Posts

Showing posts from May, 2023

सावरकरांची अंदमानातील कविता

Image
  तू सूर्याचे तेज - स्वातंत्रवीर सावरकर  एक धगधगते  यज्ञकुंड - या कार्क्रमाअंतर्गत रविवार २८ मे २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता "सावरकरांची अंदमानातील कविता " सादरकर्त्या प्रसिद्ध व्याख्यात्या धनश्री लेले    यांचा कार्यक्रम पंडित फार्म पुणे येथे होता.  १९०१ सालची वृषोक्ती ही बैलावरची कविता, रानात वाट चुकलेले कोकरू, लक्ष्मीपूजन कविता, बंदिवासात - माझे मृत्यूपत्र, एकलकोंडी, बेडी, सायंघन्टा समुद्रमार्ग, निद्रे, १९१३ साली रवींद्रनाथ टागोर याना नोबेल पुरस्कार मिळाल्यावर गुलाब फुलावरची कविता, श्री शिवाजी महाराज यांची आरती, सागर आणि नभ कविता, बंदी कविता .. या कवितेची पार्श्वभूमी आणि अर्थ सौ. धनश्री लेले यांनी उत्तम व्याख्यान दिले. जवळजवळ २५०० सावरकरप्रेमी जीवाचे कान करून भाषण ऐकत होते. दोन तास सुंदर श्रवणीय भाषणानंतर आम्ही नि शब्द ...कार्यक्रमात ध्वनी योजना, टीव्ही प्रक्षेपण, आसन, पंखे ..यांची उत्तम सोय केली होती. कोटीभास्कर ग्रुप यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. २८ मे श्री स्वातंत्रवीर सावरकर याना मनापासून विनम्र अभिवादन आणि कृतज्ञापूर्ण साष्टांग नमस्कार....

My Heart My Responsibility

Image
  २७ मे २०२३ - कर्नल्स क्यूब यांच्यावतीने "My Heart My Responsibility " विषयावर डॉ. सुधीर भाटे यांचे भाषण झाले.  आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यायची याबाबत सांगताना Cardiac  arrest आणि Heart Attack  यातील फरक सांगितला.  Cardiac arrest झाले असताना प्राथमिक उपचार कसा करायचा याबाबत चित्रफीत दाखवली गेली. शरीरातील सर्व भागांना रक्त पुरवठा करणे हे हृदयाचे प्रमुख कार्य.  हाताने हृदयावर जोर देऊन पंपिंग करणे, ऍम्ब्युलन्स बोलावून हॉस्पिटल मध्ये दाखल करणे हे अत्यंत महत्वाचे.  हार्ट अटॅक साठी आपली बदलती जीवनशैली, ताणतणाव ही प्रमुख कारणे.   Mental, social, family, professional stress, smoking, fast food, diabetice, no compromise, anger etcall leads to heart attack.  Doctor advised to practise yog and meditation, spare some time early in the morning -calm personal time with no other  activity.  Don’t be workholic.  Daily exercise is must.  He also advised to learn to laugh, give, appreciate and help.  This will help in developing...

पुस्तक वाचन - 5

Image
  "पत्रास कारण की ......". ले. अरविंद जगताप  श्री अरविंद जगताप यांनी लिहिलेली पत्रे आणि सागर कारंडे यांनी चला हवा येऊ द्या .. या टीव्ही मालिकेत त्यांची पत्रे वाचून दाखवली गेली .पुस्तकात लेखकांनी विविध विषयावर - सामाजिक शैक्षणिक राजकीय खेळ संगीत गायक याबाबत पत्र लेखन केले आहे.   पुस्तकाची अर्पण पत्रिका वाचनीय आहे.  पुस्तकात लेखकाने आपले मनोगत खूप विस्तृत आणि सुंदर व्यक्त केले आहे.  पत्र लिखाण बाबत झालेला बदल,  मोबाईल नसताना पत्राचे महत्व  यामध्ये झालेला भावनिक बदल  स्त्रियांचे प्रश्न अडचणी, सामाजिक उपेक्षा तिचे गौण स्थान ..पुरुषी अहंकार याबाबत विचार व्यक्त करून पुरुष वर्गास चांगलेच चिमटे काढले आहेत .पुस्तक वाचनीय आहे.

कानपुर ट्रीप - 30.04.2023

Image
  ३०.०४.२०२३ रोजी आम्ही लखनौ पुणे व्हाया दिल्ली मार्गे पुण्यास परतलो.  उत्तर प्रदेश भागात वाहतूक आनंदी आनंद आहे. कोणी नियम पाळत नाहीत. जो पर्यंत आपल्याला रस्ता सोडत नाहीत तोपर्यंत हॉर्न वाजवत राहतात.  रस्ता विभाजक ठिकाणी जर जागा असेल तर दुचाकी रस्त्याच्या एका टोकावरून दुसऱ्या बाजूस गाडी बिनधास्त चालवतो.  दोन्ही बाजूची वाहतूक थांबून राहते. लोहगाव विमानतळावर ओला उबेर टॅक्सी स्टॅन्ड साठी  ( पिक अप पॉईंट ) एक मॉल पॉईंट आहे. अगदी विमानतळ बाहेरीहून या ठिकाणापर्यंत बग्गीची विनामूल्य सेवा उपलब्ध केली आहे.  या ठिकाणाहून आपापली ओला आगर उबेर टॅक्सी पकडून आपल्या ठिकाणी जाता येत. ही एक छान सोय आहे.

कानपुर ट्रीप - 29.04.2023

Image
  २९.०४.२०२३ रोजी सकाळी  बिठूर या  ठिकाणी भेट दिली. बिठूर हे कानपुरपासून १८ km आहे.  बिठूर येथे गंगा नदी वाहते. येथे परत गंगा काठी बोटीतून एक फेरी मारली. येथेपण घाट आहेत. कालेश्वर येथे महादेवाचे, ब्रह्मवर्त मंदिर आहे.  ब्रह्मदेवाचे या जागेस पाय लागले म्हणून मंदिरात पादुका आहेत.  महर्षी वाल्मिकी आश्रम - येथे लव कुश यांचा जन्म झाला.  हे पहिले.  यानंतर पेशवे स्मारक भवन बघितले. १८५७ च्या क्रांतीचे नायक नानासाहेब धोंडोपंत पेशवे यांचे स्मारक सुंदर बांधले आहे.  आजूबाजू बाग आहे. पुरातन पेशवेकालीन वस्तूंचे संग्रहालय आहे.  वाटेत राधा-माधव आश्रम बघितला.   राधा माधव मंदिर अतिशय सुंदर आहे.  मंदिराबाजूस डोंगर - गुफा बनवली आहे. या गुफेत शबरी आश्रम आणि इतर रामायणातील देखावे बनवले आहेत.  वाघ-सिंह डरकाळी आणि अन्य प्राण्याचे आवाज रेकॉर्डिंग  केले आहे.  अगदी मान वाकून गुहेतून काही ठिकाणी जावे लागते.  पण ही गुफा खूप सुंदर बनवली आहे. आजूबाजूचा परिसर रमणीय आहे.  हे मंदिर आणि बिठूर जरूर पाहण्यासारखे आहे.