Posts

Showing posts from May, 2021

डॉ. संजय मालपाणी यांचे गीतेवरचे विचार

  जनजाती कल्याण आश्रम, नगर शाखा आयोजित कै. ग. म. मुळे स्मृती व्याख्यानमाला *विषय - सामाजिक उद्बोधन आणि समुपदेशनचा ग्रंथ  -भगवद् गीता * वक्ता - डॉ. संजय मालपाणी  ( राष्ट्रीय कार्याध्यक्ष - गीता परिवार)  - झूमवर २२.०५.२०२१ रोजी होते. व्यवस्थापन आणि मानसशात्र यांची सूत्रे गीतेत आहेत. धर्माचा खरा अर्थ कर्तव्य. अपयशातून आलेले शहाणपण म्हणजे स्वर्ग,. अनुभवांनी समृद्ध म्हणजे स्वर्ग.. एकापेक्षा अनेकांचा विचार करायला लावणारा ग्रंथ म्हणजे गीता.. नेतृत्व करण्याऱ्याच्या अंगी प्रसन्नता हवी. ऐकण्याची सवय हवी.  मतांतरे होतात पण मनभेद होता कामा नये. सामाजिक क्षेत्रात काम करताना मनात वैरत्व भावना नको. यद्यआचरती श्रेष्ठ ... आपले वागणे, बोलणे, चालणे श्रेष्ठ हवे.   कर्मण्ये वाधिकारस्ते ... चांगले काम करा.  कर्तव्यात कसूर नको. झटपट प्रसिद्धीची आशा नको. आपल्या कामाच्या सुगंधाने आपली ओळख बनवा. कोणतेही काम करताना लाज बाळगू नका. मोक्षाची प्राप्ती हेच परमपद ..आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करीत रहा.  निराशा, दुःख नेहमी बाहेरून येते. मनातून येतो तो आनंद.. सुखाचे शेवटचे ट...

मी काय वाचले - 6

Image
  प्रत्येक क्षणाला अविस्मरणीय करण्याची जपानी पद्धत.  इचिगो इची प्राप्त करण्यासाठी ८ झेन सिद्धांत - १) बसा आणि फक्त काय होतंय ते बघा. (२) हा क्षण आपल्या आयुष्यातील शेवटचा क्षण आहे अश्या प्रकारे त्याचा आस्वाद घ्या. (३) मन विचलित करण्याऱ्या गोष्टी टाळा. ४) जे आवश्यक नाही त्या सगळ्या गोष्टीपासून  स्वतःला दूर ठेवा. (५) स्वतःचे मित्र बना.  (६) अचूक नसल्याचंही आनंद घ्या (७) दया धर्म आचरणात आणा. (८) अपेक्षा सोडून द्या. प्रत्येक क्षण वर्तमानात जगा   आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना जीवनात एकदाच घडत असते.  यामुळेच प्रत्येक क्षण अनमोल आहे आणि त्याची एखाद्या खजिन्यासारखी साठवण करायला हवी.या  प्रेरणादायी पुस्तकातून आपल्याला जपानी जीवनशैलीतून कित्येक गोष्टी शिकायला मिळतात जस की - वर्तमानातील क्षण, योगायोग वाटणाऱ्या गोष्टीमागील संकेत, जागरूकता, माईन्डफुलनेस ,,, 

ममता सावजी - श्रद्धांजली

  सिल्व्हरक्रेस्ट सोसायटी मधील आनंदाची, दुःखाची, उत्सवाची, पाणी सूचना याबाबत माहिती फलकावर थोडक्यात सुंदर अक्षरात लिहिणे हे काम ममता सावजी आनंदाने करीत असत.  आता ती अक्षरे पडद्याआड गेली. ममता सावजी सिल्व्हरक्रेस्ट सोडून देवाघरी गेल्या.. ही बातमी ऐकली आणि मनास धक्का बसला.  ममता विज्ञान आणि गणित उत्तम शिकवायच्या.  दहावी मार्गदर्शन, अभ्यास, वेळापत्रक याबाबत सोसायटी मधील मुलांना मार्गदर्शन करीत. दहावीमध्ये मुलांच्या भरघोस यशात सिंहांचा वाटा असायचा.  कामातील नीटनेटकपणा , वेळेचे व्ययस्थापन, परखडपणा, थोड्यक्यात पण स्पष्ट मत व्यक्त करणे, नियमित चालणे, टेकडी भ्रमंती, कविता करणे, रांगोळी, हौशी वृत्ती,  प्रसन्न व्यक्तीमत्व ,आपले काम भले आपण भले..गुण मला भावले.. दररोज ऑफिसला  जिन्यावरून जाताना त्यांच्या सुंदर आखीव रेखीव रांगोळीचे दर्शन घडत असे.  मनास बरे वाटे. रांगोळीत "श्री राम" शब्द असायचे.. आता आपल्याला कायमचा " राम राम " केला . असो. सोसायटी कमिटीमध्ये असताना खजिनदार, विंग प्रतिनिधी अश्या पदावर असताना उत्तम काम केले. गणपती उत्सवात आणि सर्व सांस्कृतिक उत्सव...

मी काय वाचले - ५

  व्यासपर्व - लेखिका दुर्गा भागवत  महाभारतातील काही व्यक्तीमत्वावर दुर्गाबाईंनी आपले विचार व्यक्त केले आहेत. पूर्णपुरुष कृष्ण ही सर्वात मध्यवर्ती आकृती आहे.  व्याधाचा बाण लागून, मुलगा, सवंगडी, भाऊ, वादक, प्रियकर, योद्धा, पती, राजा, राजकारणपटू वक्ता, तत्वज्ञ या साऱ्या भूमिकांत अपरंपार रस ओतून कृष्णाने शेवटी या साऱ्यांची परमावधी साधा माणूस म्हणून मरण पत्करण्यातच गाठली.  आसक्ती आणि विरक्ती यांची परमावधी त्याने कुशलतेने गाठली.  द्रोण, अश्वथामा, दुर्योधन, कर्ण, अर्जुन, युधिष्ठीर, भीष्म, विदुर, द्रौपदी या व्यक्तीवर सुंदर लेखन केले आहे. व्यासांचे विविध पात्रावर लेखनाबाबत भरभरून कौतुक केले आहे. व्यासांनी स्त्री जातीचे सनातन तेज आणि दौबर्ल्या द्रौपदीच्या रूपाने मनोतज्ञेतेने रेखाटले आहे.  प्रीती आणि रती, भक्ती आणि मैत्री, संयम आणि आसक्ती या भावनांच्या द्वंदातला सूक्ष्म तोल द्रौपदीच्या व्यक्तीमत्वात जसा आढळून येतो तास अन्य कोणत्याही पौराणिक स्त्रीत आढळत नाही म्हणूनच द्रौपदीचे मन हे एक अतिशय स्फुरणारे मन आहे. त्यात विलक्षण पाशवी चैतन्य आहे.  द्रौपदी सर्वात दिसायला...