अध्यात्म सरिता अंतर्गत "संवाद" श्री अभय टिळक, श्री अभय भंडारी आणि डॉ धनश्री लेले

 




यूटुबवर इंद्रधनू आयोजित वसंत व्याख्यानमाला ठाणे अध्यात्म सरिता  अंतर्गत "संवाद"  श्री अभय टिळक, श्री अभय भंडारी आणि डॉ धनश्री लेले यांच्याबरोबर संवाद - संवादक श्री विनायक पाचलग हा कार्यक्रम पाहिला. सामान्यांना पडणारे प्रश्न - अध्यात्म म्हणजे काय, मानसिक तणाव, शांती, धर्म आणि पूजापाठ कर्मकांड, कर्म आणि भक्ती योग यासारखे अनेक प्रश्न श्री विनायक सरानी विचारले आणि या तिघा मंडळींनीही संवाद साधला. मुलांच्यावर कसे आणि काय संस्कार करावेत याबाबत - मोबाईलचा वियोग कसा सहन करायचा, ४५ मिनिटे स्थिर बसणे, तपस्या दीर्घकाळ हवी easy going काही नाही, नक्कल नको अस्सल हवे, जसे नाही तसे दाखवणे नको, प्रामाणिकपणा, कष्ट, स्वतःच्या क्षमता शोधून वाढवणे. आत्मभान, लोकसंग्रह करणे, सातत्य, लक्ष ठेवणे, आरोग्यपूर्ण जीवन, परद्रव्य, परनारी, परान्न टाळणे..



ईश्वर दर्शनासाठी काय करावे - जाणिवांचा स्तर बदलायला हवा, प्रामाणिक असावे, मनामध्ये करुणा, भय, लालसा यत्किंचितही नको. बुद्धी स्थिर हवी.  आपल्या क्षमता ओळखा.  आपल्याला काय इच्छित आहे जे झेपेल तेच करावे. पृथ्वीवर सगळीकडे पाणी आहे पण आपण आपल्याला तहान तेवढेच पाणी पितो.  शेवटी जाताजाता सामान्यांना सल्ला - पाहावे आपणाशी आपण, योग कर्मसु कौशल्यम - ज्ञान योग- सगळे समान दिसले पाहिजे - चितवृत्ती- भक्ती योग -  सारे भगवंतास अर्पण करावे. तुलना सोडून द्यावी.कार्यक्रमामध्ये - ज्ञानेश्वर माउली, तुकोबा, संतांचे अभंग, कृष्णमूर्ती, विवेकानंद, ओशो ..भगवद गीता याबाबत वारंवार उल्लेख होता. हा कार्यक्रम अत्यंत श्रवणीय झाला. संवाद काढून जरूर ऐकावा.

Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा