Posts

Showing posts from June, 2023

"महाश्वेता " - डॉ. सुमती क्षेत्रमाडे

Image
  या लेखिकेचे तिसरे पुस्तक.  ही एक कादंबरी.  सुधा नावाच्या सुंदर स्त्रीची कहाणी.  लग्नानंतर दोन वर्षानंतर कोड याचे निदान होते. आणि सुखाचा चाललेला संसार उध्वस्त होतो. सासर मंडळी सुधास कोड बरा झाल्यावरच सासरी यायचे असे सांगून तिला माहेरी  कायमची पाठवतात.  सुधाचा नंतरचा प्रवास लेखिकेने उत्तम व्यक्त केला आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखिका सौन्दर्य बाबत आपले मत मांडतात. त्या लिहितात - "सौन्दर्य म्हणजे सदभावना, स्नेहादर्त, सहानभूती, समवेदना समदृष्टी..छे इंद्रधनुष्याचे रंग मोजता येतात. पण संध्यारंगछटा मोजता येतात का? सौन्दर्याचे तसेच आहे. सौन्दर्याची थोडक्यात व्याख्या - आपल्यात दुसऱ्याला सामावून घेण्याची आंतरिक शक्ती. जीवन जगण्यासाठी आणि जगवण्यासाठीही आहे." हे मला खूप भावले. पुस्तक वाचनीय आहे.  या कादंबरीवर दूरदर्शन वर मालिका प्रसिद्ध झाली होती.

नरेंद्र (स्वामी विवेकानंद) ते नरेंद्र(मोदी) व्हाया अरविंद

Image
  २४ जून २०२३ - कर्नल्स क्यूब संस्थेने - नरेंद्र (स्वामी विवेकानंद) ते नरेंद्र(मोदी) व्हाया अरविंद - या विषयावर माधवी रघुवीर यांचे भाषण आयोजित केले होते.  कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली.  स्वामी विवेकानंद यांचा काळ आणि आताचे नरेंद्र मोदी नेतृत्व चा भारत यांचा आढावा घेतला.  दोन्ही नरेंद्र यांच्यात  किती साम्य आहे हे दाखवून दिले. ब्रह्मर्षी - स्वामीजी हे ज्ञानयोद्धा (संन्यासी) राजश्री मोदी - कर्मयोद्धा आणि या दोघांमध्ये योगी अरविंद - हे मूल्ययोद्धा..स्वामीजी हे दरिद्री नारायण सेवा हा संकल्प आणि श्री मोदी हे प्रधानसेवक - जनता जनार्दन सेवा.. हे दोन्ही नेते - समाजाला बरोबर घेऊन जाणारे आहेत.  राष्ट्राची औद्योगिक, संरक्षण, वैचारिक आणि आर्थिक या क्षेत्रात प्रगती झाली पाहिजे.   पृथ्वीवरील भारत हा सर्वात श्रेष्ठ राष्ट आहे. घराचा दिवाणखाना म्हणजे अमेरिका, चीन म्हणजे स्वयंपाकघर, युरोप - शयनघर, जपान - बगीचा तर भारत म्हणजे देवघर.. संपूर्ण घरावर देवघराची सत्ता चालते.  योगी अरविंद यांच्याबाबत लहानपणीपासून क्रांतिकारक ते योगी प्रवासाबाबत थोड्यक्यात अध्...

मी काय वाचले -7

Image
  "आषाढ मेघ "  - डॉ. सुमती क्षेत्रमाडे "युगंधरा"  कादंबरी नंतर - "आषाढ मेघ" हा कथासंग्रह वाचला.  यात आषाढ मेघ, रेवती, शोध, अभिसार, सेतू, सादर भेट, अभिमान, कन्यादान, सहा महिने तेरा दिवस  अश्या ९ कौटुंबिक कथा - सर्व कथा वाचनीय.  या कथापैकी मला "अभिमान" ही कथा मनास भावली.  विवाह इच्छुक मुलामुलींनी आणि विशेषतः भावी सासूबाई यांनी सवड काढून ही कथा जरूर वाचावी.  आज आषाढस्य प्रथम दिवसे - आषाढ मेघ हा कथासंग्रह वाचला.  काय योगायोग.. पण आकाशात मेघ नाहीत.. देवा आता लवकर पाऊस दे ..हीच मनापासून प्रार्थना...

सौ.डॉ.गायत्री वाढदिवस..

Image
  18.06.2023 आज तुझा वाढदिवस.. वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐तुला उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना.. तू डॉक्टर ..तुझे आरोग्य म्हणजे आम्हाला पण छान आरोग्य .. साहजिक नाही का..तुझ्या अंगी वसलेल्या - वैद्यकीय ज्ञान, स्वयंपाक, रांगोळी, वाचन, लेखन, साहित्य, सेवाभाव, प्रवास, निसर्गाचे दर्शन इतरांना घडवणे, , समाधानीवृत्ती .. या आणि इतर .. गुणात नेहमी वाढ हो..तुझा वैद्यकीय व्यवसाय सांभाळून तू उत्तम संसार चालवत आहेस याचा अभिमान आणि कौतुक आम्हाला आहे. एका वेळी दोन्ही बाबी सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरतच नाही का... तुला सुखसमाधान, शांती आणि आरोग्य लाभो हीच श्री शाकंबरी देवीस प्रार्थना 🙏आणि तुला भरपूर शक्ती मिळो हीच गायत्रीदेवी चरणी मनापासून प्रार्थना..🙏.आमच्या बागेतील मोगऱ्याची फुलांची छोटीशी भेट तुला पाठवत आहे. या फुलांचा सुगंध तुझ्या जीवनात नेहमी दरवळत राहो .. हीच सदिच्छा.. बाकी एरव्ही झाडाला एक दोन फुले येतात पण आज भरपूर फुले आली .. बहुतेक वाढदिवसानिमीत्य भेट देण्यासाठी असावीत काय योगायोग .. खरंच देव आपल्याला भरभरून देत असतो नाही का ...असो शुभम भवतु.. जीवेत शरद: शतं...

