Posts

Showing posts from November, 2023

सासवड ट्रिप

Image
  हडपसर - सासवड PMT बसने आम्ही सासवडला सकाळी १० वाजता पोचलो.  संगमेश्वर हे पांडवकालीन मंदिर कऱ्हा आणि चाम्बली नदीच्या संगमावर वसले आहे. येथे स्वयंभू शिवलिंग मंदिर आणि उत्तम कोरीव काम पाहण्याजोगे. आता नदीला पाणी नाही.  याठिकाणी विवाहापूर्वीचे शूटिंग होते.  पेशवेकालीन श्री पुरंदरे वाडा पाहिला . बाळाजी विश्वनाथ पेशवे यांची समाधी, वाटेत श्री प्र के अत्रे यांचे घर पाटी पण बाहेरून बघितली. सासवड येथील श्री भैरवनाथ मंदिरपण पाहण्याजोगे आहे. हे मोठे आणि शांत प्रशस्त आहे.संत सोपानदेव देवस्थान मध्ये श्री सोपानदेव यांची समाधी - श्री दत्त मंदिर - संत आदिशक्ती मुक्ताबाई मंदिर.  येथील श्री नागेश्वर मंदिर  - या   मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर आपण एका कोपरात हळू आवाजात बोललात तर त्याच्या विरुद्ध बाजूच्या कोपऱ्यात स्पष्टपणे ऐकू येते. हा एक पुरातन वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. आवारात एक गणेश वृक्ष (चिंचेचा वृक्ष) आहे. येथून श्री सोपानदेव यांनी  संजीवन समाधीचे प्रवेशद्वार आहे. या दिव्य वृक्षाचे स्मूक्ष निरीक्षण केले तर त्याच्या बुंध्यावर अनेक ठिकाणी स्...

पावस श्री स्वामी स्वरूपानंद समाधीचे दर्शन

Image
  गणपती पुळ्याहून रत्नागिरी मार्गे  - पावसला दुपारी १ वाजता पोचलो. श्री स्वामी स्वरूपानंद यांच्या समाधीचे दर्शन घेतले.  समाधीजवळ खूप मनास प्रसन्न वाटले.  समाधीपुढे मोठा हॉल आहे. तिथे स्वामींची ग्रंथसंपदा वाचावयास ठेवली आहे.  भिंतीवर स्वामींचे संदेश आणि संतांचे फोटो लावले आहेत.  बाजूलास ध्यान मंदिर आणि स्वामी त्या खोलीत जन्मले ते घर आहे.  दुपारी १ ते २.३० पर्यंत प्रसाद असतो.  येथे भक्त निवासाची सोय उपलब्ध आहे. समाधीपुढे मी पाच मिनटे शांत बसलो होतो. जवळजवळ ३५ वर्षांपूर्वी लग्नापूर्वी माझी मोठी बहीण देवरुख येथे नोकरीस असताना मी पुण्याहून देवरुख येथे गेलो होतो. तेव्हा बहिणीने मला प्रथम गणपती पुळ्याहून पावसला समाधी दर्शन घडवून आणले होते.  तेव्हा नुसतेच समाधी आणि पुढे हॉल होता. २५ वर्षांपूर्वीच स्वामींनी माझ्या मोठ्या बहिणीस बोलावून घेतले. मला तिची आठवण झाली. ती वरून पाहत असेलच म्हणा. असो..गत स्मृतींना उजाळा.. स्वामींनी सोहं चा मंत्र भक्तांना दिला आहे.  स्वामींनीं अत्यंत सोप्या भाषेत ज्ञानेश्वरी ओवीरूप लिहिली आहे. "सार्थ ज्ञानेश्वरी" - स्वामी ...

दिवाळी पाडवा - संगीत मैफिलीचा कार्यक्रम

Image
  आज दिवाळी पाडवानिमित्य कर्नल्स क्यूब यांनी श्री कल्याण हुद्दार यांच्या संगीत मैफिलीचा कार्यक्रम आयोजित केला होता.  मैफिलीची सुरुवात राग भैरव - जागो मोहन प्यारे या गाण्याने झाली. काही नाट्य गीते, अभंग आणि रागदारी गीते सादर केली.  नाट्य आणि रागदारी गीतात - जय शंकरा .. हे सखी शशीवदने, देवी दयानी भगवती..अभंगामध्ये तुकारामांचे आणि इतर अभंगात  -  सावळे सुंदर रूप मनोहर..ज्ञानियांचा राजा, हरी भजनाविण काळ घालवू नकोरे, संत भाव पंढरीत, अबीर गुलाल उधळीत रंग...अब कृपा करो श्रीराम .. मैफिलीची सांगता भैरवी मध्ये - कैवल्याचा चांदण्या .. या गीताने झाली.  सर्व गीते अप्रतिम सुरात गायली गेली आणि सारे रसिक तल्लीन झाले होते. तबल्यावर श्री विशाल मोरे आणि हार्मोनियम वर श्री केळकर यांनी उत्तम साथ दिली.  आज पहाटे इतरठिकाणीपण "दिवाळी पहाट" कार्यक्रम असून सुद्धा सभागृह तुडुंब भरले होते काही रसिक बाहेर उभे राहून गाण्याचा आस्वाद घेत होते. प्रत्येक गाण्याच्या सुरेल स्वरास आणि उत्तम साजेसा ताल याना श्रोत्यांनी ऊस्फूर्त दाद दिली.  गाण्याच्या मैफिलीनंतर सारेच नि:शब्द अश्या शब्दा...

गणपतीपुळे प्रवास - 2 - "कविवर्य केशवसुत स्मारक"

Image
  नुकताच आम्ही गणपतीपुळे, पावस,रत्नागिरी,गुहागर, हेदवी,वेळणेश्वर दौरा करून आलो. गणपतीपुळे जवळ मालगुंड गावातील "कविवर्य केशवसुत स्मारक" यास भेट देण्याचा योग आला. कोकण मराठी साहित्य परिषद यांनी कवी केशवसुत यांचे स्मारक उभे केले आहे. बाजूलाच केशवसुत जेथे जन्मले ते जुने कौलारू घरही आहे. स्मारक वास्तूत दोन मोठी दालने - एकामध्ये ग्रंथालय, वाचनालय अभ्यासिका तर दुसऱ्या दालनात केशवसुतोत्तर महत्वाच्या मराठी कवितांचे आधुनिक मराठी काव्य संपदा - अल्पपरिचय आणि गाजलेल्या कविता प्रदर्शित केल्या आहेत. केशवसुत यांच्या कविता एक भागात आहेत.  या कविता आणि इतर दालने पाहून मनास आनंद झाला. स्मारक वस्तू अतिशय देखणी आणि भव्य आहे. केशवसुत स्मारक म्हणजे मराठी कवितेचे तीर्थक्षेत्र आहे - मालगुंड ही मराठी कवितेची राजधानी आहे - असे गौरवाने कविवर्य कुसुमाग्रज यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात (८ मे १९९४) म्हटले आहे.  मला हे स्मारक आणि आसपासचा परिसर मनास भावून गेला.  मराठी साहित्यप्रेमीनी जरूर या स्मारकास भेट द्यावी म्हणून हे लिखाण.. काही फोटो.. 

गणपतीपुळे प्रवास - १

Image
  औदुंबर ट्रॅव्हल कंपनीच्या बसने आम्ही सकाळी ९.३० वाजता गणपतीपुळे येथे पोचलो. सकाळी आवरून नास्ता करून देवदर्शनसाठी देवळात जाऊन दर्शन घेतले. बारा वाजता आरतीस हजेरी लावून देवळातच प्रसाद घेऊन रूमवर परतलो.  संध्याकाळी  समुद्रावर पाण्याच्या लाटांमध्ये आनंद घेतला. समुद्र खूप स्वच्छ आहे.  एक किलोमीटरची देवळानजीक प्रदिक्षणा पूर्ण केली.  येथे सुंदर पायऱ्या आणि आसपास झाडी आहे.  समुद्र पण दिसतो. देवळासमोर समुद्र आहे.  येथील परिसर रमणीय आणि स्वच्छ, सुंदर आहे. जवळजवळ ३५ वर्षांपूर्वी लग्नापूर्वी माझी मोठी बहीण देवरुख येथे नोकरीस असताना मी पुण्याहून देवरुख येथे गेलो होतो. तेव्हा बहिणीने मला प्रथम गणपतीपुळे दर्शन घडवले होते. मंदिरानजीक राहण्यासाठी रूम होत्या आणि रूमच्या खिडकीतून समुद्र आणि लाटा दिसत होत्या.  आता काळाच्या ओघात ती खिडकीही नाहीशी झाली आणि माझी मोठी बहीणपण मला २५ वर्षांपूर्वी सोडून गेली.  माझ्या मनाच्या खिडकीवर आठवणींच्या लाटा जोरदार आदळत होत्या आणि मनाच्या खोलीत पाणी आले होते. अर्थात वरून ती माझा whatsapp मेसेज वाचत असेलच...  असो.  गत...

मी काय वाचले -16 -आठवणी उगारच्या अर्थात सोनेरी दिवस

  नमस्कार, माझ्या सौ.च्या मावशीचे यजमान श्री प्रफुल्लराव अनिखिंडी यांनी मला श्री उमाकांत गणेश कुलकर्णी यांनी लिहिलेले "आठवणी उगारच्या अर्थात सोनेरी दिवस" हे पुस्तक वाचायला पाठवले.   पुस्तकातील - पोस्ट ऑफिस, कोजागिरी, जत्रा, श्रावण, दिवाळी, खेळ क्रिकेट, हळदीकुंकू, गिरणी, फिरणे, पोहणे, टॉकीज .. याबाबत सुंदर आठवणी लिहिल्या आहेत.  या आठवणी वाचल्यावर पन्नास वर्षापूर्वीचे सारे प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले.  विशेषतः दिवाळी मधील शिंप्याकडील कपडे शिलाई आणि गिरणीत दळप .. हे  प्रसंग मी पण अनुभवले आहेत.  छोटे छोटे प्रसंग.. आठवणी खरंच उत्तम शब्दात व्यक्त केल्या आहेत.  पूर्वी छोट्या छोट्या गोष्टीत पण खूप मजा आणि आनंद मिळायचा.  म्हणतात ना .. जुने ते सोने.. या सोनेरी आठवणींच्या पुस्तकास आपल्या बालमैत्रीणीची सुंदर प्रस्तावना लाभली आहे.  पुस्तकास आपल्या वर्गमैत्रिणीचा आशीर्वाद म्हणजे - सोनेपे सुहागा .. नाही का ... आयुष्याच्या पुस्तकात सगळ्यात जास्त आनंद देणारे पान म्हणजे बालपण  -  हे मला खूप भावून गेले. माझे बालपण चिकोडी गावात गेले. चिकोड...

Dr. Aditi Birthday Greetings

  Dear Dr. Aditi,  Many many happy returns of the day…Happy Birthday.. We all pray God to shower health, wealth and contentment in your life.  Your are Doctor ..  a noble profession ..A Doctor is treated as "God" in society.  Presently I know you are working hard and carrying out duties sincerely .. hard work and patience always pay rich dividend in future... I  rquest you to spare 10 minutes in your daily busy schedule and read 2-3 pages of Srimadbhagawad Gita - Commentary by Swami Chinmayanand - The book is available in Kannad, Marathi, English etc.  the commentary is excellent.  We can gain knowledge and it helps in our life, if we implement and co-relate to our activities.  After reading some of the chapters, I felt your profession is classic example .. where one can implement Dnyan, Karm and bhakti yog  very well.   After the operation is complete ... Dr. says .. now everything in his hands..I feel here after dnyan and kar...