Posts

Showing posts from March, 2026

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

Image
  कर्नल्स क्यूब संस्थेने संजय ओस्तवाल यांचे "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"  यावर व्याख्यान आयोजित केले होते. सादरकर्ते  संजय ओस्तवाल हे योगाचार्य बीकेएस अयंगार यांचे शिष्य. प्रारंभी योग म्हणजे काय.. योग म्हणजे मन आणि शरीर यांचे मिलन. आपल्या विचारावर शरीर चालते. योगमुळे मन शांत होते. सुखात किंवा दुःखात मन आपले स्थिर राहते. आपल्या शारीरिक हालचालीमुळे आपल्या स्नायूचे काम व्यवस्थित चालते. प्राणायामने आपल्या नसामधील रक्तपुरवठा सुरळीत होऊन आपले शारीरिक स्वास्थ व्यवस्थित राहते. आपले पचनक्रियेचे काम योगामुळे सुरळीत राहते. आपले पोट म्हणजे दुसरा मेंदू. आपली पचन क्रिया व्यवस्थित असेल तर हॅप्पी हार्मोन्स आपल्या मेंदूला सिग्नल्स देतात  पचनामुळे मेटाबोलिझम सुधारते. आपला स्ट्रेस कमी होतो. स्ट्रेस कमी झाल्यावर आपल्या शरीरातील चांगल्या बॅक्टेरिया यांचे प्रमाण वाढीस लागते. बॉल सॉकेट जॉईंट यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते. बॉल सॉकेट, चेस्ट स्ट्रेचिंग आणि हीप  जॉइंट्स याबाबत योगांचे प्रात्यिक्षिके करून घेतली. श्रोत्यांच्या शंकांचे संजय ओस्तवाल यांनी समाधानकारक निरसन के...

वास्तुशांत व गृहप्रवेश कार्यक्रम

Image
  २६.०३.२०२६ - श्री रामनवमी - डॉ. आशुतोष आणि डॉ. गायत्री यांच्या नव्या वास्तूची - वास्तुशांत व गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  नवी वास्तू कोथरूड भागातील - "एलीटस"  इमारतीत १७ व्या मजल्यावर आहे.  वास्तू जवळ वेदभवन, शृंगेरी मठ, पुणे मुंबई हायवेलगत - चांदणी चौक येथील निसर्गरम्य परिसरात - आजूबाजूस गणपती मंदिर -  वास्तूमध्ये भरपूर हवेशीर, उजेड - बाल्कनीतून निसर्गदर्शन -  वास्तूमधील प्रत्येक खोलीतील सुंदर आकर्षक फर्निचर आणि जागेचा उत्तम वापर आणि सुंदर कलात्मक सजावट केली आहे.  दारासमोरील सुंदर रांगोळी ... हे सर्व पाहून मनास आनंद झाला.  अश्या भव्य आणि दिव्य वास्तुशांत  कार्यक्रमास हजर राहणे आणि तेसुद्धा श्री रामनवमी दिनी .. हे म्हणजे दुग्ध शर्करा योग...माझ्या आयुष्यात हा प्रथमच योग ...खरच मी भाग्यवान.. जय श्रीराम ..श्री सत्यनारायण पूजा, प्रसाद आणि भोजन सारे उत्तम आणि चविष्ट होते. सतराव्या मजल्यावरील वास्तूत राहण्याऱ्या डॉ. आशुतोष, डॉ. गायत्री आणि त्यांच्या कुटुंबियांचे पाय मात्र नेहमी जमिनीवरच असतात.. दोघे डॉक्टर अत्यंत नम्र, कमालीचा सा...

विराट हिंदू संमेलन - डॉ.संजय उपाध्ये

Image
  विराट हिंदू संमेलना डॉक्टर संजय उपाध्ये यांचे हिंदुत्वावर भाषण आयोजित करण्यात आले होते. उपनिषदामध्ये विराट याचा अर्थ महान आत्मा असा आहे असे उद्गार डॉ. संजय उपाध्ये यांनी  काढले. अस्वच्छता, अतिरेकीपणा, पाशवी अत्याचार, स्त्रियांची अवहेलना, इतर जातीचा अपमान, द्वेष अशासारख्या हीन  गोष्टी जिथे नाहीत तो हिंदू. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर हिंदूंची स्थिती कशी होती. हिंदू बहुसंख्य असून सुद्धा आम्हाला हिंदू म्हणून घेणे कमीपणाचे वाटते याबद्दल खेद व्यक्त केला. डाव्या लोकांनी आणि बुद्धीवादी लोकांनी हिंदू धर्मातील प्रथा व टीका करून हिंदू धर्माची टीका केली. आपण निधर्मी आहोत हे दाखवत इतर धर्माच्या बाबत मौन पाळले. आता मात्र सर्व हिंदूनी एकत्र येऊन आपली ताकद दाखवली पाहिजे. धर्मातील सण एकत्र येऊन साजरे करावेत. आपली  वसुधैयव कुटुंबकम याबाबत विचार व्यक्त केले. आपली भाषा आणि राष्ट्र प्रेम याचा सन्मान आणि गौरव केला पाहिजे. हिंदू धर्मातील लग्न कुटुंब मुला मुलींचे संगोपन याबाबत आपले आचरण कसे असावे हे सांगितले. काही वाईट प्रथा किंवा चुकीचा आचार यावर शाब्दिक चिमटे काढून सत्य परिस...

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

Image
  विराट हिंदू संमेलना अंतर्गत श्री शरद पोंक्षे यांचे हिंदुत्वावर भाषण आयोजित करण्यात आले होते. मुसलमान आणि ख्रिश्चन धर्म पाहता हिंदूंना संमेलन घ्यावे लागते हे पाहता शरमेची बाब आहे. मनुस्मृति न वाचता काही लोक ती जाळण्याची भाषा करतात. हे अतिशय वाईट आहे. कित्येक लोकांनी उपनिषद, वेद, भगवतगीता, रामायण हे वाचले नाही आणि तरी हिंदू धर्मावर टीका करतात हे एक प्रकारचे अज्ञानच आहे. आपल्या राष्ट्रांनी योग, पंचांग, शून्य, आयुर्वेद अशा आणि इतर काही गोष्टी सर्वप्रथम जगाला दिल्या त्याचा विसर आपल्याला पडलेला आहे. इंग्रजांनी आपली शिक्षणसंस्था, भाषा अशा यावर घाला घालून हिंदू कुटुंबसंस्था, शिक्षण पद्धती त्याचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न केले. स्वातंत्र्यानंतर  मताचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून खोटा निधर्मीवाद पसरवला हिंदू मध्ये मतभेद आणि दुफळी माजावली. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे पराक्रम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व बाबत विचार स्वतः मांडले आता सर्व हिंदूंनी एकत्र येण्याची गरज आहे. हलाल सर्टिफिकेट बाबत माहिती देत अशा वस्तू अजिबात खरेदी करू नका. स्वदेशी वस्तू वापरत  हिंदू व्यापा...

"लग्न संवाद" - अनुरूप विवाह संस्था

Image
  22 मार्च २०२६ -  एस एम जोशी सभागृह येथे अनुरूप विवाह संस्थेने "लग्न संवाद"  या विषयावर कार्यक्रम आयोजित केला होता.  यामध्ये अनुराधा करकरे आणि गौरी कानेटकर यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. लग्न संवादामध्ये संवाद कौशल्य खूप महत्त्वाचे असते समजूतदारपणा, भावना, दुसऱ्याचे पूर्ण  ऐकून घेणे, नेमकेपणाने उत्तर देणे,.प्रतिसाद देणे हे खूप महत्त्वाचे असते. सध्या लग्नाची वय पुढे गेली आहेत. नेहमी चांगल्या गोष्टी शेअर करा. आपला संसारातील रडगाणे टाळा. संवादामध्ये समान पातळीवर  या. संवादामध्ये प्रेम, केयर, शेअर, फ्रीडम ऑफ चॉईस, रिस्पॉन्सिबिलिटी आणि रिस्पेक्ट या बाबी खूप महत्त्वाच्या. गौरी कानेटकर आणि प्रतीक्षा या दोघांनी घराघरातील आई मुलगा/मुलगी यांच्यातील संवाद कसा असतो/घडतो याचे प्रत्यक्ष दाखवले. अनुरूप संस्थेच्या सर्वेसर्वा डॉ. गौरी कानेटकर यांनी विवाह बाबत मुला मुलीशी कसा संवाद असावा आणि इतर काही टिप्स पालकांना दिल्या. संवादामध्ये उलट तपासणी करू नका.  विवाहबाबतची भीती कमी करा दुसऱ्याबाबत सहानुभूती हवी स्वतंत्र विचारसरणी, भावना समजून घ्या जागरूकता हवी. आमच्या वेळी अ...

विराट हिंदू संमेलन पेठकर साम्राज्य - 21.03.2026

Image
  विराट हिंदू संमेलन पेठकर साम्राज्य मैदान बळवंतपुरम कोथरूड पुणे  येथे आयोजित करण्यात आले होते. हिंदू जागरण ऊर्जा आणि चेतना आपली सनातन संस्कृती धर्म आणि सामाजिक एकतेचे प्रतीक म्हणून हिंदू संमेलन आयोजित केले होते. मारुती मंदिर येथून पालखी, लेजीम समवेत प्रभात फेरी काढण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवातीस श्री हांडे  महाराज यांनी हिंदू मी एकत्र येणे महत्त्वाचे आहे असे सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या पंचसूत्रीबाबत अश्विनी प्रयाग यांनी आपले विचार व्यक्त केले. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत - हिंदू धर्माच्या प्रत्येक महिन्यातील सणाची माहिती, भारतातील विविध प्रदेशातील हिंदू संत मंडळी,  - एकात्मता स्तोत्र, असे विविध कार्यक्रम  प्रत्यक्ष आणि मोठ्या पडद्यावर सादर करण्यात आला. RSS संस्थेस १०० वर्ष पूर्ण झाली. RSS संघटना, संस्थापक डॉ, केशव हेडगेवार यांची विचारसरणी आणि श्री गोलविलकर गुरुजी यांचे कार्य, पहिले महायुद्ध, स्वातंत्रपूर्व आणि  स्वातंत्रनंतर देशातील राजकीय आणि सामाजिक  स्थिती, रामजन्मभूमी वाद, याबाबत विस्तृत माहिती श्री सुनील देवधर यांनी आपल्या भा...

कर्नल्स क्यूब - "भाग्यरंग" - पाडवा पहाट कार्यक्रम

Image
  भारती सांस्कृतिक मंडळ व कर्नल्स क्यूब यांच्या संयुक्त विद्यमाने पाडवा पहाट कार्यक्रम भारती  निवास सहकार सदन पुणे  येथे आयोजित करण्यात आला होता. "भाग्यरंग"  या कार्यक्रमाअंतर्गत भाग्यश्री गोडबोले यांनी आपले गायनकला सादर केली, कार्यक्रमाची सुरुवात राग ललत या बंदिशीने झाली. स्वर, शब्द आणि चित्र कॅनव्हास.. रंग देणारी म्हणजे.. भाग्यश्री. रामायणातील खारुताईचे वर्णन यावर बंदिश रामायण रचून ती सादर केली. भावना मनातून.. शब्द आपोआप सुचतात आणि शब्दावर सूर जमतात कल्पना मनातून येतात.. अशी कबुली भाग्यश्री गोडबोले यांनी दिली. नवदुर्गा शैलपुत्री आणि सुर दीपावली मध्ये वसुबारस गाईचे वर्णनावर बंदिशी रचून गायल्या, रघुवंशीचा राम तसाच यदुवंशीचा शाम या गाण्यास चाल लावून दुर्मिळ गाणे गायले. भाग्यश्री गोडबोले यांना गायनाबरोबर चित्रकलेचीपण आवड आहे. त्यांनी काढलेल्या सुरेख चित्रांचं प्रदर्शन कार्यक्रमास्थळी प्रदर्शित करण्यात आले. बालगणेश या दोन चित्रावर  वेगवेगळी गंमतशीर स्वरचित बंदिशी रचून श्रोत्यांसमोर सादर केली. श्रोत्यांनी स्वरचित बंदिशींना उत्तम दाद दिली.  तबल्यावर अमित जोशी, स...

वाचनकट्टा - 11 - नवरसांचा जादूगार मोहम्मद रफी - ले. मृदुला दाढे

Image
  नवरसांचा जादूगार मोहम्मद रफी  - ले. मृदुला दाढे  पुस्तकाच्या उपसंहार मध्ये नमूद -  पुरुषी स्वर पण त्याला होती जितकी ऐट तितकीच अदब,  प्रेम, छेडछाड, प्रेमभंग, विफलता,उद्वेग, नटखटपणा, शुद्ध भक्ती आणि अशा असंख्य भावछटा रफी स्वरातून सारख्याच सहजपणे नि कुशलतेने उमटल्या.. रसिकांना नाना रसांचा वर्षावात आजपर्यंतची भिजवत राहिल्या.. म्हणून तर रफी ठरले नवा रसाचे जादूगार ! हे खरे आहे. या पुस्तकामध्ये लेखिका रफींच्या आवाजातील जादूचे  रहस्य  आणि रफींची निवडक 25 गाणी आणि त्यांचे रसग्रहण केले आहे. पुस्तक वाचनीय आहे.

