प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समिती पुणे यांच्यातर्फे पुरस्कार आणि सम्मान डॉ.शंकर अभ्यंकर
15 जुलै २०२५ - प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समिती पुणे यांच्यातर्फे पुरस्कार आणि सम्मान डॉ.शंकर अभ्यंकर यांना मूर्तिशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांचा हस्ते दिला गेला. हा कार्यक्रम एस एम जोशी सभागृह येथे आयोजित केला होता. श्रवण संस्कृती प्रसार बाबत वसंत व्याख्यानमालेचे आयोजक श्री रवींद्र माळवदकर यांचाही सत्कार करण्यात आला. प्राचार्य शिवजीराव भोसले यांनी महाराष्ट्राला ऐकायला शिकवले. अफाट वाचन, चिंतन आणि मनन यांनी व्याख्यानाचा बाज निर्माण केला होता. बुद्धीची सखोलता, वाणीची निर्मळता, आणि प्रज्ञेची अथांगता म्हणजे शिवाजीराव भोसले असे उदगार डॉ. शंकर अभ्यंकर यांनी व्यक्त केले. प्राचार्यानी अनेक विषयावर भरपूर व्याख्याने देऊन सर्वाना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक भाषणात तुकोबा यांचे वचन असायचे. प्राचार्यांचा आवाज कधीच चढला आहे आणि ते कधीच रागावले नाहीत. बहुश्रुत, श्रवण, धारण, स्मरण, चिंतन, उहापोह, अर्थांतर, आचरण या अष्टांग शिवाजीराव भोसले यांनी उत्तम कामगिरी करून व्याख्याने समृद्ध केली. महाराष्ट्राचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले.या पुण्यात या कार्यक्रमासाठी खूपच कमी उपस्थिती पाहून डॉ. शंकर अभ्यंकर यांनी खंत व्यक्त केली.
यावेळी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी पूर्वी आपल्या भाषणात डॉ. शंकर अभ्यंकर यांचं कौतुकाबाबत एक ध्वनिफीत दाखवली गेली. कार्यक्रमात प्रो.मिलिंद जोशी, रवी माळवदकर, डॉ. देगलूकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया देसाई यांनी केले. कार्यक्रम खूप छान झाला.
मी प्रथम दगडूशेट गणपती उत्सवानिमित्य प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची ५५ दिवसाची व्याख्यानमाला सप्टेंबर १९९२ मध्ये ऐकली ५५ दिवसाच्या व्याख्यानमालेत तास ते दीड तास भर दरम्यान मला एकदाही जांभई आली नाही. हे विशेष नाही का .. आणि त्यानंतर त्यांचे प्रत्येक व्याख्यान जमेल तसे न चुकता प्रत्येक सभेस हजेरी लावू लागलो. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जीभेवर सरस्वती नाचते असे म्हटले जाते ते साक्षात अनुभवले. पुण्यात त्यांची अनेक व्याख्याने श्रवण करण्याचा मला योग आला आणि श्रवणभक्तीचा आनंद मिळाला. खरचं मी भाग्यवान. मी त्यांचा चाहता आहे. त्यांचे ऑडिओ पण ऐकले आहे. त्यांचे सकाळमधील लिखाण कात्रणे यांचापण संग्रह आहे. १५ जुलै हा त्यांचा स्मृतिदिन त्या थोर सरस्वतीपुत्रास मनापासून साष्टांग नमस्कार..
Comments
Post a Comment