संयुक्ता “ कार्यक्रम - “ अरुणिमा “ प्रस्तुत कार्यक्रम
“ अरुणिमा “ प्रस्तुत कार्यक्रम ( कथा , कविता , नाट्यवाचन , गप्पा आणि गाण्यांनी युक्त …“ संयुक्ता “ कार्यक्रम श्रीराम लागू रंग अवकाश हिराबाग पुणे येथे १० मार्च २०२५ रोजी आयोजित केला होता.
गांधारी आणि द्रौपदी संवाद, संत सोयरबाई,संत कान्होपात्रा.. झाशीची राणी... अहिल्या... जिजामाता..सीड मदर - राहीबाई पोरे, बहिणाबाई चौधरी.यांच्यासारख्या महान कर्तृत्वान महिला यांची माहिती आणि कार्य ..सावरकर कुटुंबियातील ३ महान महिला - येसूबाई, माई आणि लक्ष्मी यांचा स्वर्गातील संवाद, आदर्श पतिपत्नी - आनंदी गोपाळ, साधना आमटे, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे..यांचा उल्लेख, साधना आमटे यांच्याशी गप्पा, कंबोडिया येथील जंगलातील खेडेगावात जन्मलेल्या - सोमाली माम यांच्या जीवनाबाबत संघर्ष कथावाचन झाले.सरस्वती, लक्ष्मी आणि गौरी - यांचा त्रिवेणी संगम एकवटलेल्या - सौ. सुधा मूर्थी - यांचा कार्य आणि जीवनाबाबत माहिती
ऍसिड अटॅक मधून वाचलेली आणि जिद्दी आणि इतर मुलींना जगण्याची प्रेरणा देणारी लक्ष्मी आगरवाल, अरुणिमा सिन्हा एवरेस्ट सर करणारी -कहाणी कथन केली. १९७१ सालच्या युद्धातील - सहमत - सिक्का या तरुणीची त्याग आणि राष्ट्रासाठी बलिदान याबाबत कथा मनास भावून गेली. स्त्रीच्या मातृत्वाबाबत आणि लेफ्टनंट जनरल डॉ माधुरी कानेटकर आणि राजीव कानेटकर यांचे सहजीवन आणि कुटुंबासाठी त्याग...आणि समाजसेवा कार्याबाबत कौतुक
कार्यक्रमाची सांगता सौ. अरुण अनगळ यांनी लिहिलेली महिलादिनानिमित्य - "सन्मान" या कवितावाचनाने झाली.कार्यक्रमात - नको देवराया अंत ..,बाळ निज रे निज शिवराया, खोप्यामधी खोपा, जयोस्तुते श्रीमहान्मंगले, उंच माझा झोका, फिरुनी नवी जन्मेन मी..मुडके ना देखो दिबरो, है वतन वतन मेरे वतन.. ही गाणी - शेफाली साकूरीकर आणि अनुराधा मराठे यांनी सुरेल आवाजात गायली.
कथा, नाट्यवाचन आणि संवाद - मीनल परांजपे, अनुराधा मराठे आणि अरुण अनगळ यांनी सयुक्तिकपणे उत्तम सादर केले. या कार्यक्रमाची संहिता आणि संकल्पना अरुणा अनगळ यांची होती. कार्यक्रमावेळी सभागृहामध्ये साऱ्या रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. स्त्रियांच्या कर्तृत्वाचा प्रवास बाबत कार्यक्रम असल्यामुळे स्त्रियांची संख्या भरपूर होती. तरीपण उपस्थित पुरुषमंडळींचे विशेष आभार अरुणा अनगळ यांनी मानले. या अत्यंत श्रवणीय आणि सुंदर आगळा वेगळा कार्यक्रमाबाबत सर्वेसर्वा सौ.अरुणा अनगळ यांना धन्यवाद आणि आभार..
Comments
Post a Comment