सौ. शुभांगी कोपरकर यांचा स्वरचित कविता वाचनाचा "काव्यछंद"
२६ जुलै २०२५ -कर्नल्स क्यूब संस्थेने सौ. शुभांगी कोपरकर यांचा स्वरचित कविता वाचनाचा "काव्यछंद" कार्यक्रम आयोजित केला होता. स्नेहालय स्नेहाधार - या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्या कविता रचणे आणि स्वरचित कविता वाचन करणे हा छंद याबाबत ओळख सौ. साधना डांगी यांनी करून देत त्यांचे स्वागत केले. सुरुवातीस वृत्त आणि त्यांचे प्रकार - अक्षरगण आणि मात्रावृत्त - ह्र्स्व आणि दीर्घ - याबाबत अधिक माहिती सांगितली. पाऊस, रानवाट, श्रावण, गोकुळात रास रंगला, प्राणियिनीची भावना, पाऊसाची साद, श्रोत्यांना आर्जव, गावातला जुना वाडा खंतावला, जीवनाचे सिहावलोकन, वीरगाथा, दोन योगी - हिमालय आणि सागर - साठीनंतर मी काय - आपल्याला काय वाटते - स्पर्शभुल, निसर्गसखा आणि मी, सांजवेळी - किती पावसाळे उन्हाळे, अश्या जवळजवळ सोळा स्वरचित कविता सादर केल्या. प्रत्येक कविता सादर करताना त्यामागची पार्श्वभूमी कथन केली. कार्यक्रमाची सांगता कारगिल विजयदिनानिमित्य लहान मुलासाठी प्रेरणादायी कारगिल कथा या कविता वाचनाने झाली. शेवटी सर्वानी दोन मिनिट मौन पाळून वीरांना सलाम श्रद्धांजली वाहिली. आपल्या सामान्यांच्या जीवनातील वेगवेगळ्या टप्पावरील भावना आणि प्रसंगारूप कविता वाचन वेळी साऱ्या रसिक श्रोत्यांनी उस्फुर्त दाद दिली.
आपल्याला आवडलेल्या कविता यांचा विशेष उल्लेख करीत आणि पावसाचे सावट असताना कार्यक्रमास हजर राहल्याबाबत सौ. विनिता फुले यांनी साऱ्या श्रोत्यांचे आभार मानले. श्रावण महिना - बाहेर पावसाळी वातावरण आणि सभागृहात कवितांचा धारा बरसत होत्या.. श्रोतृगण चिंब भिजलेले - आल्हाददायी वातावरण अनुभवले. सौ. शुभांगी कोपरकर यांची स्वरचित कवितेची "साधना" सफळ झाली. मनापासून कर्नल्स क्यूब संस्थेचे आभार - चंद्रशेखर मधुकर कुलकर्णी कोथरूड पुणे
Comments
Post a Comment