"स्वतंत्रते भगवती" - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त
श्री अजय धोंगडे प्रस्तुत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त "स्वतंत्रते भगवती" हा कार्यक्रम सादर करण्यात आला. पं. श्री हृदयनाथ मंगेशकर यांनी सावरकरांच्या कविता आणि गीताचे ध्वनिमुद्रण याबाबत आपल्या आठवणी सांगितल्या. श्री शरद पोंक्षे यांनी श्री सावरकरांच्या काळ्यापाण्याची शिक्षा भोगताना अंदमान येथील कारागृहातील कोठडीतील जीवन आणि राहणीमान यांचे अनुभवबाबत सांगितले . कोठडीतील दैनंदिन जीवनाबाबत सोसलेले शारीरिक हाल आणि त्रास, कविता आणि इतर कैद्याच्या बरोबर सांकेतिक भाषेत सूचना ... उपस्थित श्रोते जीवाचे कान करून ऐकत होते. सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी भोगलेल्या मानसिक, शारीरिक त्रास आणि त्याग याबाबत आपल्या भावना व्यक्त करत सावरकर विरोधक यांचा जहाल शब्दात समाचार घेतला. श्री पोंक्षे यांनी आपल्या भावना प्रक्षोभक भाषेत व्यक्त करीत काहीवेळा पुणेकरांना शाब्दिक चिमटेपण काढले. विभावरी आपटे आणि इतर गायकवृंदानी सावरकरांनी रचलेल्या कविता आणि गीत यांचे उत्तम सादरीकरण केले. श्री शंकर अभ्यंकर यांच्या अनुपस्थितीत श्री मिलिंद कुल...