श्री अप्रेमय स्वामी, करीघट्टा, निमिशाम्ब, श्री आदी रंग मंदिर - एक दिवसाची ट्रिप के

 



श्री अप्रमेय स्वामी मंदिर - हे मंदिर चन्नापट्टण - बेंगलोर म्हैसूर रोड वर आहे. अप्रमेय स्वामी हे भगवान विष्णूचे रूप. अप्रमेय म्हणजे अनंत - अप्रमेय स्वामींच्या शक्ती, ज्ञान, प्रेम याना सीमा नाही म्हणून याना अप्रमेय स्वामी म्हणतात प्रत्येक सूक्ष्म गोष्ट ही त्यांच्याच कृपेने घडते. असे असलेतरी स्वामी अलिप्त असतात. हे मंदिर चोला राजवटीत ११ व्य शतकात बांधले आहे.   मंदिराच्या परिसरात अरविंदवल्ली देवी (म्हणजे महालक्ष्मी देवी) आणि आंबेगालू कृष्णा (बालकृष्ण), मारुती मंदिर आहेत. या मंदिरास भगवान राम भेट देऊन गेले आहेत म्हणून या ठिकाणास दक्षिण अयोध्या असे संबोधले जाते. संत पुरंदरदास यांनी पण भेट दिली आणि बाळकृष्णाच्या मूर्तीने ते अत्यंत प्रभावित झाले. देवदर्शनांतर "पाकशाला" या हॉटेलमध्ये नाश्ता घेतला.  या हॉटेलमध्ये बरीच गर्दी होती हॉटेल मोठे आहे. गर्दी असलीतरी पाच मिनिटात टेबलावर आपले खाद्यपदार्थ येतात. सेवा तत्पर आणि उत्तम आहे. दक्षिण नाश्ता पदार्थ चविष्ट आहेत.


करीघट्टा मंदिर - करीघट्टा म्हणजे  कन्नडमध्ये "हत्ती डोंगर" - हा डोंगर बेंगलोर- म्हैसूर मार्गावर श्रीरंगपट्टणम जवळ आहे. या ठिकाणी "कारीगिरीवासा"  (विष्णू) यांचे देऊळ आहे.  येथील मंदिरात वेंकटरामण्णा यांची मूर्ती आहे. अलंकार पूजेनंतर - वेंकटरामण्णा मूर्ती वैरागी दिसते म्हणून याला " वैरागी वेंकटरामण्णा" असेहि म्हणतात. मंदिराचा आवार मोठा आहे पद्मावती आणि गरुड यांची देऊळ आणि लग्न समारंभ यासाठी कल्याण मंडप, आजूबाजूस झाडे आहेत.  येथून महामार्ग, लोकापवनी नदी यांचे दर्शन होते. परिसर निसर्ग रमणीय आहे.


निमिशाम्ब मंदिर -  हे मंदिर श्रीरंगपट्टणम जवळ कावेरी नदीच्या तीरावर वसले आहे. देवी पार्वती ही आपल्या भक्तांची इच्छा एक मिनिटात पूर्ण करते अशी आख्यायिका, श्रद्धा आहे म्हणून याला निमिशाम्ब म्हणतात. ४०० वर्षांपूर्वी म्हैसूरच्या राजा वडियार यांनी हे मंदिर बांधले.  मंदिरात - सरस्वती, लक्ष्मी, श्रीचक्र, शिव,मारुती गणपती यांच्या पण छोटी देवळे आहेत. मंदिराच्या बाजूस कावेरी नदी वाहते.


श्री रंगनाथ मंदिर श्रीरंगपट्टणम -  श्रीरंगनाथ मंदिर भव्य आणि दिव्य परिसर आयताकृती वसलेले आहे. गर्भगृहात श्री रंगनाथस्वामी यांची शेषशयांवर झोपलेली मूर्ती आहे. ही मूर्ती स्वयंभू आहे असे सांगतात.  श्री रंगनाथस्वामी म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार.. या मूर्तीचे दर्शन खूप पवित्र मानले जाते. मंदिर आवारात बालाजी, रंगनायकी, पद्मावती, नृसिंह, हनुमान, गोपालकृष्ण, यांचीपण छोटी देवळे आहेत.  होयसायाला राजवटीतील ८ व्या शतकातील हे मंदिर पाहण्याजोगे आहे.  मंदिर दुपारी दीड वाजता बंद होते नंतर ४ वाजता उघडते. मंदिरातील पुरातन  खांबावरील नक्षीकाम  कलाकुसर सुंदर आहे. मंदिराजवळ श्री टिपू सुलतान याचा पुरातन राजवाडा आहे.


आम्ही बेंगलोरहून कारने बंगलोर म्हैसूर महामार्गावर असणाऱ्या - श्री अप्रेमय स्वामी, करीघट्टा, निमिशाम्ब, श्री आदी रंग मंदिर - एक दिवसाची ट्रिप केली. श्री विश्वासने उत्तम गाडी चालवली आणि या ट्रिपचे नियोजन केले. मंदिराचे दर्शन मनास समाधान झाले.  ट्रीपबाबत मनापासून आभार आणि धन्यवाद.

Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा