"कुटुंब" आणि "चहा" दिन साजरा
आज प्रवीणच्या घरी(बंगल्यावर) कोथरुडवासीय कुटुंबाचे स्नेह-भोजन कार्यक्रम आयोजित केला होता. बऱ्याच दिवसानी आम्ही एकत्र भेटलो, गप्पा झाल्या. भोजनात - भाकरी, पोळी , भरली वांगी, पिठले, चवळी उसळ, कोशिंबीर, पापड, मिरची सांडगे, लिंबाचे/आंब्याचे लोणचे, मिरची ठेचा, शिरा, मसाले भात, दही भात, दही ताक, आंबील,.. ताटभरुन पदार्थ होते. भोजनानंतर Ice-क्रीम आणि मसाला पान जोडीला होतेच. भोजनातील सर्व अन्नपदार्थ रुचकर आणि चविष्ट होते. प्रेमाने आणि आग्रहाने वाढल्यामुळे सर्वानी भरपेट पोटपूजा केली. जेवण झाल्यावर सौ. मनीषा वाहिनी, सौ. वर्षा, सपना आणि पियुष यांनी गाणी म्हटली, खूप मजा आणि आनंद झाला. आम्ही जवळजवळ १८ जण जमलो होतो. प्रत्येक कुटुंबांनी वेगवेगळे पदार्थ बनवून आणले होते. संध्याकाळी चहा घेऊन पाच वाजता परत भेटू असे ठरवून एकमेकांचा निरोप घेतला. जाताना जेवताना ताटात जागा नसल्यामुळे सर्वाना पुरण पोळी पार्सल दिले गेले. या कार्यक्रमाचे आयोजन बाबत आपल्या उत्साही (वयाची सत्तरी पार केलेल्या) ती. सौ. सुषमा काकूंनी पुढाकार घेतला आणि सौ मनीषावहिनी यांचे नियोजन. आ...