माझे वाचन -14
मी एक संन्याशी - मूळ इंग्रजी लेखक पुरोहित स्वामी - अनुवाद मृणालिनी चितळे
आपला वडिलांचे आत्मचरित्र - An Indian Monk या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद मृणालिनी चितळे यांनी केला आहे. लहानपण ते अध्यात्मिक गुरु या जीवनाचा प्रवास या पुस्तकात व्यक्त केला आहे. श्री दत्तगुरु यांची भक्ती, उपासना करणे महत्वाचे. नरसोबावाडी आणि गिरनार या तीर्थक्षेत्रांचे महत्व स्वामींनी सांगितले आहे. संन्यासी जीवन जगत असताना आलेले अनुभव,खडतर दिनचर्या, आहार, विहार याबाबत लेखकांनी लिहिले आहे. थोडे दिवस संसारी जीवन जगल्यावर नंतर गुरूंच्या आज्ञेनुसार भारतभर भ्रमण करून अनेक तीर्थ स्थानास भेटी देत असताना काही मंदिरातील, जंगलातील अद्भुत दैवी अनुभव हे पण सुंदर व्यक्त केले आहेत. परमेश्वरावर श्रद्धा हवी.. आपल्या कसोटीच्यावेळी तेव्हा पॅरामेश्वराचाच आसरा असतो याची स्वामींना प्रचिती येते. याचे बरेच दाखले स्वामींनी पुस्तकात दिले आहेत. हे सारे अनुभव उत्तमप्रकारे लेखकांनी पुस्तकात लिहिले आहेत. लेखिकेने उत्तम अनुवाद केला आहे. हे पुस्तक वाचनीय आहे.
हे पुस्तक माझ्या दादांनी (वडिलांनी) माझा दोन नंबराचा भाऊ कऱ्हाड येथे असताना विकत घेतले होते. पुस्तकावर माझ्या दादांचे अक्षर - "कऱ्हाड १८.०९.१९८७" असा उल्लेख आहे. हे पुस्तक नंतर माझ्या तीन नंबरचा भाऊ याच्या घरी गेले आणि २०१८ साली मुंबईहून माझ्या घरच्या ग्रंथालयात विराजमान झाले. सात वर्षांनी मी हे पुस्तक वाचले. आज तारीख - १८.०९.२०२५ - काय योगायोग बरोबर ३८ वर्षांनी हे पुस्तक वाचण्याचा योग येऊन या पुस्तकावर थोडे लिखाण घडले.. हे वाचून नक्कीच कै. ती. दादांना आनंद झाला असणार यात शंका नाही.. पुस्तके नेहमीच आनंद देतात नाही का ...?
Comments
Post a Comment