कर्नल्स क्यूब - श्री ज्ञानेश्वरी - कृतार्थ जीवनाचा मार्ग -अनिरुद्ध देशमुख

Image
  ईश्वरनिष्ठ जीवन म्हणजे कृतार्थ जीवन तेथे सुख आणि शांती भरपूर असते. काळजी,असुरक्षितता, कामना, वासना, अपूर्णता हे सगळे निघून गेलेले असतात. असे विचार  अनिरुद्ध देशमुख यांनी " श्री ज्ञानेश्वरी - कृतार्थ जीवनाचा मार्ग"  या विषयावर कर्नल्स क्यूबने आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले. आपल्या प्रास्ताविकात संतसम्राट श्री ज्ञानेश्वर यांचा जीवन आणि कार्याबद्दल माहिती सांगत पूर्वपुण्य असेल तरच ज्ञानेश्वरीचे वाचन घडते असे सांगितले. श्री ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरील काव्यात्मक टीका आहे. ज्ञानेश्वरीतील काव्य, शब्द हे श्री मुकुंदराज यांच्या साहित्यात सापडत नाहीत असे ज्ञानेश्वरी चे आगळे महत्त्व आहे. "एक तरी ओवी अनुभवावी" ... असे खुद्द  श्री नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वरी बाबत उद्गार काढले आहेत. ज्ञानेश्वरी नित्य नूतन आहे. ज्ञानेश्वरी वाचताना हळुवारपणे चित्तात येऊ द्या मन हळुवार पाहिजे तसेच गंभीर आणि स्थिरता हवी. सर्व उपनिषदांचे सार म्हणजे गीता. कृष्णा आणि अर्जुन यांचा मोकळा संवाद म्हणजे गीता. अर्जुन आणि आपल्या मनाचे लगाम श्रीकृष्णाकडे सोपवले.आपल्या  अंतःकरणात श्रीकृष्ण आहे...

वाचनकट्टा - 10 - सर्वोत्तम रवींद्र पिंगे.. ले. रवींद्र पिंगे.

Image
  सर्वोत्तम रवींद्र पिंगे.. ले. रवींद्र पिंगे. या पुस्तकात विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तीवर ललित लेखन. पुस्तकातील ललित लेखनापैकी  पु ल,  कुमार गंधर्व, दुर्गा भागवत, उपळे - सुंदर माझा गाव. हे लेख आवडले. "संवाद स्वतःशी ", "आकाशवाणी वरचे दिवस ", "माझे बाबा आणि मी"  आयुष्यातले अविस्मरणीय , घडले तेच पसंत.. हे लेख मनास भावून होऊन गेले. "संवाद स्वतःशी"  या लेखांमध्ये काही प्रश्न आणि त्याला त्यांनी स्वतः दिलेली उत्तर.. हा लेख वाचनीय आहे. " घडले तेच पसंत"  या लेखात लेखकांनी चिंतन सुंदर व्यक्त केले आहे. शेवटचा काही भाग मला येथे नमूद करायचा मोह होतो तो असा.  आता भरत वाक्य.. माझा जन्म 13 मार्च 1926 चा म्हणजेच 13 मार्च 2026 रोजी माझी जन्मशताब्दी असणार आहे त्या दिवशी कोणालाही माझी आठवण नसेल किंवा क्वचित कोणालाही  असेलही.  "रवींद्र पिंगे"  हे नाव त्यावेळी अडगळीत पडलेले असेल ही दगडावरची रेघ.  तथापि निराकार नियतीचा माझ्यावर उदंड अनुग्रह आहे.  लेखन केल्याचे तेवढे श्रेय मला पुरेसे आहे प्रेम तर मला याच जन्मी घरी आणि दारी पोटभर मिळाले.  अन्य...

वाचनकट्टा -9 -झेन - लेखक शूंनम्यो मसुनो - अनुवाद डॉ. सुचिता नांदापूरकर फडके

Image
  झेन  - लेखक शूंनम्यो  मसुनो -  अनुवाद डॉ. सुचिता नांदापूरकर फडके. लेखक प्रख्यात बौद्ध संन्यासी आहेत. साधा सरळ जीवन जगण्याची कला याबाबत लेखक यांनी आपले छोटेसे आणि सोपे विचार या पुस्तकात मांडले आहेत. शंभर दिवसाकरता प्रतिदिन एक नियम अमलात आणण्याचा ते सल्ला देतात. आयुष्यामधील छोट्या बदलातून सुद्धा अनुभूती येऊन प्रसन्नता लाभते. आपल्याला  आंतरिक शांती आणि स्थैर्य याचा अनुभव येऊ शकतो. माझ्या मुंबई दौऱ्यादरम्यान हे पुस्तक वाचले. पुस्तक वाचनीय आहे. वाचून अमलात आणले पाहिजे.

वाचनकट्टा - 8 -सोनेरी सूर्यफूल - ले. रवींद्र पिंगे.

Image
  व्यक्तिरेखांचा हा संग्रह. व्यक्तिरेखापैकी  पु. ल., शांताबाई शेळके, व. पु. कुसुमाग्रज.  आर के लक्ष्मण, प्रिया तेंडुलकर, दुर्गाबाई भागवत - यांचे ललित लेख आवडले.

वाचनकट्टा - 7 - असहमतीचा आवाज - संपादन अरुण शेवते.

Image
  ऋतुरंग दिवाळी अंकातील लेखाचे हे पुस्तक. लेखक आपल्या प्रस्तावनेत म्हणतात -  असहमतीचा आवाजाचे स्वरूप वेगळे असते. व्यक्तिगत आयुष्यात आपल्या कार्यरत क्षेत्रात असहमत होण्याचे प्रसंग येतात व समज झाले की त्याचे चांगले वाईट परिणाम असतात किंवा काही घडलेही असेही नाही.  असहमतीचा आवाज आपल्याला बरेच काही शिकवून जातो. संदीप वासलेकर, सुशील कुमार शिंदे, राम नाईक, मधुकर भावे, रणवीर शिंदे,  डॉ. पी डी पाटील, शंकरराव गडाख, राजीव खांडेकर, अमरीश मिश्र, राहुल गडपाले, विनय सहस्त्रबुद्धे, मृदुला भाटकर, श्रीकांत भोजेवार, संजय नहार, शुभदा चौकर,  प्रा. मिलिंद जोशी,  नितेश गट्टे,  जगनाथ पाटील -  यांनी आपल्या आयुष्यातील असहमतेचा आवाज अधोरेखित केला आहे. पुस्तकातील सर्व लेख वाचनीय आहेत.

वाचनकट्टा - 6- "सार्थ " - ले. एस एल भैरप्पा - अनुवाद - उमा कुलकर्णी.

Image
  ‘सार्थ’ म्हणजे व्यापारी तांडा.  ही सातव्या - आठव्या शतकातील कादंबरी.  वैयक्तिक कारणामुळे नागभट्ट हा गावाबाहेर पडतो आणि सार्थ बरोबर सहभागी होऊन प्रवास करतो. ब्राह्मण नागभट्ट आणि राजा अमरुक यांची मैत्री, राजाची स्त्रीलंपट वृत्ती, पत्नीचा विश्वासघात आणि त्या आघातातून जन्मलेला नागभट्टाचा अंतर्मुख प्रवास या कादंबरीचा केंद्रबिंदू आहे. नाटक, तंत्रसाधना, ध्यानमार्ग, प्रेम आणि विरक्ती यांमधून नागभट्टाचा संघर्ष आकार घेतो. चंद्रिका या नटीसोबतचं त्याचं नातं प्रेम, आत्मसंयम आणि आध्यात्मिक मूल्यांचा संघर्ष उभं करतं.

विनयाताई गाडगीळ - श्रद्धांजली

  आज विनयाताई गाडगीळ यांना परलोकात  जाऊन 14 दिवस झाले. आज चौदावा. काय योगायोग पहा आज मराठी भाषा दिन. त्यांचे मराठी भाषेवर अत्यंत प्रेम होते. मराठी भाषा दिनानिमित्त त्या नेहमी दरवर्षी सोसायटी किंवा इतरत्र कार्यक्रम सादर करीत असत.  मराठी भाषा दिनाच्या आधी पंधरा-वीस दिवस त्या माझ्याकडे "कुसुमाग्रजांची रसयात्रा" - कविता या पुस्तकाची मागणी करून त्यावर विशेष लेखन करीत असत..  विनयाताई मराठी विषयाची  शिकवणी विना मोबदला घेत असत. मराठी निबंध आणि कविता व्याकरण आवडीने शिकवत निबंधांचे परीक्षण काम त्यांनी अनेकदा केले आहे त्यांच्या या मराठीच्या कामाबाबत त्यांचे विशेष सत्कार काही संस्थांनी केले आहेत. त्यांनी आपल्या जीवनातील आठवणी "निखळ निरंतर" या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत.या हस्तलिखित पुस्तकाचे प्रकाशन  माझ्या हस्ते  एक मार्च 2020 रोजी संपन्न झाला. वास्तविक माझी लायकी नसताना मला प्रकाशनची संधी आणि मान त्यांनी मला दिला याबाबत मी खरंच भाग्यवान... . प्रत्येकाच्या जीवनात अनेक प्रसंग, घटना घडतात त्या आठवणी व्यवस्थित स्वहस्ताक्षरात  लिहून काढणे हे सध्याच्या यांत्रिकीय...