२४.०३.२०२५ - अकरा मारुती ट्रिप

 


२४.०३.२०२५ - अकरा मारुती ट्रिप 



अकरा मारुती ट्रिप  सातारा येथून सकाळी ७ वाजता आम्ही अकरा मारुती ट्रीपसाठी प्रस्थान केले. श्री रामदास स्वामी यांनी स्थापन केलेले अकरा मारुती क्रमाने दर्शन घेतले ते असे - १)उंब्रज - प्रताप मारुती २) माजगाव - मारुती ३) चाफळ - श्री राम मंदिर आणि - दासमारुती, ४) चाफळ - वीरमारुती  ५) शिंगणवाडी - खडीचा मारुती  6) मसूर - सुंदर मारुती 7) बहे बोरगाव - मारुती 8) बत्तीसशिराळा - श्री वीर मारुती  9) पारगाव  मारुती १० ) शहापूर - वीर मारुती  11) मानपाडळे- विशाल मारुती. प्रत्येक मारुतीबाबत विस्तृत माहिती देणे टाळले आहे. चाफळ येथील श्री राम मंदिर भव्य आणि सुंदर बांधले आहे. बहे बोरगावला जाताना कोळे- नरसिहपूर येथील उग्र नृसिह मंदिर खाली गुफेत आहे.  बहे बोरगाव याठिकाणी बेटामधील श्री शिवलिंग मंदिर आणि मारुतीचे मंदिर छान आहे. बहे बोरगाव - येथे कृष्णा नदी जोरात खळखळ करीत वाहते. श्री राम लक्ष्मण आणि सीता यांचे याठिकाणी वास्तव होते. येथील बेटावर श्रीरामांनी ईश्वराची पूजा करीत असताना कृष्णा नदी जोरात वाहत येते. त्यावेळी मारुती रायांनी आपली दोन्ही हातानी नदीस अडवले. याठिकाणी दोन वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले आहे. बहे बोरगाव हे ठिकाण अत्यंत रमणीय आणि नदीतून बेटावर जावे लागते. आता रस्ता केला आहे.  मसूर येथील मारुतीची मूर्ती सुंदर देखणी आहे.  पारगाव येथील मूर्ती सर्वात लहान आहे.  काही मारुती मंदिरापाशी गाडी जात नाही काही अंतरावरून चालत जावे लागते. काही ठिकाणी चहापाणी सोय नाही. मसूर येथे कांदा भजी आणि शिराळाकडे जाताना शेतकरी हॉटेल मध्ये भाकरी पिठले, दही धपाटे यांचा आस्वाद घेतला. सारे भोजनादी पदार्थ चविष्ट 👌होते. माझ्या सातारा वास्तव भावाने गाडी ठरवणे, गुगलवरून कोणते ठिकाण प्रथम आणि क्रमवारी, अकरा मारुतीचे पुस्तक शोधून ठेवले, त्याने उत्तम 👌नियोजन केले होते. प्रत्येक मारुती दर्शनपूर्वी त्या ठिकाणाबाबत माहिती पुस्तकातून वाचायची संधी मला लाभली. आमची एक दिवसाची अकरा  मारुती ट्रिप खूप छान झाली मनास समाधान आणि आनंद झाला. बरेच वर्षांपासून अकरा मारुती दर्शन करायचे असे मनास होते. तो योग आला. प्रत्येकानी एकदा तरी अकरा मारुती दर्शन जरूर घ्यावे जय हनुमान ..🙏 श्री राम जय राम जय जय राम.. 🙏जय जय रघुवीर समर्थ...🙏🙏



Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा