Posts

Showing posts from September, 2024

जपान -1

Image
  2१ सप्टेंबर २४ - आम्ही सकाळी ७.३० वाजता  छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आलो.  विमानतळ  भव्य आणि दिव्य आहे. singapore airline खिडकी येथे गेट पास आणि बॅग्स चेकिंग करून आम्ही पर्सनल security चेक अप केले.  इम्मीग्रेशन येथे शिक्का पासपोर्ट वर पडला आणि शेवटी गेट नं ७१ येथे स्थानापन्न झालो. नंतर नातलगांना सर्व सुरळीत पार पडले फोन करून कळवले. १२ वाजता सिंगापुर विमानाने उड्डाण केले.  सर्व प्रथम ओलसर रुमाल फ्रेश होण्यासाठी दिला. नंतर भोजनापूर्वीचे पेय (soft आणि hard ज्युस), भोजन मिळाले. वेळ जाण्यासाठी आपल्या सीट समोर TV होता. यात बातम्या, movie  संगीत, सिरिअल्स वगैरे आपण  इअरफोन लावून ऐकू /पाहू शकता.  आपले विमान कसे आणि कोणत्या दिशेने चाललेले आहे, आजूबाजू ठिकाणे ,किती उंचीवर, किती km बाकी , वाऱ्याचा वेग याचेपण पाहता येते.  आम्ही सिंगापूर रात्री ८ वाजता चांगी विमानतळावर सुखरूप पोचलो. आम्ही सिंगापूर चांगी विमानतळावर उतरल्यावर पुढचे टोकियो विमान स्टॉप शोधत, विचारत चालू लागलो. विमान T3 येथून सुटणार होते. येथे skytrain ने T3 - छोटी ट्रेन स...

पाचवे स्नेह संमेलन - Dark Forest रिसॉर्ट, आंबोली

Image
  आमच्या वर्गमित्रमैत्रिण यांचे पाचवे स्नेह संमेलन १६,१७ ऑगस्ट रोजी Dark Forest रिसॉर्ट, आंबोली येथे पार पडले. आंबोली येथील आंबोली धबधबा येथे सर्वानी धबधब्यात भिजण्याचा आनंद लुटला.  त्यादिवशी वरमहालक्ष्मी दिनी हळदीकुंकू कार्यक्रम पारंपरिक रिवाजाप्रमाणे पार पडला.  कोरावके वर काही गायकांनी हिंदी मराठी गाणी आणि स्तोत्रे म्हटली.  संगीतावर सर्वानी नाच केला.  संगीताचा कार्यक्रम जोरात झाला.  १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता जंगल सफारी साठी प्रयाण केले. वन विभागांनी ही सहल आयोजित केली आहे. यात १) नांगर तास धबधबा २) कावळेसाद धबधबा ३) हिरेणकेशी मंदिर ४) महादेवगड ५) वनउद्यान असे ५ पॉईंट्स दाखवले जातात.  हे सर्व ठिकाणे निसर्गरम्य परिसरात आणि सुंदर आहेत. सर्वात हिरेणकेशी मंदिर हा रमणीय आणि शांत परिसर मनास आत्मिक समाधान देऊन गेला.  येथे हिरेणकेशी नदीचा उगम आहे. जंगल सफारी वाहनातील मंडळींचा आवाज आणि दंगा यामुळे वनामध्ये एकही जंगली प्राण्याचे दर्शन झाले नाही.असो.  दुपारी दोन वाजता जोरात पाऊस पडला.  पाऊसामुळे वेंगुर्ला समुद्र किनारी जावे की कसे असे वि...

मी काय वाचले -23

Image
  सुलोचनेच्या पाऊलखुणा - ले. ना.धो. महानोर  सुलोचना या ना. धो. महानोर यांची पत्नी.  ६७ वर्षाच्या सहवास - संसारातील आपली पत्नीच्या आठवणी या पुस्तकात व्यक्त केल्या आहेत.  खेडेगावात जन्म आणि खेडेगावातील शेतीत आपले जीवन व्यतीत करून कवितांची आवड जोपासत लेखकास उत्तम साथ दिली.  मायेने सर्व साहित्य आणि राजकारणी मंडळी याना आपलेसे करून खेडेगावात चुलीवरचा स्वयंपाक करून आदरतिथ्य केले.  कष्टाने आपल्या मुलांना शिक्षण दिले आणि त्यांची लग्ने, संसारास मदत केली. या पुस्तकात लेखकाची गाजलेली गाणी प्रकाशित आहेत.  पुस्तक वाचनीय आहे.