स्वेच्छा निवृत्ती कार्यक्रम

 


मी आज स्वेच्छा निवृत्ती घेत आहे. मला आज कै. सुभाष सरांची आठवण येते. मला त्यांच्याबरोबर काम करत असताना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. ऑफिसमधील काम करण्याऱ्या सर्वांचे ते आपुलकीने काळजी घेत अडीअडचणीवेळी घरच्यासारखे मदत करत असत. नवनवीन  गोष्टी शिकणे, परोपकारीवृत्ती, पैश्याचा योग्य नियोजन आणि विनियोग, उत्साह.. या बाबी मला अधिक भावून गेल्या. कै. सुभाष सरांना जीवन गौरव पुरस्कार मिळाला हे अनगळ ग्रुप मध्ये काम करणारे कर्मचारी , अनगळ परिवार यांच्यासाठी अभिमानास्पद आणि कौतुकास्पद बाब.  या पुरस्कार सोहळा कार्यक्रम क्षणाचा आनंद मी कधीच विसरू शकत नाही. काय योगायोग पहा त्यांना जीवन गौरव पुरस्कार याच वास्तूत दिला गेला आणि आज निवृत्ती सोहळा पण याच वास्तूत .. मला आशीर्वाद देण्यासाठी श्री सुभाष सर येथे नक्कीच असणार यात शंका नाही... कै. सुभाष सरानानंतर - श्री दिलीप आणि श्री नितीन सर यांनी अनगळ ग्रुपचा व्यवसाय उत्तम रीतीने सांभाळला.  आता तिसरी पिढी - सोनिया मॅडम, सोहनसर - करण आणि रिया - ही तरुण मंडळी नवनवीन कल्पना आणि जोमाने अनगळ ग्रुप ची धुरा वाहत आहेत. अनगळ ग्रुप मध्ये काम करताना -  आजोबा, मुलगा आणि नातवंडे असे तीन पिढ्याचा सहवास मला लाभला.. मी खरंच भाग्यवान समजतो. ही सारी परमेश्वराची कृपा...


मी १६ वर्षे या ऑफिसमध्ये काम केले.  काम करताना मला माझ्या बरोबर काम करणारे सारे आजी आणि माजी साथीदार यांचे मला सहकार्य लाभले.  माझे सगळ्या सहकारीमंडळीबरोबर (अगदी सफाईकामगारबाई यांच्यशीपण) सलोख्याचे संबंध होते. प्रत्येकातील चांगले गुणाचे दर्शन झाले.  नेहमीच सर्वांसोबत संवाद घडे, मी सगळयांची चेष्टा-मस्करी करीत असे. कोणीही रुसले फुगले असे मला आठवत नाही.  तुम्ही सर्वानी माझ्यावर प्रेम, आपुलकी मला दिली. आपण सर्वानी अजून किमान दोन वर्षे निवृत्ती पुढे ढकला अशी जोरदार मागणी केली. आपल्या जिव्हाळापोटी मला स्वेच्छा निवृत्ती निर्णय घेणे अवघड झाले होते.  ५८ नंतर दोन वर्ष एक्स्टेंशन ..साठीनंतर .. माझा नोकरी प्रवास ६१ष्टी .. कडे  वाटचाल चालू होती.  यावेळी मनात विचार आला आता आपण नोकरीच्या गाडीस ब्रेक लावून उतरले पाहिजे.. कोठेतरी थांबले पाहिजे..डिटॅचमेंट पण हवीच आता परमार्थाच्या  गाडीत प्रवेश घ्यायला हवा. काही कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडायला हव्यात.  म्हणून ही स्वेच्छा निवृत्ती..


आपण सर्वानी  दिलेले  प्रेम, आपुलकी , जिव्हाळा मी कधीच विसरू शकत नाही. हे सारे मूल्यवान आहे. सगळ्याच गोष्टी पैश्यात मोजता येत  नाहीत.  आपले आभार कसे मानू मला कळत नाही.  या स्वेच्छानिवृत्ती कार्यक्रमा समयी हीच मला मोठी  मौल्यवान भेट आहे. 


आपणाशी संवाद साधतावेळी आणि वागताना माझ्याकडून काही कमी जास्त बोलले गेले असेल आणि आपल्या भावना दुखावल्या असतील तर माफ करावे क्षमस्व..तसेच ऑफिस काम आणि इतर कारणामुळे माझ्याकडून ऑफिस कामात काही राहून गेले असेल, चेकिंग करताना काही बाबी राहून गेल्या असतील आणि चुका झाल्या असणार यात शंका नाही... त्याबद्दल मी माफी मागतो.. Just forgive and forget ... क्षमस्व..


Behind every successful man there is a woman .... लग्नानंतर नोकरीत बदली ठिकाणी नव्या जागा, वातावरण, प्रदेश या गोष्टीबाबत adjust करणे, मुलांचे संगोपन करून शिक्षण, नोकरी आणि अनेक सांसारिक जबाबदाऱ्या हसतखेळत पार पाडत माझ्या यशात आणि संसारात सिंहाचा वाटा माझ्या सहचरणी सौ. वर्षाचा आहे यात शंका नाही..माझ्या पत्नीसमवेत माझा मुलगा श्रेयस याची मला मोलाची साथ लाभली. माझ्या पत्नीच्या आणि मुलाच्या त्यागी आणि समाधानी वृत्ती, मोलाची साथसंगत, आदरभाव यामुळे मी साठी कशी पार केली हे कळले नाही. मला लाभलेला मानसन्मान, यश .. मी कुटुंबियांच्या चरणाशी आनंदाने अर्पण करीत आहे. 


काही मदत लागली तर शक्य तितकी मी नक्की करीनच माझा  मोबाइल नंबर वर जरूर संपर्क साधावा.शेवटी निरोप घेणे हे कठीण असते .. Parting is sad हे खरे.. मी आनंदाने आपल्या सर्वांचा निरोप घेतो. सर्वाना मनापासून धन्यवाद आणि आभार .. Thank you  and Goodbye 


चंद्रशेखर मधुकर कुलकर्णी - ३१ जानेवारी २०२५.



Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा