Posts

Showing posts from April, 2023

वसुंधरा - आठवणींचा हिंदोळा वसुंधरा

Image
  ८ एप्रिल २०२३ - रविराज हॉटेल भांडारकररोड पुणे येथे अर्जुनवाडकर कुटुंबीयांचा स्नेहसोहळा कार्यक्रम आयोजित केला होता. आम्ही दोघे कार्यक्रमास गेलो होतो.  निमित्य - वसुंधरा - आठवणींचा हिंदोळा वसुंधरा     जयसिंगपूरचे प्रसिद्ध वकील आणि समाजसेवक श्री मुकुंदराव अर्जुनवाडकर यांच्या पत्नी म्हणजे सौ. वसुंधरा  आपल्या पत्नीचा प्रथम स्मृतिदिन ०१ -४ -२०२३ ... या निमित्याने जयसिंगपूर येथील त्यांच्या घराच्या गच्चीवर २० मार्च २०२३ रोजी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचा व्हिडिओ पुण्यातील नातेवाईकांना दाखवावा ..म्हणून हा स्नेहसोहळा.   कार्यक्रमाची सुरुवात श्री अच्युतकाका यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सौ. वसुंधरा यांच्या फोटोस फुल अर्पण करून झाली.  श्री अर्जुनवाडकर यांची नात ईश्वरी यांनी आजीला आवडणारी - मन मंदिरा तेजाने ... गरज गरज मेघ घन .. ही गाणी सुरेल आवाजात गायली.   नंतर प्रोजेक्टरवर व्हिडिओ दाखवला..प्रारंभी श्री मुकुंदराव अर्जुनवाडकर यांनी झोपाळयावर बसून आपल्या लग्नाची कहाणी सांगितली. नुकतंच वकिली व्यवसाय सुरुवात, कुरंदवाड सारखे खेडेगाव...

मी ... येसूवहिनी

Image
  कर्नल्स क्यूब यांनी ८ एप्रिल २०२३ रोजी - मी ... येसूवहिनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. समिधा पुणे प्रस्तुत -  येसूवाहिनी व स्वातंत्रवीर सावरकर यांच्यातील दीर-भावजयीच्या पवित्र नात्याचे बंध उलघडून दाखविणारा -   एक हृद्य सांगीतिक अभिवाचन - कार्यक्रमाची पूर्वपीठिका, कार्यक्रमाबाबत माहिती श्री दिलीप ठोसर यांनी सांगून हा कार्यक्रम -८ एप्रिल ही बंकिमचंद चॅटर्जी यांची पुण्यतिथी  -वंदे मातरम या गाण्याचे लेखक श्री बंकिमचंद चॅटर्जी  याना अपर्ण करीत आहोत असे नमूद केले.    यशोदा -  लग्न झाल्यानंतर माप ओलांडून  सावरकर यांच्या घरी आल्यानंतर संसाराची जबाबदारी पेलवणे ते आपल्या मृत्यू पर्यंतचा प्रवास... सादर केला गेला.  सासरी लक्ष्मीने पाय काढला पण सरस्वतीची उपासना निर्धार करीत सावरकरांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आपल्या आईने दिलेला मौल्यवान दागिना - नथ विकला. तात्यारावांनी येसूवहिनीना शिक्षणाचे धडे दिले. केसरी, काळ वर्तमानपत्रातील लेख वाचून दाखवले. लहान वयात - ज्ञानेश्वर आणि शिवबा यांचे आदर्श घरी होते.  चाफेकर यांचा वारसा पुढे चालवण्याचे आणि...