सेवाव्रती गायत्री
माझ्या सासू आणि सासरेबुवा यांच्या भेटीसाठी बेंगलोर येथे गेल्या आठवड्यात 8 दिवसाचा दौरा करुन आलो. सासुरवाडीस जाऊन जवळजवळ 3 वर्षे झाली होती. वयोमानानुसार खाणे कमी झाल्यामुळे आणि इतर पथ्य पाणी यामुळे तब्येतीत चढ उतार असतो. आपल्या सासू-सासरे यांच्या तब्येतीची काळजी सौ. गायत्री उत्तम घेते. त्यांचे पथ्य पाणी, औषध, इतर किरकोळ आरोग्याच्या चाचण्या घेणे, नियमित खान-पान, हे सर्व गायत्री आनंदाने करते. आमच्या ८ दिवस मुक्कामात गायत्रीने आम्हास उत्तम स्वयंपाक पाणी करून वाढले. सर्व अन्नपदार्थ चविष्ट केले होते. गायत्री दोन चाकी आणि चार चाकी गाड्या उत्तम चालवते. तिच्यामुळे आम्हाला काही भागातील देवळास गाडीतून भेटी देता आल्या. आपल्या मुलीस नृत्याच्या क्लास साठी खूप मेहनत घेऊन पाठबळ देते. शाळेमध्ये Co-ordinator पदावर काम करून आपल्या कुटुंबियांसाठी बरीच मेहनत घेऊन घरासाठी झटत असते. तिच्या Co-ordination या कौशल्यामुळे जीवनात तिचे सर्वाशी छान co-ordination जमते .जुन्या आणि नवीन पिढीच्या विचारसरणीशी मिळतेजुळते घेऊन आनंदाने चटकन समरस होते. ..अशी सून...