'कुसुमाग्रज' यांच्या काव्यगीतांचा नजराणा कार्यक्रम
२५ फेब्रुवारी २०२४ रोजी जागतिक मराठी दिनाचे औचित्य साधून 'अनाहत' यांनी कवी - श्रेष्ठ 'कुसुमाग्रज' यांच्या काव्यगीतांचा नजराणा कार्यक्रम सिल्व्हर क्रेस्ट सोसायटी येथे सादर केला. कार्यक्रमाची सुरवात - हे सुरांनो चंद्र व्हा या गीताने झाली. उठा उठा चिऊताई,काढ सखे तुझे गळ्यातील हात, युगामागून चालली,वेड्यात मराठे वीर दौडले सात, आगगाडी आणि जमीन,अही आणि नकुल,सरणार कधी रण प्रभू,मी कोण, कणा,गर्जा जयजयकार,गाभारा, मी एक रात्री त्या नक्षत्राला, अश्या वेगवेगळ्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाची सांगता भैरवी रागात - सर्वात्मका सर्वेश्वरा या गीताने झाली. या कार्यक्रमाची संकल्पना रूपरेषा, कवितांची निवड आणि त्यामागील भावना .. हे सर्व ..सौ. विनयताई गाडगीळ यांची होती. सोसायटीतील श्री घाटपांडे परिवार, आशुतोष पर्वते, केतकी दीक्षित, सार्थक साबणे, निनाद जोग यांनी सुरेल स्वरात गीते सादर केली. या कार्यक्रमास सोसायटीतील रसिक मंडळींनीं उपस्थति लावून मनापासून दाद दिली. कार्यक्रमाबाबत सिल्व्हरक्रेस्ट उत्सव आणि व्यवस्थापन समितीचे आभार मानले. मनापासून धन्यवाद... E - ३०२ सिल्व्हरक्रेस्ट