Mental Health - डॉ. अनिल वर्तक

 




१२ जुलै २०२५ रोजी कर्नल्स क्यूब संस्थेने - Mental Health - या विषयावर डॉ. अनिल वर्तक यांचे व्याख्यान आयोजित केले होते. World Health  Organisation - नुसार " No health without mental health ". ५० वर्षांपूर्वी शारीरिक स्वास्थ म्हणजेच आरोग्य असे समजले जायचे. मानसिक स्वास्थ दुर्लक्षित होता. मेंदूसंबंधी अभ्यास कमी केला जात असे. सध्या  - भास होणे, भ्रमनिरास, काळजी, भीती, नैराश्य, नकारात्मता असे  मानसिक आजार वाढले आहेत. मानसिक आजारासाठी कोणतीच लॅब टेस्ट नाही. विभक्त कुटुंबपद्धती, स्पर्धा, रस्त्यावरील वाहतूक, मोबाईलचा अतिवापर, कमी संवाद यामुळे मानसिक आजारात वाढ होत आहे. भारतात १०% लोक मानसिक आजाराने त्रस्त आहेत. मानसिक आजाराबद्दल  सामाजिक दृष्टिकोनात बदल व्हावा. मानसिक रोगी आणि त्यांच्या कुटुंबियांना सकारात्मक पाठींबा आणि आधार देणे हे महत्वाचे. पुरेशी झोप, संतुलित आहार, बागेत निसर्गदर्शन करीत फिरणे, आपला छंद जोपासणे, रोजनिशी (डायरी) लिहिणे, आपल्या जीवनात आनंदी आणि समाधानी राहणे ..यासारखे काही उपाय मानसिक आजारावर करणे गरजेचे.


सुदृढ नातेसंबध, आपली दैनंदिन रुटीन सांभाळणे, सकारात्मक जीवनशैली अंगीकारणे त्यामुळे आपण आनंदी आणि समाधानी आयुष्य जगू शकतो. स्वतःची काळजी स्वतः घेणे, आपले विचार, वर्तन आणि मूड संतुलित राखणे  महत्वाचे. डॉक्टरांनी एकलव्य फौंडेशन फॉर मेंटल हेल्थ या संस्थेची माहिती देत कर्नल्स क्यूब संस्थेच्या कामाबाबत कौतुक केले. श्रोत्यांच्या शंकांचे निरसन करून कार्यक्रमाची सांगता झाली.  शेवटी सौ.वर्तक यांनी महिलांना आरोग्य भरपूर असते साठीनंतर महिलांनी एकमेकांशी संवाद साधून सुख दुःखे यांची देवाणघेवाण करीत एकमेकांना आधार द्यावा जेणेकरून आपले मानसिक आरोग्य उत्तम राहते अशी महत्वाची टिप्पणी साऱ्या श्रोत्यांना सांगितली.  चला तर हेवेदावे, मत्सर, अहंकार, राग बाजूला सारून भेटून गप्पा मारू या...चंद्रशेखर मधुकर कुलकर्णी

Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा