श्रीमती प्रमिला रासने - श्रद्धांजली
आपल्या विंगमधील सौ. स्वप्ना पाटील यांच्या मातोश्रींचे देहावसान झाले ऐकून मनास वाईट वाटले. श्रीमती प्रमिला रासने या सिल्व्हरक्रेस्ट सोसायटी मध्ये आल्यावर गणपती उत्सव दरम्यान आमच्या घरी आल्या होत्या त्यावेळी ओळख आणि गप्पा झाल्या. त्याचे यजमान कै. श्री नरेंद्र रासने भारत सरकारच्या सेवेत उच्च पदावर कार्यरत होते. त्यांना शिक्षण,साहित्य,वाचन, प्रवास, संगीत आणि लिखाण याची आवड. त्यांचे बरेच लेख पूर्वी सकाळ आणि इतर वर्तमानपत्रात छापून आले आहेत. दुबई येथे असलेल्या आपल्या मुलीकडे जाऊन तेथील प्रेक्षणीय स्थळे पाहिली.दुबई येथील प्रसिद्ध इमारत बुर्ज खलिफा पाहून त्यावर मराठीत लेख लिहला. त्यांच्या नातीने मराठीतील या लेखाचे इंग्रेजीत अनुवाद करून दुबईच्या राजा याना पाठवला. दुबईच्या शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम यांना तो लेख वाचून खूप प्रभावित होऊन त्यांचे अभिनंदन आणि कौतुक विशेष पत्रातून केले होते. या आठवणी आम्हास सांगितल्या. त्यांनी आपल्या यजमानाच्याबरोबर इतर प्रवास केला. त्यांचे उत्तम सहजीवन समाधानी होते. खरगपूर IIT या संस्थेसपण भेट दिल्याचे सांगितले....