एक डॉक्टर घडताना - डॉक्टर्स डे निमित्य

 



१ जुलै २०२५ - डॉक्टर्स डे निमित्य - एक मुलाचा/मुलीचा डॉक्टर होण्याआधीपासून ते डॉक्टर झाल्यानंतरचा प्रवास, अर्थातच .. एक डॉक्टर घडताना  या विषयावर -  शिरीष थिएटर्स आणि रियाज ग्रुप आयोजित API पुणे प्रस्तुत हिंदी गाण्याचा कार्यक्रम बालगंधर्व पुणे येथे संध्याकाळी आयोजित करण्यात आला होता.  MBBS  ला प्रवेश घेतल्यानंतर कॉलेज जीवन, इंटरशिप, पीजी परीक्षा, स्वतःचा व्यवसाय, लग्न,संसार .. या प्रवासावर साजेशी जुनी हिंदी गाणी ...कार्यक्रमाची सुरवात गजाननास वंदन - गणनायका ..कथक नृत्याने झाली. हिंदी गाण्यामध्ये - जिंदगी आ रहा हू मै, दिल है छोटासा, यो सिकंदर है वो, उन्से मिली नजर, दिलबार मेरे, नजा मेरे दिल को, कोरा कागज था, भली भली सुरत, शायद मेरा शादी का, नखरेवाली, उठे सब के कदम, मौसम मस्ताना रस्ता अंजाना, मेरे सपणो की रानी, मायेरी मै कहांसे कहू, रुक जाना नही, सामने ये कौन आया, जिंदगी कैसी ये पहेली है. काहीजणांनी स्वरचित कविता, मौथ ऑर्गन वर बडे अच्छे लगते, सिन्थेसाझर वर नीले नीले अंबर पर चांद.. गाण्याचे वादन केले.


कार्यक्रमाची सांगता जिंदगी मिल के गायंगे या गाण्यांनी झाली. कार्यक्रमाची संकल्पना आणि संहिता डॉ प्रीती घोलप यांची होती. कार्यक्रमात जवळजवळ १२ डॉक्टर्सनी उत्तम गायन आणि वादन कला सादर केली. सगळीच गाणी अत्यंत श्रवणीय होती. प्रारंभापासून शेवटपर्यंत बालगंधर्व रंगमंदिरात भरगच्च गर्दी होती. साऱ्या रसिकांनी गाण्यास उत्तम प्रतिसाद दिला आणि काही गाण्यांना वन्स मोर देत या सुंदर कार्यक्रमाचा आनंद लुटला.रसिक प्रेक्षकांची दाद पाहून असा कार्यक्रम दरवर्षी करू असे आश्वासन आयोजकांनी दिल्यावर रसिकमंडळी खूष झाली


डॉक्टरमंडळींचे जीवन प्रवास, कष्टमय आणि जोखीमपूर्ण व्यवसाय आणि सामान्यांना "देवा "सारखे स्थान असणारे डॉक्टर यांच्या बाबत कृतकृत्य वाटले. त्यांच्या निरपेक्ष कामगिरीबाबत मनापासून सलाम..त्यांचे भावी जीवन सुखसमाधान, आनंददायी आणि आरोग्यदायी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करीत जड अंतःकरण रंगमंदिराच्या निरोप घेतला.कार्यक्रमाबाबत डॉ.प्रीती घोलप यांना मनापासून धन्यवाद आणि नमस्कार..  बऱ्याच दिवसांनी एक अत्यंत हृदयस्पर्शी  श्रवणीय कार्यक्रम पाहिल्याचे समाधान मनास झाले. चंद्रशेखर मधुकर कुलकर्णी कोथरूड पुणे मोबा.- 7767091069.

Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा