय लिहणार म्हणा.. शेवटी आपण आकाशवाणी ऐकत जावे हेच खरे.. रेडिओदिनानिमित्य गत स्मृतींना उजाळा...
Comments
Post a Comment