"जेष्ठांचे पडणे " - Fall ... prevention and fitness in geriatric patients
२८ ऑक्टोबर २०२३ - कर्नल्स क्यूब यांनी "जेष्ठांचे पडणे " Fall ... prevention and fitness in geriatric patients या विषयावर डॉ. चेतन प्रधान यांचे भाषण आयोजित केले होते. वृद्धांचे (६५ वय ) पडणे, त्याची कारणे, त्यावर उपाय, उपचार, हाडे ठिसुळ होणे - Ostoporosis .. याबाबत सविस्तर माहिती सांगून आकडेवारी सादर केली. साठी नंतर इतर शारीरिक टेस्ट मध्ये DEXA - हाडाची टेस्ट करून घ्यावी असा सल्ला दिला. भारतात केरळ, महाराष्ट्र, वेस्ट बंगाल या राज्यात फ्रॅक्चर प्रमाण अधिक .. ८०% लोक घरात पडतात आणि ९०% बाथरूम मध्ये पडतात. पडल्यानंतर आणि ऑपेरेशन झाल्यावर आजारी रोग्यास हांथरूणातून बाहेर काढून शक्य तितक्या लवकर चालायला लावणे हा मंत्र सांगितला. व्हिटॅमिन्स, कॅल्शिअम, फिजोयेथेरपी, घरी बाथरूममध्ये घ्यावयाची काळजी, याबाबत अधिक माहिती सांगून वृद्धांच्या समस्या, याबाबत आपले अनुभव सांगितले.संचेती हॉस्पिटल मध्ये डॉ.चेतन प्रधान हे ऑर्थोपेडिक सर्जन - दिवसाला जवळजवळ ३-५ क्रिटिकल ऑपरेशन्स करतात. आपल्या क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, औषधे, विशेष काळजी विभाग, याबाबत सविस्तर माहिती...