पुणे टोकियो प्रवास
टोकियोला प्रवासासाठी आम्ही १९.०९.२०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता मुंबईकडे प्रस्थान केले. गाडीत नाश्ता करीत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे १२.३० वाजता पोचलो. आमचे दुपारचे एअर इंडियाचे दिल्ली विमानासाठी लग्गेज विभाग, तिकीट चेक, बोर्डिंग पास एअर इंडियाच्या कक्षात झाले. सेक्युरिटी चेक झाल्यावर दिल्ली कडे जाण्याऱ्या - ४०ब गेट येथून प्रयाण करण्याऱ्या विमानात बसलो. विमानात केक,रगडा पॅटिस, चहा कॉफी पदार्थ दिले. आमचे विमान दिल्लीला नियोजित वेळेच्या १५ मिनटे आधीच पोचले. जपान टोकियो शहरात दोन विमानतळ - हानेडा आणि नारीटा आहेत, आमचे विमान हानेडा येथे जाणार होते. नंतर आंतरराष्ट्रीय ट्रान्सफर येथे परत सेक्युरिटी चेक आणि इम्मीग्रेशन फॉर्मॅलिटीएस पूर्ण करत आम्ही ६ वाजता गेट क्र ६ येथे आलो. हानेडा टोकियो चे विमान नंतर ४अ गेट येथून सुटणार त्यामुळे आम्ही तिथे गेलो आणि ७.३० वाजता एअर इंडिया आंतरराष्ट्रीय विमानात बसलो. अधेमधे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वर्षांनी बनवलेले पोळी पराठा, दही भात, कोबी भाजी आणि मटकी यांचा आस्वाद पण घेतला.
आमचे विमान हानेडा येथे जाणार होते. रात्री ८ वाजता हानेडा टोकियो जाणारे विमान सुटले. विमान मोठे जवळजवळ २७६ प्रवासी, इकॉनॉमी क्लासमध्ये ९ प्रवासी एक ओळीत बसलेले. अधूनमधून जा ये करण्यासाठी जागा. विमानात प्रवास करताना प्रथम काही सूचना आणि माहिती प्रात्यिक्षिके - अर्थात याकडे किती प्रवासी लक्ष देतात देव जाणे (सगळ्यांचे लक्ष हवाईसुंदरी कडे🤪). काही वेळाने पेयपान - यामध्ये मद्य, स्प्राईट, फळांचा रस...थोड्यावेळाने जेवणात भात, मसूर उसळ, बटाटा डाळ, केक, ब्रेड, काकडी सलाड असे पदार्थ... कॉफी आणि चाय पान.. करमणुकीसाठी समोर छोटा टीव्ही... झोपेसाठी पांघरायला शाल होती...आता मी डोळे मिटून विचार करू लागलो... प्रत्येकाला आपल्या संसारात विमानात सेवा देणारी हवाईसुंदरी लाभली तर मजाच मजा नाही का ....? वेळच्यावेळी चविष्ट खानपान सेवा देणारी हसतखेळत सुंदर (?) जीवनसाथी लाभली तर....माझा डोळा लागून मला बहुतेक स्वप्न 🤪 पडले असावे...कधीकधी चांगली सुंदर स्वप्नेपण पडतात बरं का...
भारतीय वेळेनुसार रात्री दोन वाजता आणि जपान वेळ सकाळी ५.३० वाजता नाश्ता हजर - ब्रेड, केक,योगर्ट - चहा कॉफी,, खिडकीतून पाहिले तेव्हा उजाडले होते. वेळेनुसार जपान आपल्यापेक्षा ३.३० तास पुढे आहे. विमान आता टोकियो कडे आगेकूच करीत होते. प्रवास दरम्यान बसल्यावर थोडे हादडे बसत होते. आपले सीट गदगदा हलत होते. वेळोवेळी साऱ्या प्रवास्यांना याबाबत सूचना दिल्या जात होत्या. वॉशरूमचा वापर न करणेबाबत, सीट बेल्ट बांधणे, जागेवरून न उठणे.. खबरदारी बाळगणे.. या परिस्थितीला टर्बुलन्स (turbulance ) म्हणतात. संसारात पतीपेक्षा पत्नीच्या जीवनात बरीच टर्बुलन्स (turbulance ) येतात नाही का...अनेक अडीअडचणी, मानपमान, तडजोड, सासर-माहेर संबंध... या सगळ्या बिकट परिस्थितीत पत्नी आपला समतोल राखत संसाराचे विमान उत्तम हाकत असते..नाही का ..? हा विचार केल्यावर माझे खरे डोळे उघडले...स्त्री शक्तीला मानाचा मुजरा..🙏
उगवत्या सूर्याच्या देशात प्रवेश केला...नियोजित वेळेपूर्वी १५ मिनटे आमचे विमान हानेडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर २०.०९.२०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता पाऊल ठेवले. इमिग्रेशन, लग्गेज घेऊन आम्ही ८.३० वाजता बाहेर आलो. समोर आमचा लेक चातकासारखी वाट पाहत होता. आम्हा दोघांना बघून आनंद झाला. मुंबई, दिल्ली आणि हानेडा विमानतळ भव्य आणि दिव्य आहेतच. देवाच्या कृपेने, एअर इंडियाच्या पायलट उत्तम सेवा आणि एअर इंडियाच्या इतर साऱ्या कर्मचारी उत्तम सेवा यामुळे आमचा पुणे टोकियो प्रवास सुखकर आणि आनंदमयी झाला. इति प्रवास वर्णन समाप्तः
Comments
Post a Comment