Posts

Showing posts from October, 2022

आठवणीतील शांताबाई - कार्यक्रम

Image
  ९ ऑक्टोबर २०२२ - "आठवणीतील शांताबाई" - शांताबाई शेळके यांनी लिहिलेल्या मराठी गाण्याचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित केला होता. जय शारदे .., ही वाट दूर जाते,, तोच चंद्रमा नभात.. काटा रुते .. दाटुनी कंठ येतो.. हा माझा मार्ग ऐकला, निळ्या आकाशी.. शूर आम्ही.. कर्नाटकी कशिदा. हात लावू नका माझ्या साडीला.. ही गाजलेली गाणी चैत्राली अभ्यंकर, वाळुंजकर, संजीव मेहेंदळे  या गायकांनी गायली.  सर्वच गीते अत्यंत श्रवणीय होती. कार्यक्रमामध्ये शांताबाई शेळके यांच्या जन्म शताब्दी सोहळा निमित्य शांताबाई शेळके प्रथम पुरस्कार श्री गुरु ठाकूर याना डॉ. अरुण ढेरे यांच्या हस्ते दिला गेला. यावेळी श्री गुरु ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. प्रवीण दवणे यांनी उत्तम भाषण केले.  भाषणात शांताबाई शेळके यांच्या काही आठवणी वेळातवेळ काढून कथन करीत पुणेकरांना चिमटे काढले.  प्रा. मिलिंद जोशी यांनी आपल्या भाषणात पुणेकरांची बाजू मांडली.  डॉ.अरुण ढेरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  सौ. मेधा कुलकर्णी यांनीपण या कार्यक्रम आणि पुरस्कार बाबत आपले विचार मांडले.  सर्व ...

काका घाटपांडे एक पहाडी व्यक्तिमत्व

  माझी मोठी बहीण सुलभा लग्नानंतर श्री घाटपांडे यांच्या घरी गेली. श्री घाटपांडे यांचा नारायणपेठ माती गणपतीजवळ मोठा वाडा. लग्नानंतर काही दिवस मुंबईस घाटकोपर येथे होती. ती जेव्हा पुण्यास येई तेव्हा मी नारायणपेठेत तीला भेटायला जात असे. तिचे सासरेबुवा हे नेहमी हॉलमधील कोचावर बसलेले असत. ते घाटपांडे कुटुंबाचे कर्ता आणि सर्वेसर्वा होते. थोडे कडक व्यक्तिमत्व. अर्थात पूर्वीची माणसे कडक करारी असत. त्यांच्या स्वभावामुळे काहीजण त्यांच्याशी बोलावयास घाबरत. त्यांना सर्वजण काका म्हणत. प्रथम जुजुबी ओळख झाली. बँकेत असताना माझी लक्ष्मीरोड गोखले हॉल नजीक ऑफिसमध्ये बदली झाली. आणि मी घाटपांडे वाड्यानजीक आलो. त्यावेळी माझे लग्न झाले नव्हते. तेव्हा बहिणीच्या आग्रहाखातर मी कधीकधी बहिणीकडे दुपारी जेवण संध्यकाळी चहासाठी जात होतो. घरगुती समारंभ आणि सणास हजेरी असायची. हळूहळू राजकारण क्रिकेट खेळ वैगैरे गप्पा मारीत मारीत आमचे काकांशी सूत जमले. राजकारणावर आमच्या गप्पा होत. त्यावेळी वर्तमानपत्र वाचन श्री व्ही. पी सिंग यांचे मंडल कमिशन  राजकारण विषय खूपच गाजला होता. त्यावेळी इंडियन एक्सप्रेस वर्तपणपत्रात श्री...

मी काय वाचले - 13

Image
  आमच्या घरी गणपती बाप्पा दर्शनासाठी आमच्या सोसायटीमध्ये राहणारी मैत्रीण आल्या होत्या. त्यांच्याकडे असलेले एक पुस्तक वाचायला दिले. हे पुस्तक तुम्हाला आवडेल. "मुलाखती तेव्हाच्या" लेखिका सौ प्रियंवदा करंडे. या पुस्तकात लेखिकीने विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीच्या 1987 पासून ते 2015 पर्यंतच्या  25 मुलाखतीचा समावेश केला आहे.  साहित्य,संगीत,न्याय, अध्यात्म, विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, पत्रकार, खेळ, अभिनय, योग,कवी... मुलाखत घेणे आणि मोजक्या शब्दात लिहणे हे खरे कौशल्य आहे.  सर्व मुलाखती सुंदर आहेत आणि वाचनीय 👌आहेत.  विविध क्षेत्रातील उच्चपदस्थ व्यक्तींना भेटणे, त्यांच्याशी गप्पा होणे त्यांचे विचार वाचका पर्यंत पोचवणे...खरच याला भाग्य लागते..लेखिकेचे कौतुक आणि मनापासून आभार..धन्यवाद ..🙏🙏 पुस्तक संग्रही ठेवण्यासारखे आहे..

तबला - संतूर -वादन कार्यक्रम

Image
  २५ जून - Rithwik Foundation for performing arts यांच्यावतीने पंडित सतीश व्यास - संतूर वादन आणि ओजस अधिया - तबला वादन कार्यक्रम आयोजित केला होता. प्रथम पंडित व्यास यांनी आपले गुरु पंडित शिवकुमार शर्मा  यांना आदरांजली वाहिली.  वादन कार्यक्रमापूर्वी पंडित सतीश व्यास यांच्याबरोबर संवाद झाला.  वयाच्या १३ वर्षी पंडित शिवकुमार यांची भेट घडून संतूर वादन शिकवणी सुरु झाली.  गुरूंनी काश्मीर वरून मागवलेली संतूर मुंबईस यायला ६ महिने लागले. गुरूंनी दिलेली संतूर आजतागायत वाजवत आहेत. ४७ वर्षे गुरूंचा सहवास लाभला. पंडित शिवकुमार शर्मा हे अत्यंत "अध्यात्मिक व्यक्तिमत्व " -  देशात अगर परदेशी प्रवास अगर कोणतीही परिस्थिती असली तरी शिवकुमार खूप शांत असायचे.  आपल्याला हे शांत राहणे खूप कठीण.  श्री चिंतामण व्यास यासारखे पिता आणि पंडित शिवकुमार शर्मा यांच्यासारखे गुरु - या दोन महान आध्यत्मिक व्यक्ती जीवनात लाभल्या - ही पूर्वजन्माची पुण्याई अशी कबुली पंडित सतीश व्यास यांनी दिली.  श्री ओजस अधिया हे तरुण तबलजी यांनी त्यांना साथ दिली. दोघांची जुगलबंदी आणि वादन उत्तम आण...