सौ.छायूच्या ६१ष्टी सोहळ्या

  सौ.छायूच्या ६१ष्टी सोहळ्याच्या निमित्याने आपण आलात आणि आनंदाने सहभागी झालात धन्यवाद .. या निमित्याने छायुबाबत काय काय बोलू असे झाले.  तिने पदवीपूर्वी RMS  पोस्ट ऑफिसमध्ये स्वबळावर नोकरी मिळवली.  शिफ्ट ड्युटी नोकरी आणि रत्नागिरी, गोवा येथे बदली, बरोडा, पुणे येथे प्रशिक्षण..हे सांभाळून कष्ट आणि प्रामाणिकपणा यागुणावर पदोन्नती मिळवून सॉर्टींग स्पर्धेत भाग घेऊन बक्षीस मिळवले   नोकरी करून आपल्या मुलीची शिक्षणे आणि नोकरी लग्ने उत्तमप्रकारे पार पाडली.  आपल्या संसारात तिला तिच्या यजमानांची मोलाची साथसंगत लाभली. असे म्हणतात Behind every successful man  there is a woman .. येथेमात्र उलटे आहे behind successful woman , there is man and that  is सुधीरराव ..तिच्या आयुष्यात युरोप सहल, नुकताच काशी यात्रा घडून आली. वेळेवर नोकरी, लग्न, पाल्याची शिक्षणे, लग्न.. प्रवास... या गोष्टी घडावयास देवाची कृपा लागते...पूर्वजन्मीची पुण्याई आणि थोरामोठ्याचे आशीर्वाद.. अर्थात या सुंदर सोहळ्यास आई दादा आणि इतर स्वर्गवासी नातलग आकाशातून हार्दिक शुभेच्छा देत असतील यात शंका ना...

मी काय वाचले -6

                                                        "युगंधरा" - डॉ. सुमती क्षेत्रमाडे ही एक कौटुंबिक कादंबरी - सामान्य कुटुंबातील मुलीच्या करियर,नोकरी, घर याबाबत आहे. कादंबरी ४८० पानांची आहे. पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पुढे काय पुढे काय याबाबत बरीच उत्कंठा निर्माण करून हातातून सोडवत नाही.  लेखिकेने उत्तम लिखाण करून सामान्य कुटुंबातील घरगुती अडीअडचणी, प्रश्न, होणारी घुसमट, मनातील इच्छा .. खूप सुंदर व्यक्त केले आहे. कादंबरी "युगा" या मुलीवर केंद्रित केली गेली आहे.  "युगा" ही प्रेमळ, मनमिळाऊ, निस्वार्थी, परोपकारी, कुटुंबाचा/दुसऱ्याचा विचार प्रथम, घरकाम सांभाळून नोकरी करणारी .. अशी हुशार व्यक्ती...कादंबरी वाचल्यावर प्रत्येकाला युगा सारखी मैत्रीण, प्रेयसी, बायको, मुलगी, नातं.. हवी असे वाटते.. माणूस किती स्वार्थी नाही का ..कादंबरी संग्रही ठेवण्याजोगी आहे. लेखिकेचे नावाबाबत बरेच आधी ऐकले होते. पण पुस्तक वाचले नव्हते.  मध्यंतरी ऑफिसमधील ...

"कोलाज : समृद्ध विचारांचा

Image
  ४ जून २०२३ - सौ. मीना आंबेकर यांच्या "कोलाज : समृद्ध विचारांचा ह्या पाचव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा डॉ सौ आरती ताई दातार यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदना - योगेश तांबे यांनी सूर निरागस हो या गीतांनी केली.  लेखिका सौ. मीना आंबेकर यांच्या जीवनाच्या वाटचालीबाबत   छोटीशी चित्रफीत दाखवली गेली.  पुस्तकाच्या निर्मितीबाबत थोडक्यात आपले मनोगत लेखिका सौ. मीना आंबेकर यांनी व्यक्त केले. पुस्तकाच्या जडणघडणीत ज्यांचा हातभार लागला त्या सर्वांचे आभार मानले.  पुस्तकातील "परत मिळेल का ?" या लेखाचे अभिवाचन दीप्ती आंबेकर यांनी केले.  आंबेकर कुटुंबीयांचा समवेत पुस्तक प्रकाशन संत साहित्याच्या व्याख्यात्या - डॉ. सौ. आरती ताई दातार यांच्या हस्ते झाले. आपल्या भाषणात सौ. आरती ताई यांनी लेखिका - मैत्री, शिक्षक, शिक्षण, निवृत्ती -प्रवृत्ती, प्रेयस - श्रेयस याबाबत आपले विचार मांडले.  पुस्तकाचे देखणे मुखपृष्ठ ते मलपृष्ठ, अर्पणपत्रिका आणि पुस्तकातील ४० लेखांचे भरभरून कौतुक केले.  पुस्तकाच्या इंद्रधनुष्य बाबत सविस्तर कल्पना सौ आरती ताई यांनी स...