सहावे स्नेहसंमेलन

 


सहावे स्नेहसंमेलन


१) वासोटा riverside रिसॉर्ट - मुनावळे  तालुका जावळी सातारा - आम्ही ११ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता रिसॉर्ट वर पोचलो. ABCD  , टोपीखेळ आणि रिसॉर्ट तर्फे संगीत खुर्ची, गाणी कार्यक्रम मजेत पार पड

२) त्रिवेणी संगम, श्री दत्त मंदिर, वासोटा किल्ला बोट फेरी - १२ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता बोटीने आम्ही प्रथम त्रिवेणी संगम - (तीन नद्या - कोयना, सोळशी, कंदाती)  या त्रिवेणी संगमाखाली २०० फूट खोल पाण्याखाली महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराची प्रतिकृती म्हणून शेजारी ब्रविमश्वर महादेव मंदिर आहे. हे मंदिर भुयाराखाली आहे. या ईश्वरलिंगात ब्रह्म+विष्णू +महेश हे विराजमान आहेत. श्री नारायण महाराज यांनी त्याठिकाणची निवड केली यामागे एक आख्यायिका आहे. या भागात गणपती, गुरुदेव पादुका मठ, एक मुखी दत्त, एक खांबी अष्टकोनी गुरुचरित्र पारायण सभामंडप, एक झाडाच्या खोडातून तीन वृक्ष- वड, पिंपळ, औदुंबर उगवले, अशी छोटीमोठी देवळे आहेत. आजूबाजूनी झाडी आणि नदीचे पाणी अश्या निसर्गरम्य परिसर लाभलेला आहे. हे खूप पाहण्याजोगे आहे.   नंतर  वासोटा किल्ला हा दुरून पाहिला. या किल्ला म्हणजे शिवकालीन साम्राज्यतील कारागृह होते.  ही तीन तासांची बोट सफारी मस्त झाली

३) अभय याची एकष्टी कार्यक्रम - अभयचा ६१वा वाढदिवस बोट सफारी आणि नंतर रिसॉर्टवर केक कापून साजरा केला. साऱ्या मित्रमैत्रिणींनी अभयबाबत मनोगत व्यक्त करून  ६१ टाळ्यांच्या गजरात अभिष्टचिंतन केले. जीवनातील एकष्टी आपल्या बालमित्रमैणीच्या स्नेहसंमेलनात अंगारकी चतुर्दशी दिवशी, मिनी काश्मीर ठिकाणी साजरा होणे - हा एक दुर्मिळ योगायोग. अभयनी सर्वाना धन्यवाद दिले.

४) वासोटा धबधबा -  १३ ऑगस्ट रोजी सकाळी बोटीने जवळच असलेल्या धबधबास भेट दिली. - उंच डोंगरावर (जवळजवळ ४०० पायऱ्या चढून )- जंगलातून जावे लागते.  पावसाळी वातावरण, आजूबाजूचा निसर्ग पाहत १.५ किलोमीटर चालत धबधबाचे ठिकाण गाठले.  हा धबधबा १२ महिने चालू असतो असे सांगतात. जाताना आम्ही जळूना तुडवत गेलो त्यामुळे चिडून काही जळुनी आम्हाला सोडले नाही. साऱ्या मैत्रिणींना भरपूर त्रास जळुनी दिलाच अर्थात मैत्रिणी गोड असतात 🤪.. नाही का .. जळूंचे काही असो.. पण येथील निसर्गरम्य दृश्य, धबधबा, पावसाळी हवा-- हे सर्व मोबाईल कॅमेरातच काय पण दोन डोळ्यातसुद्धा साठवता येत नाही.

मिनी काश्मीर सारखे असणारे रिसॉर्ट ठिकाण, राहण्याची, भोजन व्यवस्था, कॅम्प फायर, जुन्या आठवणी, गप्पा,  कोरावके, कॅरम,चेस, बॅडमिंटन  खेळ, चहापान, यांचा मनमुराद आनंद लुटत -दिपकची नात "सारा" - हीने  सर्वांशी मिळूनमिसळून करमणूक केली. साराचा उत्साह, जोश कौतुकास्पद 👌🏻 होता.  सर्वानी मनापासून आनंदाने सहभाग घेऊन स्नेहसंमेलन यशस्वी पार पडले. आम्ही प्रत्येकाचा निरोप घेतला. परत भेटूच ..🙏🏻


Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा