Posts

Showing posts from January, 2023

पुस्तक वाचन 3

Image
  रूग्णानुबंध - ले. डॉ. दिलीप शिंदे. साधना प्रकाशन. लेखक हे डॉक्टर.या पुस्तकात लेखकांनी फॅमिली डॉक्टर या नात्याने वैद्यकीय व्यवसायात आलेले कटू गोड अनुभव उत्तम प्रकारे व्यक्त केले आहेत.  सुरुवात मी डॉक्टर का  झालो आहे? याने होते. यातील सर्व लेख वाचनीय आहेत. यातील परमसखा मृत्यू? हा लेख मनास भावून गेला. आपल्या सामान्य माणसाच्या आयुष्यात उद्भवणारे शारीरिक आणि मानसिक आजार - याबाबत डॉक्टर आणि पेशंट यांचा दृष्टिकोन..याचे अनुभव सुंदर शब्दात व्यक्त केले आहेत. डॉक्टर असून लेखनाची शैली छान. ज्यांना वैद्यकीय व्यवसायात काम करायचे आहे आणि जे हा व्यवसाय करत आहेत त्यांनी हे पुस्तक वाचायला हवे. इतर वाचकांनी पण जरुर वाचावे. पुस्तक मला मनापासून आवडले. संग्रही ठेवावे असे.

पुस्तक वाचन 2

Image
  व्हॉट्स अँप सेंच्युरी - ले. डॉ. श्रीकांत जोशी आणि श्री पांडुरंग गोडसे. व्हॉट्स ॲप वर आलेल्या रंजक, प्रेरक आणि बोधपर अश्या 100 संस्कार बोधकथा यांचा निवडक संग्रह आहे.  काही संदेश आणि सुविचार पण या पुस्तकात वाचायला मिळते. जे कोणी व्हॉट्स ॲप जास्त वापरत नाही त्यांनी हे पुस्तक वाचायला हरकत नाही..

Tribute to Prof.N M Kulkarni

Image
  Felt sad and bad about demise of Prof. N M Kulkarni. He was excellent professor who taught accountancy subject.  I still remember topics such as types of accounts,trial balance, profit and loss and balance sheet and others etc. He always advised us to refer S.R.Bataliboi book on accountancy and try to solve the problems from that book... I also very much recollect his formula for Bank Reconciliation statement (such as less to more = add. More to less= less) still after 40 years.. All these principles and whatever taught has helped me lot as a Commerce Student in my work field.   Really we missed nice professor...May the soul of the departed be rest in peace🌹🌹. Om Shanti..🙏🙏

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

Image
  14 जानेवारी 2023 - महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा बघायला संध्याकाळी साडेपाच वाजता गेलो होतो. उपांत्य फेरी आणि अंतिम सामना पहिला. आत स्टेडियम खचाखच भरले होते. मैदान आणि आजूबाजू, प्रकाश योजना, प्रवेशद्वार..बाहेर projector screen,.. माईक.. स्कोअर बोर्ड.. generator,भव्य आणि दिव्य होती. जवळजवळ लाख पेक्षा अधिक प्रेक्षक होते. काही मनोरंजनपर कार्यक्रम आयोजीत केले होते. लेडीज स्टॅण्ड पण हाऊसफुल्ल होते. कुस्ती स्पर्धा बघायला खूप छान प्रतिसाद मिळाला, येथील माहोल..बघून आनंद झाला (नाहीतर नुसते क्रिकेट). या स्पर्धा सुंदर आयोजीत करण्यात आल्या आणि बाकी इतर उत्तम व्यवस्था याबाबत श्री मुरलीधर मोहोळ (माजी महापौर PMC) यांचे कौतुक आणि त्यांचे मनापासून आभार 🙏🙏 पवनपुत्र हनुमान की जय 🙏🙏

"अविष्कार" - एक संगीत नजराणा

  १३ जानेवारी २०२३ - रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास आणि कॉर्ड्स ऑफ क्रिएशन प्रस्तुत "अविष्कार" - एक संगीत नजराणा -हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम श्री यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड पुणे येथे आयोजित केला होता.  डॉ राधा मंगेशकर, अमित देशमुख, प्रशांत नासेरी, कृष्णा चिटणीस पंडित या गायकांनी जुन्या आणि नव्या हिंदी सिनेमातील गीते सुरेल आवाजात गायली.  गायकांना वाद्यवृंद मंडळींची उत्तम साथ लाभली.  सर्व गाण्यावर रसिकांनी उत्तम दाद दिली. काही गाण्यावर रसिकांनी नाच केला. कृष्णा चिटणीस पंडित या तरुण गायिकेने नवी आणि जुनी गाणी गाताना स्टेजवर नाचाचे हावभाव करून साऱ्या रसिकांची मने जिंकली.  प्रशांत नासेरी यांनी - एक चतुर नार... हे गाणे साजेशा वेष धारण करून स्टेजवर उत्तम (अगदी मूळ गाण्याप्रमाणे )साजरे करून  साऱ्यांची वाहवा मिळवली.श्री अमित काकडे यांनी उत्तम सूत्रसंचालन करून रसिकांचा उत्साह वाढवला.  कार्यक्रमात रोटरी पुणे सहवास या संस्थेचा कामगिरी आढावा, पदाधिकारांचे आणि इतर व्यक्तीचे सत्कार, आपल्याला सोडून गेलेल्याला  चित्रपट सृष्टीतील, राजकारणी आणि इतर क्षेत्राती...

पुस्तक वाचन - 1

Image
  "बुद्धासोबत क्षणोक्षणी"  ले. आनंद नाडकर्णी  गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानावर आधारित कविताचा निरूपणासह संग्रह. यात १०० कविता आहेत. अध्यात्मिक विषयावर निवडल्या गेल्या आहेत डॉ आनंद नाडकर्णी यांनी उत्तम निरूपण केले आहे. पुस्तक वाचनीय आहे. नव्या वर्षाची वाचनाची सुरुवात छान झाली आणि पुस्तकाने आनंद दिला 

३ जाने २०२३ - लेक चालली सासरला ..

Image
  श्रेयस आज पुणे - लखनौ आगगाडीने कानपूरचा परतीचा प्रवास - यासाठी पुणे स्टेशनवर  आलो होतो.  गाडीच्या बी-५ या बोगीजवळ आई-बाबा आणि मुले यांची गर्दी होती. बहुतेक ही मुले IIT कानपुर ची असावीत.  मुलांचे प्रमाण जास्त एखादी दुसरीच मुलगी (का ...? ) दिसली.गाडी सुटायच्या ५ मिनिटे आधी सर्व आयांचे डोळे पाणावले. आपल्या संस्कृतीतील "माउली " ही खरच महान व्यक्ती असते.  सर्वानी टाटा करून जड अंतःकरणाने निरोप घेतला आणि गाडीने सकाळी १०.४५ वाजता स्टेशन सोडले. ९ महिन्यानंतर माहेरी आलेल्या लेकाची खाणे-पिणे, अन्न पदार्थ यांची बडदास्त सौ वर्षांनी उत्तम सांभाळली. मंदिरास भेट,  टेकडी फिरणे, इतर वस्तू खरेदी, इतर नातेवाईक यांच्या भेटी, गप्पा गोष्टी, या सगळीकडे सौ. वर्षाने श्रेयसला छान साथ दिली. प्रवासात खाणे पिणे यांचे डब्बे आणि इतर सूचना... पुण्यात आगमन ते परतीच्या प्रवासाची गाडी सुटेपर्यंत वर्षाने खूप काही केले.. याचे कौतुक करावे तेवढे कमीच.. "माउली" याचा अर्थ समाजाला.  वर्षांनी आपल्या लेकासाठी केलेले कष्ट आणि त्याग याची किंमत करता येत नाही.  अर्थात सगळ्याच "माउली" हे करतातच...