Posts

Showing posts from November, 2025

सौ नीरा मावशी

  आमचे दादा पुण्याला ऑफिस कामानिमित आल्यावर आपल्या नातेवाईकाकडे वेळ काढून जरूर सर्वांना भेटत असत. पुण्याचा दौरा झाल्यावर चिकोडीला आल्यावर आम्हा मुलांना पुणे दौराबाबत सविस्तर हकीगत सांगत. CWPRS  ला जाऊन निराकडे गेलो होतो. सौ निराने उत्तम स्वयंपाक केला होता. सर्वच पदार्थ उत्तम रुचकर झाले होते. सौ निरा स्वयंपाक पाणी छान करते.. असे दादा म्हणायचे. लहानपणी कळायला लागल्यावर झालेली हीच सौ नीरा मावशीची प्रथम ओळख... आपली नोकरी, मुलांच्या शाळा परीक्षा, रजा वगैरे कारणास्तव मावशीचे चिकोडीस येणे जाणे क्वचित असे. माझी सुट्टी बेळगावला जायची त्यामुळे मी पुण्यात सुट्टीत कधीच गेलो नाही, अर्थात जाणे आणि नसले तरी सर्व मावशी आम्हास पत्रातून (पोस्टकार्ड नाहीतर इनलँड लेटर) मधून महिन्यातून एकदा भेटत असे.  ऑफिस व घर काम यातून सवड काढून मावशी मुलींच्या शिक्षणाची प्रगती, अभ्यास, स्पर्धा परीक्षा, ऑफिस काम वगैरेबाबत सविस्तर हकीगत कळून आम्हा सर्व भावंडांची सविस्तर विचारपूस पत्रातून करत असे. अक्षरहीछान होते, इनलँड पत्र भरभरून ती लिहीत असे. अभ्यासाबाबत आम्हास पत्रातून मार्गदर्शन करीत असे. स्पर्धा परीक्षा...

प्राचार्य शिवाजीराव भोसले - व्याख्यानमाला

                                                प्राचार्य शिवाजीराव भोसले - व्याख्यानमाला  प्राचार्य शिवाजीराव भोसले व्याख्यान याबाबत आपण सर्वाना माहीतच असेल. येथे वेगळे काही सांगण्यास नको. मीपण वर्तमानपत्रातून त्यांच्याबद्दल खूप वाचले होत, पण प्रत्यक्षात मी त्यांचे व्याख्यान ऐकले नव्हते. आमच्या ऑफिसमधील एका सहकारीबाईनी त्यांच्या व्याख्यानाच्या ख्यातीबद्दल मला सांगितले. एकदा त्यांचे "स्वामी विवेकानंद" यांच्यावर व्याख्यान होते पण काही कारणास्तव तिथे हजेरी लावणे जमले नाही. असो एक संधी गमावली. गणपतीचे दिवस आले. गणेश उत्सव पुण्यनगरीत नेहमीच जोरदार साजरा केला जातो. पुणे फेस्टिवल शताब्दी सोहळा जोमात साजरा झाला,  श्री श्रीमंत दगडूशेट मंडळावतीने भरघोष कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमात दररोज प्रा, शिवाजीराव भोसले याचे थोर व्यक्तीच्या जीवनावर व्याख्यान आयोजित केले होते.  या व्याख्यानमालेबाबत माहिती देऊन ही ३१ ऑगस्ट आहे. कार्यक्रमाचे स्थळ सारसबाग जवळ होते....

ती अप्पाजी - भीमरथी कार्यक्रम

                                                             ती अप्पाजी - भीमरथी कार्यक्रम  आज ती. अप्पाजींच्या वयाला सत्तर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भीमरथी कार्यक्रम आयोजित केला आहे. अप्पाजींना त्यांचे नातलग "बाळ" असे संबोधतात. उदाहरणार्थ बाळ मामा बाळ काका वगैरे. आमच्या बाळला बाळ झाले तरी आणि त्यांच्या बाळाला बाळ झाले तरी अजून आमचा बाळ - बाळच आहे असे गमतीने त्यांच्या भगिनी सौ बेबीताई  म्हणतात. या कार्यक्रमास त्यांच्या ज्येष्ठ भगिनी सौ सुमनताई हजर आहेत, योगायोगाने मुंबईहून सौ बेबीताई आणि  श्री उदयराव सह कार्यक्रमास मुद्दाम कार्यक्रमास हजर आहेत. आमचा बाळ सत्तर वर्षाचा झाला असे त्या कदाचित मनातल्या मनात म्हणत असतील. शाब्दिक कोट्या करण्यात बाळ व बेबी यांची नेहमी स्पर्धा असे. दोघेही एकत्र जमल्यावर शाब्दिक कोट्या करून इतरांची करमणूक करत. अप्पांजींचा नियमितपणा हा गुण मला अधिक भावला.  ते नेहमी व्यायाम, चालणे वगैरे न चुकता क...

पाटील आणि कणवीकर कुटुंबातील लाडके व्यक्तिमत्व

                                            पाटील आणि कणवीकर  कुटुंबातील लाडके व्यक्तिमत्व  श्रीकृष्णाला बासरी खूप आवडते बासरीतून सारेगम सप्त स्वर उमटतात.  एका बासरीतून समाधान, प्रसन्नता, सहनशीलता, स्वयंपाककला, नम्रता, साधेपणा आणि आदरातिथ्य..  वगैरे असे सात स्वर प्रगट होतात आणि ती बासरी म्हणजे श्रीकृष्णामाईतील मंजुमामी माझ्या लग्नानंतर मे महिना आल्यावर झुक झुक गाडी मामाच्या गावाला जाऊया मामी मोठी सुगरण वगैरे गाण्याप्रमाणे श्रीकृष्णामाई येथे सुट्टी कशी घालवली याबाबत सांगते.  मामीचे आदरातिथ्य आणि स्वयंपाकपाणी व मनापासून सर्वांना खाऊ घालणे याबाबत खरंच कौतुक करावे तेवढे कमीच ..साखरेचे खाणार त्याला देव देणार असे म्हणतात.माझातर साखरपुडा  धारवाड येथेच 1995 साली झाला त्यानंतर मला पण मामीच्या हातचे स्वयंपाक व इतर खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली आमचे कुलदैवत श्री बनशंकरी बदामी जेव्हा मी बदामी जातो तेव्हा जवळच अन्नपूर्णा देवी राहते तिचे दर्शन व प्रस...

"फॉरीन बॉडी" - एक नाजूक मामला

                                                  "फॉरीन बॉडी" - एक नाजूक मामला  आमच्या विभागाचे प्रमुख श्री देवधरसाहेब हे खूपच विनोदी स्वभावाचे आहेत. त्यांचा स्पष्टवक्तेपणा, हजरजबाबीपणा , दणदणीत आवाज, परोपकारवृत्ती वगैरे गुण वाखाणण्यासारखे आहेत.  सेकशनमध्ये काम करण्याऱ्या सहकाऱ्यांवर ते नेहमीच चेष्टामस्करी करत.  कधीकधी ते मला प्रेमाने "माय डिअर सीएम" असे बोलावत तर कधी माझे चुकले तर ते "सीएम इकडे येरे - हे काय लिहितोस रे ? येन आप्पा ! असे रागावून हाका मारतील तेणेकरून आजूबाजूच्या विभागातील सहकारी माझ्याकडे बघत.  साहेबांच्यामुळे सेकशनमधील वातावरण नेहमीच खेळीमेळीचं असे. साहेब जर गैरहजर असले तर आम्हालाच काय पण आसपासच्या सेकशनमधील सहकाऱ्यांना करमत नसायचे यात शंका नाही. आमच्या विभागात काम करणारे श्री माधव आफळे हे आमच्या साहेबांचे लाडके सहकारी. आफळेंच्यापुढे मी "बुवा " लावत नाही कारण लगेच साहेब म्हणतील "बुवा तिथे बाया"  पण माधवराव उत्तम प्रवचन की...

"शताब्दी" प्रवास

                                                                         "शताब्दी" प्रवास  मी आपणा सर्वांचा प्रेमळ निरोप घेऊन कोयना एक्सप्रेस गाडीने मुबईस घरी रात्री १० वाजता सुखरूप पोचलो. २५,०५,१९९५ रोजी सकाळी घाटकोपर-दादर मार्गे लोकलने मुंबई सेन्ट्रलवर सकाळी ५.३० वाजता वेस्टर्न लाईनवर आलो. दारात गुजरात मेल स्वागतास उभी पण तिच्यातून माझा प्रवास नसल्यामुळे ती नाराज झाली. शेवटी ५.४५ वाजता तिला आम्ही टाटा केला. दरम्यान ५.३० वाजता आमची शताब्दी सेवेस हजर.  सकाळी स्थानकावरील कुलीने माझे सामान माझा नेमका डबा येईल तेथेच व्यवस्थित आणून पोचवले. मी डब्यात शिरून सीट शोधू लागलो. सारखं खिडकी मिळेल की नाही..? ही रुखरुख  आणि योगायोग खिडकीनजीकची जागा मिळाली.  मला आनंद झाला. कारण प्रवास प्रथम आणि सारा नवीन भाग.. बरोबर ६.२५ वाजता शताब्दीने वेग घेण्यास सुरुवात केली.  शताब्दी संपूर्ण AC आहे. कोचमध्ये...

निरोपसमारंभ -8 - उत्कृष्ट अष्टपैलू - मनीष गोहाड..

                                                              उत्कृष्ट अष्टपैलू -  मनीष गोहाड.. क्रिकेट खेळात अष्टपैलू खेळाडूचे स्थान महत्त्वाचे आणि मोलाचे असते संघास धावांची अपेक्षा असते तेव्हा तो भरपूर फटकेबाजी करून धावा काढतो ज्यावेळी विकेट हवे असतात त्यावेळी गोलंदाजी करून विकेट्स काढतो. क्षेत्ररक्षणाबाबत तो कोणत्याही ठिकाणी क्षेत्ररक्षण करून झेल पकडून अथवा धावा अडवून संघास विजय मिळवून देत. आपल्या कामगिरीमुळे संघाच्या आणि प्रेक्षकांच्या मनात आदराचे स्थान पटकावून मनात घर करून राहतो. शिरूर संघातील उत्कृष्ट अष्टपैलू म्हणजेच मनीष गोहाड.. दर सहामाही शाखेचा ताळेबंद,  इन्कम टॅक्स, अग्रीम स्टेटमेंट, रिटर्न्स, बँक ऑफिस, सिबिल, कॉम्प्युटर आणि इतर कामाच्या वेगवेगळ्या मैदानावर मनीषने चौफेर अष्टपैलू खेळ करून संघास विजय मिळवून दिला आहे. सांघिक कामगिरीमध्ये मनीषचा सिंहाचा वाटा आहे यात  शंका नाहीच. संघातील इतर खेळाडू तंबूत परतल्या अ...

निरोपसमारंभ - 7 -श्री माधव आफळे

                                                                     श्री माधव आफळे  आपण रेल्वे प्रवासास घरातून निघतो. प्रवासाच्या सुरवातीस CST  स्थानकावर गाडी तीन तास उशिराने सुटणार याबाबत घोषणा होते. तेव्हा आपण थोडे नाराज होतो. आणि गाडी फलाटावर लागण्याबाबत प्रतीक्षा करतो. नंतर गाडी येऊन स्थानकावर ग्रीन सिग्नल मिळतो आणि प्रवास सुरु होतो. गाडी दादर स्थानक मागे टाकून ती सायन स्थानकावर येऊन सिग्नलसाठी खोळंबून राहते.  तेथे गाडी जवळजवळ तीन तास रखडते. अश्यावेळी आपल्या मनाची स्थिती काय होत असेल नाही?  आपल्या मनातले वेळप्रत्रक कोलमडून पडते.  अशीच अवस्था माधवरावची  गेली ५-६ महिने झाली असणार. आज मात्र माधवरावांचा पुण्याकडे जाणाऱ्या गाडीस हिरवा कंदील मिळाला आहे. माधवरावांची गाडी जवळजवळ सहा महिने "सायन" स्थानकावर सिग्नलसाठी खोळंबून उभी होती.  आपली सुटका होण्याबाबत माधवरावांनी प्रभूची याचना क...

निरोपसमारंभ - 6 - RT नायकसाहेब - लोकप्रिय सागर

                                                            RT  नायकसाहेब - लोकप्रिय सागर सागरास अनेक नद्या येऊन विलीन होतात. नाडयांमध्ये काही लहान काही मोठ्या असतात. त्या नद्या विविध भागातून येऊन सागरात विलीन होतात.  नद्यांचे पाण्याचे लोंढे लोंढे सागरास येऊन मिळतात. सागर कोठेही तक्रार करीत नाही.  उलट सर्वाना बरोबर घेऊन पुढे जातो.  माणसांनी समुद्रापासून बरेच काही शिकण्यासारखे आहे. माणसाचे मन समुद्रासारखे अथांग असावे असे म्हणतात. माणसाने टाकाऊ वस्तू सागरात टाकली तरी सागर नको असलेली वस्तू आपल्या पोटात कधीच ठेवत नाही.  सागर ती वस्तू नेहमी किनाऱ्याकडे फेकून देतो.  थोडक्यात सागराविषयी प्रत्येकास आदर, अभिमान, प्रेम असतेच.  सर्वाना सामावून सांभाळून घेऊन पुढे जाणारा लोकप्रिय सागर म्हणजेच श्री RT  नायकसाहेब. थोडक्यात RT . श्री नायकसाहेब हे Advances  Section चे पालकमंत्री असल्यामुळे RT च्या केबिनमध्ये adv...

निरोपसमारंभ - 5 - श्री अनिल देवधर - एक सुखद वारा

                                                              श्री अनिल देवधर - एक सुखद वारा  एखाद्या गवताळ भागात आपण उभे असतो. त्या ठिकाणी वाऱ्याची सुखद झुळूक येते. तेव्हा आपणास बरे वाटते. अश्या वातावरणात फिरायला बरे वाटते.  आपण बरेच चाललो तरी शरीरास थकवा वाटत नाही.  पण कधीकधी तोच वारा सुसाट वेगाने वाहू लागतो तेव्हा त्याच्या आवाजाने आणि वेगाने आपण हैराण होतो.  वेग कमी झाल्यावर परत नेहमीप्रमाणे तो सुखद वाहून मनास आल्हाद देऊन जातो.  आपल्यापासून दूर अंतरावर असणाऱ्या सर्वांपर्यंत तो वारा वाहत जाऊन मनास भिडतो. कधीकधी तोच वारा शीळ देत मंजुळ स्वरात वाहतो.  आणि त्या वाऱ्याचे नाव म्हणजे " अनिल देवधर". कॅप्टन देवधरांनी मला मे-१९९९ मध्ये R & L बोटीवरून ADVANCES Sec - LBA  बोटीवर आणले.  देवधरसाहेब तसे फिल्डिंग लावण्यात पटाईत आहेत.  section मध्ये कोणाची बदली झालेतर ते त्या जागी योग्य ती निवड आधीच क...

निरोपसमारंभ - 4 - श्री विलास चित्रे - एक रमणीय स्थानक

                                                       श्री विलास चित्रे - एक रमणीय स्थानक  मुंबईतून CST  दादर, चर्चगेट, मुंबई सेंट्रल वगैरे स्थानकातून वेगवेगळ्या गावी जाण्यासाठी बऱ्याच गाड्या धावत असतात. गाड्यामध्ये आकर्षक वातानूकुलीन "गीतांजली" अहमदाबादला जाणारी सुखदायी "शताब्दी" दिल्लीकडे वेगाने जाणारी " राजधानी" पुण्याकडे प्रस्थान करणारी लाडकी "दखनची राणी" कोकणात जाणारी "कोकण कन्या" वगैरे..लोकल विभागामध्ये ९ डब्यांची, १२ डब्यांची, सुपरफास्ट, सेमीफास्ट,धीमी गाड्या, सेंट्रल वेस्टर्न. हार्बर रुळावरून दररोज धावतात.  लोकल गाड्यांचा रंग सुंदर निळा,लाल पिवळा आहे. या सर्व गाड्या वेगवेगळ्या स्थानकावरून सुटल्यातरी त्या सर्व गाड्या एक स्थानकावर १-२ मिनटासाठी थांबून पुढे प्रयाण करतात. गाडी कितीही वेगात असली तरी काही मिनटे एक विशिष्ट स्थानकावर विसावा घेऊनच पुढे धावत. त्या रमणीय पण साध्या स्थानकाचे नाव म्हणजेच "विलास चित्रे" ट्रैनिंग सुरु असतान...

निरोपसमारंभ - 3 - सर्वांचा लाडका सतीश

                                                                 सर्वांचा लाडका सतीश  ३१ मार्च २००१ तारीख जवळ येऊ लागली. यादिवशी सतीश शेणॉय हा स्वेच्छानिवृत्ती योजनेमध्ये कार्यमुक्त होणार. सतीश हा सर्वांचा लाडका. दोन दिवसापासून सतीशवर आपण आपले मनोगत लिहावे आणि कार्यमुक्ती समारंभावेळी सादर करावे असा बेत मी पाडव्यानिमित्य आखला. मी ऑफिसर होऊन भद्रा अहमदाबाद शाखेत रुजू झाल्यावर तिथे मी association च्या भरीव कामगिरीबाबत सतीशबदल प्रथम ऐकले होते. विशेषतः ट्रान्सफर बाबत तेव्हा सतीश ही व्यक्ती कोण आहे? याबाबत उत्सुकता वाढली आणि एक दिवस Association कामामुळे सतीश अहमदाबाद आल्यावेळी शाखेत प्रत्यक्ष भेट घडली. इतर नेत्याप्रमाणंच  हा पण एक असेल असे मला वाटले. नंतर Advances च्या कामामुळे फोनवर वारंवार बातचीत घडून मैत्रीचा श्रीगणेशा सुरु झाला.  जुलै १९९८ मध्ये circle ऑफिस मध्ये प्रथम R & L Sec  मध्ये हजर झालो आणि मे १...

निरोपसमारंभ - 2 सौ. साधना डांगी आणि सौ. शैला कर्वे

                                                    सौ. साधना डांगी आणि सौ. शैला कर्वे माननीय AGM  साहेब, DM  साहेब, वरिष्ठ अधिकारी आणि माझ्या सहकारी बंधू भगिनींनो, सौ. साधना डांगी आणि सौ. शैला कर्वे याना आज बदलीनिमित्य आपण निरोप देत आहोत. यावेळी मी जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा मला १९८८ नंतरची बरीच चित्रे डोळ्यासमोर येतात. आता या चित्रपटाची अखेरची घंटा वाजली आहे. आता या चित्रपटाचा थोडक्यात वृत्तांत आपल्यासमोर सादर करीत आहे. प्रथम साधना यांच्याविषयी नंतर मध्यांतर कर्वे यांच्याबाबत,, साधना डांगी या अष्टपैलू आहेतच,  हे सर्वाना माहित असेलच. मी त्यांना "डायन्यामिक डांगी" म्हणत असे. कामातील व्यवस्थितपणा, तळमळ, गती, हस्ताक्षर.. बाबत कौतुक करावे तेवढे थोडेच.. याशिवाय शब्दकोडी, छंद आणि विशेषतः पाककला - यांची आवड त्यांना अधिक आहे. याची चव मला मिळाली आहे. नुसतीच त्या "रेसिपी" लिहून घेत नसत तर प्रत्यक्ष कृती करत. त्या जेव्हा Agriculture section मध्ये रुजू ...

निरोपसमारंभ - 1 श्री एस बी कल्लेसाहेब

                                                          श्री एस बी कल्लेसाहेब निरोपसमारंभ  आज आपण श्री कल्लेसाहेब यांच्या निवृत्तीसंबंधी निरोप देत आहोत. कल्लेसाहेब निवृत्त होतायत यावर आपला विश्वास बसत नाही.  त्यांच्या तब्येतीकडे (विशेषतः काळे केस) बघता साहेबाची खरोखरी साठी कधी गाठली? असा प्रश्न मनास पडतो. असो प्रथम निवृत्तीनिमित्य हार्दिक शुभेच्छा .. त्यांना साठाव्या वर्षी लाभलेली तब्येतीची साथ शंभराव्या वर्षीपण अशीच मिळो हीच प्रार्थना. त्यांचा ऑफिसमध्ये advances Dept  मध्ये बराच कालावधी गेला. मी Advances Dept  काम करताना माझा त्यांचा जास्त संबंधामुळे स्वभावाची ओळख होऊन दोघांच्यात जवळीक निर्माण झाली होती. त्यांचा स्पष्टवक्तेपणा, वास्तववादी दृष्टिकोन, इतरांना मतप्रदर्शनाचे स्वातंत्र, मोकळी चर्चा करून स्वतःचे मत पटवून देणे, उगाच दुसऱ्याची वारेमाप स्तुती न करणे वगैरे गुणांचे दर्शन घडले. याचबरोबर विरोधी मतप्रदर्शन करण्याबाबत त...

मी काय वाचले -16

  ज्ञानेश्वरी कथासार - ले. श्री नारायण गंगाधरशास्त्री ओक  ज्ञानेश्वरी ही भगवद गीता यावर टीका आहे.  गीतेतील १८ अध्याय वर लेखकानी थोडक्यात आपले विचार उत्तमप्रकारे मांडले आहेत. हे १०४ पानी छोटेखानी पुस्तक अत्यंत वाचनीय आहे. लेखक आपल्या प्रस्तावनेत म्हणतात - " ज्ञानेश्वरी हे महाराष्ट्राला लाभलेले अमोल वरदान आहे.  या ग्रंथाचे प्रत्येक अक्षर म्हणजे गुरुप्रसादच आहे. श्रद्धा ही कामधेनूच आहे. मनुष्य श्रध्दामय जीवन जगत असतो. फक्त त्या श्रद्धेची व्यक्तीचा शारीरिक व मानसिक विकास करण्यास उपयोगी पडेल अशी जोपासना करणे अत्यंत जरूर आहे.  त्यासाठी या ग्रंथाचे महत्व अपूर्व आहे. याच्या वाचनाने मनुष्य जीवनाचा खरा उपयोग काय व ते कसे जगावे याचे ज्ञान यथार्थतेने होईल यात शंका नाही."  - पुस्तक वाचल्यावर हे खरे आहे.  हे पुस्तक माझ्या जन्मांपूर्वी प्रकाशित (मे 1964) झाले होते. पुस्तकात द्वितीयावृत्ती - नोव्हेंबर १९६६ आणि किंमत - एक रुपया पन्नास पैसे..असा उल्लेख आहे. या पुस्तकाची पाने आता पिवळी पडून जीर्ण झाले आहे.  पण जुने ते सोने .. हेच खरे.. 

मी काय वाचले -15

  "Mahatma Gandhi"  - Essays and Reflections on his life and work  - Edited by Dr. Sarvapalli Radhakrishan. This was presented to him on his seventieh birthday - October 2nd 1939.  This book contains tributes to the Father of the Indian Nation from over a hundred greatest thinkers from different parts of the world. The entire collection is a veritable depository of the greatness of the man who has influenced the modern world.   Dr. S. Radhakrishan has written as -  "Those who read these pages will be impressed by the fundamental unity between Gandhi's theory and practice, the exquisite harmony of his life and work, which is the very essence of sincerirty.  It marks him out as one of the outstanding personalities, not only of our time but of all time.  A salute to this great soul and oustanding Mahatma..

हाकोने ट्रिप - 15.11.2025

Image
  हाकोने ट्रिपसाठी आम्ही सकाळीं ६.३० वाजता घर सोडले. हाकोने हे एक प्रसिद्ध जपानमधील टुरिस्ट ठिकाण.. हाकोने हे फुजी-हाकोने इझु नॅशनल पार्क चा भाग. हे गरम पाण्याचे झरे, निसर्ग सौंदर्य आणि अशिनोको लेक यासाठी प्रसिद्ध. Owakudani - येथे आम्ही सकाळी ११ वाजता पोचलो. ३००० वर्षांपूर्वी येथे ज्वालामुखी प्रगट झाला होता. येथे अजूनही सल्फर चे धूर जमिनीतून निघतात आणि हे धूर पाहायला मिळतात.  येथील नदीचे पाणी पण गरम आहे. उंचावरून फुजी पर्वताचे दर्शन घडते.  येथील गरम पाण्यात अंडे ठेवले तर उकडून ते काळे पडते.  हे अंडे जर वरचे कवच काढून आतील भाग भक्षण केले तर आयुष्य ७ वर्षे वाढते असा समज आहे. सारे प्रवासी येथील अंडी विकत घेऊन खातात. हे एक विशेष. Lake Ashino - ओवाकुडानी येथून आम्ही रोपेवे ने टोगेनडाई (Togendai ) येथे गेलो. रोपेवे मधून जाताना काही जापनीज प्रवासी यांच्याबरोबर थोडाफार संवाद झाला. त्यांना आम्ही तिघे एकत्र प्रवास आणि आमचा पोशाख  आणि इतर गोष्टी आवडल्या.  त्यांनी आमच्याबरोबर फोटोस काढून घेतले. आम्हास बरे वाटले..(थोडी कॉलर..) टोगेनडाई येथून बोटीने लेक अशिनो येथे जावे ...