Posts

Showing posts from October, 2026

CBROA पुणे युनिट यांची वार्षिक सर्वसाधारण सभा - मुक्त छंद दिवाळी अंक

Image
  आज CBROA पुणे युनिट यांची वार्षिक सर्वसाधारण सभा सकाळी दहा ते बारा दरम्यान स्वामी कृपा हॉल कोथरूड येथे संपन्न झाली. सबंध वर्षातील CBROA च्या कार्यक्रमाचा आढावा घेतला गेला. वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी वेळात वेळ काढून पुणे क्षेत्रीय कार्यालयाचे उपमहाप्रबंधक  श्री सेंथिल कुमार यांनी हजेरी लावत कॅनरा बँकेच्या व्यावसायिक भरगोस  प्रगतीचा आढावा घेतला आणि साऱ्या निवृत्ती अधिक अधिकारी सभासदांना धन्यवाद दिले.आदरणीय श्री जगदीशजी जनरल सेक्रेटरी सीबीआरओ यांनी आपल्या प्रमुख भाषणात संघटनेबाबत माहिती, पेन्शन, इन्शुरन्स योजना, न्यायालीन केसेस,  आणि संस्थेच्या नवीन संकल्पना याबाबत विस्तृत माहिती सभासदांना सांगितली . आपल्या पुणे युनिटी यांनी घेतलेले उपक्रम, समाजसेवा, दिवाळी अंक प्रकाशन या सर्व कामा बाबत कौतुकाचे उद्गार काढले. सांस्कृतिक कार्यक्रम आणि सभासदांच्या सभा याबाबत CBROA  पुणे युनिट सर्वात प्रथम आघाडीवर आहे अशी कबुली श्री जगदीशजी यांनी देत असेच उपक्रम भविष्यात चालू ठेवण्याबाबत सभासदांना विनंती मध्यंतरानंतर दुपारी बारा वाजता मुक्त छंद दिवाळी अंक प्रकाशनाचा कार्यक्रम सुरू झ...

कर्नल्स क्यूब - "स्व-व्यवस्थापन" - डॉ. कल्पना देशपांडे

Image
  ताण तणाव मुक्त वृद्धत्वासाठी "स्व-व्यवस्थापन"  अत्यंत महत्त्वाचे असे मत डॉ. कल्पना देशपांडे यांनी "ताणतणाव मुक्त वृद्धत्व"  या कर्नल्स क्यूब संस्थेने आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. स्व व्यवस्थापनामध्ये वेळ, विचार, भावना, आरोग्य, सवयी आणि अपेक्षा यावर भर दिला जातो. स्व व्यवस्थापन म्हणजे फांद्या छाटण्यापेक्षा झाडाच्या मुळाकडे लक्ष देणे. नोकरी, संसार, मुलं, नातवंड आपण सर्व मॅनेज करतो पण आपले मन आपल्या ताब्यात आहे का?  दुसऱ्याला बदलायच्या भानगडीत पडायचे नाही. निवृत्तीनंतर आपली  भूमिका आणि रुटीन बदलते. आयुष्याचे घड्याळ बंद झाले असे होत नाही. निवृत्ती नंतर  आपण मार्गदर्शन आणि समाजासाठी काही योगदान देऊ शकतो का याचा विचार करावा. संयुक्त कुटुंबामध्ये नातवंडांच्या प्रेमापोटी आपल्या आरोग्याकडे, विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नये. आपल्या अपेक्षा बोलून दाखवा आणि  संवाद वाढवा. प्रेम आणि जबाबदारी यातील फरक ओळखा आपल्या मर्यादा ओळखा नकार देण्याची कला महत्त्वाची. काळजीपोटी कुटुंबात आपला जास्त हस्तक्षेप वाढत नाही ना याचा जरूर विचार करावा. सोडून द्यायला शिकावे. आपल्या मताप्...

जिव्हाळा - भोंडल्याचा आणि कोजागिरीचा कार्यक्रम

Image
  जिव्हाळा संघाचा भोंडल्याचा आणि कोजागिरीचा  कार्यक्रम उत्तम पार पडला.  आपल्या भगिनी मंडळींनी आनंदाने सहभाग घेत फेर धरत भोंडल्याची गाणी उत्तम म्हटली.  गाणी म्हणताना सासू बाबत राग, सुनेबाबत रुसवा फुगवा .. व्यक्त केला .आपल्या साऱ्या भगिनी मंडळींचा उत्साह आणि स्मरणशक्ती, आनंदी सहभाग याचे कौतुक वाटले.  हे सारे पाहताना आनंद झाला.  गरबा गाण्याबरोबर टिपऱ्या यांचा ताल मस्त जमला होता. शेवटी खिरापत खूप चविष्ट होती.  ऐलमा पैलमा .. हे ऐकल्यावर माझे मन बालपणात गेले. आमच्या गावी गल्लीमध्ये घरोघरी  भोंडल्याचा  कार्यक्रम असे. आम्ही मुलेपण  - बहिणीबरोबर भोंडल्यासाठी गल्लीमधील इतर घरी  जात असू.  गाण्यानंतर प्रसाद ओळखणे मजेशीर असायचे. मजा असे.  देवी पार्वती आणि हस्त नक्षत्र यांचे स्मरण आणि निसर्गाप्रती, शेती, मुबलक पीकपाणी याबाबत कृतज्ञता, एकमेकात खेळीमेळीचे वातावरण .. म्हणून भोंडला..  आपल्याकडे भरपूर पाऊस पडो आणि पीकपाणी भरपूर येऊ दे हीच निसर्गदेवतेस प्रार्थना ...आपल्या संघात आनंदी आणि एकमेकात जिव्हाळ्याचे  नातं वृद्धिंगत हो हीच प...

स्त्री जागर - शक्ती उपासना -

  स्त्री जागर - शक्ती उपासना - नवरात्रानिमित्य पुणे आकाशवाणी केंद्राने डॉ प्रज्ञा कुलकर्णी यांच्याशी संवाद कार्यक्रम सादर केला गेला. नवरात्रीच्या नऊ दिवसात स्त्रीने 9 कौशल्ये अंगीकारणे गरजेचे आहे - (१) वित्त - आपल्या घरी येणार पैसे सन्मार्गाने येतो हे पाहणे.  (२) तंत्र कौशल्य - घरातील गॅस, मिक्सर - याबाबत तांत्रिक बाबी  (३) सायबर सुरक्षा - मोबाईलवर येणाऱ्या फसव्या स्कीम्स, डिजिटल अरेस्ट , याबाबत जागरूक राहणे. (४) चालवणे -आपले शरीर  व्यवस्थित चालवणे - वाहन चालावयास येणे,  आपले घर चालवणे - हे कौशल्य  (५)  पाककला - स्वयंपाक करणे आणि करून घालणे - आपला राग, कंटाळा, चिडचिड बाजूला ठेवून आनंदाने स्वयंपाक करणे महत्वाचे. (६) मैत्रीजाल  - आपणास किमान ४-५ जवळच्या मैत्रिणी हवेत.  आपले सुख-दुःख मैत्रिणीसमवेत वाटा म्हणजे मन हलके होते.   (७) स्वप्रेम - स्वतःला जाणून घ्या आणि स्वतःवर प्रेम करायला शिका  (८) निवड करण्याचे कौशल्य - एखादा निर्णय घेताना योग्य पर्यायाची निवड करायला येणे गरजेचे.  आपली मर्यादा आणि बंधने माहित असणे महत्वाचे. ऐकावे ...

कर्नल्स क्यूब - "निरोगी वृद्धत्व - आनंदी आणि सक्रिय जीवनाची गुरुकिल्ली"

Image
  माणसाच्या मानसिक आणि शारीरिक क्षमता कमी होणे म्हणजे वृद्धत्व - Ageing  असे मत न्यूरोसायकॅस्ट्रिक व उपचार तज्ञ डॉ. सुमित चांडक यांनी "निरोगी  वृद्धत्व -  आनंदी आणि सक्रिय जीवनाची गुरुकिल्ली"  या कर्नल्स क्यूब संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.निरोगी वृद्धत्व म्हणजे काय .. वृद्धत्वात मानसिक आणि शारीरिक बाबी याबाबत उपाययोजना, वृद्ध लोकांच्या साठी सरकारने सुरू केलेल्या योजना, हेल्थ इन्शुरन्स, वृद्धांचे उत्पन्न आणि औषधावरील खर्च, वृद्धांचे कुटुंबातील आणि समाजातील स्थान या आणि अनेक विषयावर डॉ. चांडक यांनी पावर पॉइंट द्वारे उपस्थित सभासदांना माहिती दिली. शारीरिक हालचाल, व्यायाम  मित आहार, धुम्रपान आणि मद्यपान यांचा मज्जाव, नवीन भाषा शिकणे, आपले छंद जोपासणे, वाचन, शांत झोप..मित्रमंडळी संवाद,  वृद्धत्वाचा स्वीकार या गोष्टी आचरणात आणल्यास आपले वृद्धत्व आनंदी होईल.वरिष्ठ नागरिक यांच्यासाठी सरकारने योजना सुरू केल्या आहेत. त्या योजना तळागाळात सर्वत्र पोचवण्यासाठी आपण वृद्ध लोकांनी हातभार लावला पाहिजे. सगळ्या गोष्टी सरकारने कराव्यात असे न म्हणता आपण...

वाचनकट्टा -27 - सुखसंगत - ले. रवींद्र पिंगे

Image
  सुखसंगत   - ले. रवींद्र पिंगे  हा व्यक्तिचित्रणाचा लेख - यातील - बाबा बेलसरे - आनंदाचा डोह , अमृत प्रीतमची संध्याकाळ , डॉक्टर ग य चिटणीस. घरगुती आर के नारायण , व्यकंटेश माडगूळकर : आत्ममग्न लेखक,  वाचनीय आहेत.  डॉक्टर ग य चिटणीस लेखातील उतारा :   माणसाला, मग तो सामान्य चाकरमान्या असो, कलावंत लेखक असो किंवा  उपकारीवृत्तीचा उदारमनस्क विचारवंत असो, संसारात सतत जागृतच असार्व करून मिळणार नाही असली दर्जेदार प्रज्ञा त्यांना लाभली होती. रूप होतं. पैसे कर्मप्राप्त होऊन बसतं, ह्याचा डॉक्टरांचं आयुष्य हा छानदार आरसा आहे. नवस लागतं. जो संसारात डुलकी घेईल, त्याला काय धरावं लागतं आणि काय सोडणं येत होते-कुठून येत होते ते अनेकांना कोडं होतं पण येत होते आणि जातही लोटवालाशेटजीसारखा मित्र होता. अर्धी पृथ्वी त्यांनी पायाखाली घातली होती. होते. चांगले नामवंत मित्र होते. रॉयसारखा क्रांतिकारक त्यांचा सहकारी होता. संसारांचा अनुभव त्यांनी चाखलेला होता. सुलक्षणी मुलंबाळं झाली. मनासारखी साहित्यसेवा घडली. नाव झळकलं. तरीही काहीतरी राहून गेलं आहे, आपलं काहीतरी हरवलं ...

वाचनकट्टा -26 - रवींद्रयान - ले. रवींद्र पिंगे

Image
   रवींद्रयान   - ले. रवींद्र पिंगे   ललितलेख यांचा संग्रह -  यातील आर के नारायणाची अखेरची मुलाखत, पुरस्कारांचं महत्व किती ?, एका  शतायूचा सुखसोहळा , कोण कश्यासाठी लिहितात? , लेखनकला इतकी सोपी आहे ?  माझा लेखनप्रवास - हे ललितलेख वाचनीय  पुरस्कारांचं महत्व किती ? या लेखातील काही भाग  तेव्हा मला इतरांच्या यशाचा हेवा वगैरे कधीच वाटत नाही. माझे बाब मला नेहमी बजावायचे, 'रवी, लक्षात ठेव. बक्षिसं नि पारितोषिक मिळतात किंवा न मिळतात. त्यावर आयुष्यातलं काहीही अवलंबून नसतं. माणसाला देवाचा अनुग्रह लाभावा लागतो.' तेच खरं आहे नि ते एकदा उमगलं की शांत वाटतं. गौतम बुद्धांचा उपदेश आहे की यशस्वी होऊ नका; कारण यश चिकटलं की सभोवार मत्सरी माणसांची भिंत उभी राहते. त्यामुळे तुम्ही अस्वस्थ होता. अयशस्वीही होऊ नका, कारण अपयशानं तुम्ही आतून खचून जाता. यश आणि अपयश यांच्या पलीकडे एक निवांत पैस आहे, तिथे पोहोचा आशयसंपन्न, घाटदार, सोपं लेखन लेखकाला चार पावलं पुढे नेतं. अनेकजण विचारतात, धावपट्टीवर धावणाऱ्या इतर लेखकांचं डोंगराएवढं यश पाहून तुम्हांला निराशेचे झटके...

जिव्हाळा जेष्ठ नागरिक - सुनीताबाई पुरुषोत्तम देशपांडे यांच्या जीवनपटावर

  सुनीताबाई या पु. ल. च्या backbone होत्या असे मत श्री अमोल जोशी यांनी -  सुनीताबाई पुरुषोत्तम देशपांडे यांच्या जीवनपटावर आधारित अभिवाचनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले.  १० सप्टेंबर २०२६ रोजी जिव्हाळा जेष्ठ नागरिक संघानी आयोजित कार्यक्रमात श्री अमोल जोशी यांनी - १) ६० वा वाढदिवस - सुनीताबाई मला कोठे भेटली. २) सुभाष अवचट सुनीताबाई लेख, ३) सुनीताबाई -  प्रिय भाई पत्र  असे तीन लेखांचे अभिवाचन केले. शेवटी - सुनीताबाई आणि पु ल यांनी सादर केलेली - बा. भ. बोरकर यांची - माझ्या गोवाच्या भूमीत - या कवितेचा ऑडिओ  सादर केला.   साऱ्या सभासदांनी या श्रवणीय कार्यक्रमाचा आनंद लुटला. विशेषतः प्रिय भाई या पत्राच्या वाचनावेळी शांतता होती. अभिवाचनानंतर रसिक श्रोते विन्मुख झाले. श्री अमोल जोशी यांचे अभिवाचन उत्तम झाले. सर्वाना आवडले.  या सुंदर कार्यक्रमाबत जिव्हाळा जेष्ठ नागरिक संघाचे मनापासून धन्यवाद आणि आभार 

वाचनकट्टा -25 - दैव्य जाणिले कुणी - ले. रेखा राव

Image
  दैव्य जाणिले कुणी  - ले. रेखा राव या कथासंग्रहातील - नातं, नवा अर्थ , साई सुट्ट्यो,  अचानक अकल्पित, दैव्य जाणिले कुणी  या कथा वाचनीय  

वाचनकट्टा -24 - "केतकरवाहिनी "- ले. उमा कुलकर्णी

Image
  "केतकरवाहिनी "- ले. उमा कुलकर्णी  एक स्त्री लग्नानंतर  शहरातून कोकणातील एक दुर्गम खेडे गावात जाते.  केतकर कुटुंबियात सासू. सासरे आणि 10 नणंदा , एक दीर असा मोठ्या घरात तिचे वैवाहिक जीवन.  घरची शेतीवाडी वैभव  असताना अचानक आपल्या पतीचे दुःखद निधन.  आपल्या सासरेबुवाच्या मृत्यूनंतर तिने कोर्ट कचेरी कामकाजात लक्ष घातले आणि शेत जमिनीवर हक्काची लढाई एकटीने खेडेगावात राहून जिंकली. आपल्या चारी मुलांचे शिक्षण, लग्न व्यवस्थित पार पाडले.  जीवनात भोगावे लागलेले   मान - अपमान, इतर अनुभवाचे चित्रण डॉ. उमा कुलकर्णी यांनी पुस्तकातून उत्तमरीतीने मांडले आहे.   अतिशय सुंदर पुस्तक..  एका  जिद्दी स्त्रीची जिद्दी कहाणी लेखिकेने पुस्तकातून उत्तम व्यक्त केली आहे. पुस्तक वाचनीय आहे. 

माझ्या धाकट्या बहिणीचा स्वीडन परदेशवारी

  माझ्या धाकट्या बहिणीचा मुलगा स्वीडन देशात नोकरीस आहे.  आपल्या पतीच्या नोकरी आणि रजा आणि घरगुती कारणाने गेली ९ वर्षात स्वीडन देशात मुलाकडे घरी भेट देता आले नव्हते. ३१ जुलै २०२६  रोजी यजमान नोकरीतून निवृत्त झाले. तेव्हा मुलानेच स्वीडन देशास भेट देण्यासाठी २१ ऑगस्ट २०२६ चे मुंबईहुन विमान तिकिटाचे बुकिंग केले.   बहिणीची परदेशवारी तयारी (उबदार कपडे, खाण्याचे पदार्थ... आणि इतर गृहउपयोगी  वस्तू )..सामान  सुरु झाली.  आपल्या मुलाचा संसार पाहण्यासाठी उत्कंठा आणि कुतूहल...  मुंबईस जाताना वाटेत पुण्यास उतरून काही नातेवाईकांना भेटून जावे यामुळे १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ वाजता बेळगाव ते पुणे खाजगी गाडी बुक केली.  पुण्यातून मुंबईस जाण्यासाठी २० ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता गाडी बुक केली होती.  १९ ऑगस्ट -  सकाळी माझ्या बहिणीस ताप आला. उठवत नव्हते म्हणून बेळगावहून पुण्यास  सकाळी ११ वाजता प्रयाण सुरु केले. प्रवासात तापाची गोळी देत दोघे पुण्यास संध्याकाळी ६ वाजता सुखरूप पोचले.  बहिणीस बरे नसल्याचे आणि गोळी घेतली की ताप उतरतो पण परत ताप...

वाचनकट्टा -23 -अध्यात्माच्या वाटेवर

Image
  अध्यात्माच्या वाटेवर - ले प्रमोद केणे साधे सोपे अध्यात्म कसे जगायचे याबाबत लेखकांनी आपले विचार व्यक्त केले आहेत.  जीवनात भोग भोगून संपवायचे असतात. त्यांना पाठ दाखवायची नाही.  अध्यात्म समज आणि गैरसमज - उपासना, नवविधा भक्ती, भाव तोचि देव - आहाराचे महत्व, भक्तिमार्ग सोपा, आळसपणा  टाळा. कर्मयोग, स्तोत्रांचे पठण आणि महत्व, या आणि अनेक विषयावर उत्तम सोप्या भाषेत समजेल असे लेखन पुस्तकात केले आहे. लेखक हे नियमित श्री दत्ताची वारी गिरनार क्षेत्री करतात.  श्री दत्ताची उपासना मनास शांती देते.  अध्यात्मामध्ये  नामस्मरण हे खूप महत्वाचे आहे. अध्यात्माची आवड असणाऱ्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे. 

कर्नल्स क्यूब - "सांधेदुखी व सांध्यांचा विकारासाठी अक्युप्रेशरचे स्व उपचार "

  शरीरातील ऊर्जाचा समतोलपणा राखणे हेच ॲक्युप्रेशरचे काम आहे रोगावर लगेच उपचार होणे ॲक्युप्रेशरमध्ये महत्त्वाचे आहे असे उद्गार कर्नल पेंडसे यांनी "सांधेदुखी व सांध्यांचा विकारासाठी अक्युप्रेशरचे स्व उपचार "  या कर्नल्स क्यूब संस्थेने आयोजित कार्यक्रमात काढले. ॲक्युप्रेशर विकास संघटन पुणे यांच्यातर्फे कर्नल पेंडसे यांनी ॲक्युप्रेशरचा कसा उपयोग करायचा याबाबत माहिती देताना मेथी पट्टीचे महत्व, ती कशी वापरायची याबाबत माहिती सांगितली.  आपल्या शरीरातील प्रामुख्याने 20 प्रकारच्या सांधेदुखी या रोगावर उपचाराच्या पद्धतीबाबत माहितीपत्रक देऊन त्याचे प्रात्यक्षिके करून  दाखवले. बोटावर कुठे दाब द्यायचा आणि कुठे पट्टी लावायची हे सर्वांना सांगितले. मर्मदाब योग चिकित्सा (ॲक्युप्रेशर थेरपी)  बाबत सांगताना दररोज आठ मिनिटांचा ॲक्युप्रेशर थेरपी कशी करायची त्याबाबत माहितीपत्रक सर्वांना देत त्याचे प्रात्यक्षिके दाखवले. यातील  काही प्रात्यक्षिके  सर्वांच्याकडून थेरपी करून घेतली. याकामी ॲक्युप्रेशर विकास संघटन यांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना मदत केली. श्रोत्यांच्या प्रश्न आणि शंक...

वाचनकट्टा -22 -एक होती बाय - ले. सुरेन आपटे

Image
  एक होती बाय  - ले. सुरेन आपटे - मराठी अनुवाद - विनया खडपेकर -कोकणातील हातोडा या खेडेगावातील ज्यु जातीतील  तरुणी आपल्या दरिद्री जीवनास कंटाळून आपल्या हिमतीवर मुंबईस पळून जाते. आपले अविवाहित मातृत्व स्वीकारून ती हिंदू समाजात वावरते.  आपल्या सौंदर्यामुळे अनेक पुरुष तिच्याकडे आकर्षित होतात.  नर्सिंग नोकरी आणि नंतर चित्रपट क्षेत्रात आगमन आणि चित्रपट आणि नाटक येथे सुंदर अभिनयाने बऱ्याच चित्रपट काम केले.  आपले नोकरी/व्यवसाय करत दोन मुलांचा सांभाळ आणि पुरुषांचे मन जोपासत  संसार जिद्दीने -  करते. "प्रभात" कालच्या नटीच्या जीवनकहाणी.. तिने भरपूर कमावले तसेच गमावले -- तिच्या सुख दुःखाचे चित्र या कादंबरी सुंदरपणे रेखाटले आहे.  २००२ साली ही कादंबरी प्रसिद्ध झाली. त्यानंतर दुसरी आवृत्ती २००६ साली प्रकाशित झाली.  कादंबरी तीनशे पानावर आहे पण वाचनीय आहे.

जिव्हाळा - " पाऊसगाणी "

Image
  १३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजता जिव्हाळा संघाने " पाऊसगाणी " या कार्यक्रमात - पाऊस - गाणी, कविता, अनुभव, सिंथेसाईजर वादन सादर करण्यात आले. जवळजवळ १६ सभासदांनी कार्यक्रमात भाग घेऊन - कविता, गाणी, अनुभव, गायन वादन - सादर करत सभासदांना चिंब भिजवून सोडले. कार्यक्रमापूर्वी पावसाने विश्रांती घेतली होती. कार्यक्रमानंतर आठ वाजता घरी जाताना पावसाने प्रत्यक्ष  हजेरी लावली- काय योगायोग.. बहुतेक वरून पावसाने सारी गाणी, कविता, अनुभव, किस्से.. नक्की ऐकले असणार यात शंका नाही.. हा उत्तम श्रवणीय कार्यक्रमाची पावती खुद्द पावसाने दिली...    1) श्रावणात घननीळ बरसला.. ज्योती गटने 2) बरखा बहार आई.. डोंगरे 3) मेधा... कविता.. तो आणि तिची कविता...मदन जवळगेकर यांची कविता 4) एक लडकी भिगी .. शीतल 5) सुधा जोशी... पाऊस.  स्वरचित..6) उज्ज्वला कवठेकर.. मेघा रे मेघा तू बरसत ये  7) स्नेहल गोखले.. जिंदगी भर नहीं  भुलेगी बरसत की..8) एक प्रसंग.. बक्षी... पित्रे यांचा अनुभव..9) आशा पाठक जिलमिल सितारों का आंगन होगा..10) अंजली देशपांडे.. शंकर  उपाध्ये कविता...11) वासंती..अनुभव प्रस...

"प्रथमेश" - सौ. मेधाताई

  बेळगाव दौऱ्यात आमचा मुक्काम ४ दिवस प्रदीपकडे होता. "प्रथमेश" या वास्तूमध्ये प्रदीप भाड्याने राहत आहे. बंगल्यात हॉल प्रशस्त मोठा, ३ बेडरूम, स्वयंपाकघर मोठे, प्रत्येक खोलीत खिडकीतून प्रकाश, हवा खेळते.  चारीबाजूने कुंपणांजवळ फुलं फळांची झाडे,  दारासमोर कार आणि दुचाकीसाठी पार्किंग जागा, बंद विहीर आहे. हा बंगल्याचे मालक डॉ. साठे आणि सौ. मेधा साठे.  हे दोघे वरच्या मजल्यावर राहतात. आम्ही जवळजवळ पंधरा लोक येथे मुक्कामास होतो. आमच्या मुक्कामात दररोज आम्हा सर्वांची भेटीतून चौकशी करत.  एकदिवस चहासाठी डॉ. आणि सौ. मेधाताई आले असताना आम्हा साऱ्या भावंडांची व्यक्तिशः प्रत्येकाची  चौकशी केली.  आमच्या गप्पा आणि चेष्ठा.. आवाज .. यामुळे आपणास त्रास होत असेल नाही का ? असे विचारल्यावर - आम्हास तुम्ही सगळे एकत्र जमला आणि वाढदिवस, निवृत्ती दिन साजरे केलात हे पाहून आम्हास आनंद झाला आणि बरे वाटले अशी कबुली उभयतांनी आम्हास दिली.   सौ. मेधाताई डॉ. अदितीस आपली मुलगी याप्रमाणे आपुलकी दाखवत प्रेम करतात.. माझी मैत्रीणप्रमाणे आमचे नाते आहे असे सौ. संपदा वाहिनीनी आवर्जून स...

बेळगाव, बदामी, अलमट्टी - १० ऑगस्ट २०२६

Image
  १० ऑगस्ट २०२६ - सकाळी सात वाजता बेळगाव हुन बदामीकडे प्रयाण - नेसरगी येथे नाश्ता केला. श्री करियम्मा देवी मंदिर - बुद्धिगोप  (ता. सवदत्ती )   - बेळगावहून बदामीस जाताना नेसरगी पासून दोन किलोमीटर वर  वाटेवर मुख्य रस्त्याबाजूला हे मंदिर आहे. या देवीची शक्ती अलौकिक आहे.  आपल्या प्रवासाचे संरक्षण असे या देवीस संबोधले जाते. प्रत्येक वाहन चालक (बस, ट्रक, कार ..) येथे मुद्दाम थांबून देवीचे दर्शन आणि नमस्कार करूनच पुढचा प्रवास करतात. या देवीचे दर्शन घेतले तर पुढचा प्रवास हा सुखकर आणि सुलभ होतो.  गाडी चालवताना कोणतेही अडथळे येत नाहीत. आम्ही उतरून या देवीचे दर्शन घेतले आणि सर्वांचा जीवनाचा प्रवास सुखकर हो हीच प्रार्थना केली.  सकाळी आम्ही अकरा वाजता बदामीस पोचलो. श्री शाकंभरी देवीचे दर्शन, कुंकुमार्चन, इतर पूजा करून यलगुर मारुती कडे प्रयाण केले. श्री शाकंभरी देवीचे दर्शन घेतल्यावर मन प्रसन्न झले. देवीच्या मूर्तीमध्ये विशेष divinity  जाणवते.  बदामीहून आलमट्टी धरण कडे प्रवास करताना वाटेत यलगुर या गावी भेट दिली.  येलगूर येथे येलगुरेश्वर हनुम...