माझे वाचन -11
परतवारी - ले. सुधीर महाबळ
पंढरीची वारी ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. परतवारी म्हणजे पंढरीहून परत आळंदीकडे प्रस्थान..लेखक सुधीर महाबळ आपल्या निवडक मित्रासह २००५ सालापासून परतवारी करत आहेत. रोज ३५ कि.मी. पायी प्रवास..परतवारी समयी कष्टप्रद प्रवास, सोयी-सुविधा यांचा अभाव असतो. या पुस्तकात लेखकांनी भेटलेले भक्त, निसर्ग, माणसे आणि इतर प्रसंग यांचे उत्तम चित्रण आहे. आपल्याला मिळालेल्या नवीन गोष्टी आणि माणसाशी माणुसकीचे नाते - यातून आपला अहंकार कसा गळून पडतो हे दिसून येते. हे पुस्तक सवड काढून वाचण्याजोगे आहे.
Comments
Post a Comment