ती. उदयराव देहावसान
ती. उदयराव याना देहावसान बातमी वाचली आणि मनास वाईट वाटले. तीस वर्षांपूर्वी साऱ्या स्मृती जाग्या झाल्या. मुबईस असताना घाटकोपर, अंधेरी, गोरेगाव, पुणे आणि शिरूर येथे माझ्या बदली ठिकाणी त्यांनी आमच्या घरी भेट दिली होती. त्यांचा स्वभाव रॉयल,चेष्टेखोर, खवये, चवीने खाणार, सर्वांशी मिळूनमिसळून, क्रिकेट, राजकारण याविषयावर भरपूर गप्पा..पत्ते खेळ.. त्यांच्या सहवासात वेळ कसा मजेत जात असे. प्रत्येक ठिकाणी कमालीचा समजूतदारपणा (अर्थात मुबईकर..) यामुळे ते सर्वांचे लाडके होते.
वाढदिवसानिमित्य फोनवरून शुभेच्छा देत आणि Blue Diamond (पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल) येथे पार्टी पाहिजे असे चेष्टेने म्हणत. आपला लाडका "Diamond " अचानक "Blue " आकाशात आधीच पोचला. ..त्यामुळे "Blue Diamond " चे स्वप्न अधुरे राहिले. असो.
ती. कै. अप्पाजी यांच्या वर्षश्रद्धानिमित्य बेंगलोर येथे दोन तीन दिवस शेवटचे त्यांच्या सहवासात आनंदात गेले होते. त्यांची तब्येत बरी नसताना ते "ती. बाळासाहेब" (ती. अप्पाजी) यांच्या प्रेमापोटी ते बेंगलोर येथे मुद्दाम आले होते. अर्थात साऱ्या मुंबईकरांना "बाळासाहेब" अधिक प्रिय..आम्ही शेवटी मार्च २०२५ मध्ये अंधेरी येथे शेवटची भेट घेतली होती... ती. उदयराव यांच्या आजारपणात ती बेबी आत्या, समीर, सलील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनापासून काळजी घेतली.. हे कौतुकास्पद आहे. शेवटी ईश्वरइच्छा बलियेशी...या दुःखद प्रसंगी हसबनीस परिवारास भरपूर मानसिक आणि शारीरिक शक्ती लाभो आणि आत्म्यास सदगती मिळो हीच प्रार्थना ईश्वरचरणी साऱ्या नातलगांकडून.. ओम शांती.
Comments
Post a Comment