Posts

Showing posts from August, 2021

मी काय वाचले -10

Image
  "मला गीता कळायला हवी"  ले. उर्मी उदय निवर्गी या पुस्तकास डॉ रश्मी भरत घोलप यांची प्रस्तावना आहे.  प्रस्तावनेत त्या म्हणतात - श्रीमद भगवद गीतेतील सर्व अध्यायांचे स्तर सोप्या, सुलभ शब्दात, ओघवत्या भाषेत एक ठायी  समाविष्ट झालेले सुंदरसे पुस्तक म्हणजे ... "मला गीता कळायला हवी" !  मनोगतात लेखिका म्हणते आज लोक निराश होऊन जगण्याची आस हरवून बसत आहेत यातून बाहेर पडायला आपल्या धर्मग्रंथाचाच अभ्यास करायला हवा. तरच मनाची सकारात्मक ताकद वाढेल .. जगणं म्हणजे नक्की काय हे कळेल.  मी कसं जगायला हवंय आणि का हे या पुस्तकातून समजावले आहे. अगदी रोजच्या दैनिंदिन व्यवहारातील दाखले, उदाहरणे देऊन समजावले आहेत.  पुस्तकातील सर्व चोवीस प्रकरणे म्हणजे गीतेतील क्रमाने येणारे अध्यायच आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी याचा एक तृतीयांश सारांश उर्मीताईंनी स्वरचित काव्यातून मांडलेला आहे. पुस्तकातील शेवटची प्रकरणे आहेत ..मी गीता कधी शिकायची ?... मी गीता शिकल्याने काय मिळेल, कसे मिळेल .. अर्थात हीच पुस्तकाची फलश्रुती आहे.  खरंच प्रत्येकाने गीता वाचावी. सुखी समाधानी जीवन जगायचे असेल ...

मी काय वाचले - 9

Image
  धनंजय जोशी यांनी शिकागोतील वास्तवात भारतातून, थायलंड आणि दक्षिण कोरियातून अमेरिकेत आलेल्या बौद्ध गुरूंच्या मार्गदर्शनाखाली विपस्यना आणि झेन मेडिटेशन या दोन अध्यात्म परंपरेची साधना केली. शिकागोमध्ये "शिकागो मेडिटेशन सेन्टर" ची स्थापना केली. या पुस्तकात त्यांचे अनुभव आणि आठवणी व्यक्त केल्या आहेत.  या पुस्तकातील - चार मंत्र, मनाचे खेळ, एक नवीन मंत्र हा भाग आवडला.  चार मंत्र - १) Don 't  make anything - जस असेल तसे पहा.  तुम्ही त्याच्यात आपलं तिखट मीठ घालू नका. make anything म्हणजे मनाच्या खेळाबध्दल.  (२) Don 't check  - चेक म्हणजे काय ? तर आपण जे जे काही अनुभवतो त्यावर "हे बरोबर नाही", "हे ठीक नाही" ही व्यक्ती "जे करते आहे ते चूक आहे" असे शिक्के आपण मारत असतो.  (३) Don 't attach to anything - कशामध्ये "अडकून" राहू नये. निरपेक्ष जीवन म्हणजे Don 't  attach .  प्रेम करावं पण १००% करावं न अडकता करावं.  (४) Don 't  hold anything - आपण कितीतरी गोष्टी पकडून ठेवत असतो. आपण काय धरून असतो? आपली मत, आपल्या आवडीनिवडी, आपले अनुभव ...

श्री देवधर यांची दिलदार मैत्री

  आज मैत्री दिवस - Friendship  Day .. १ ऑगस्ट .. माझे मन कॅनरा बँकेत  LBA  Section Circle Office सायन येथे काम करत असताना दिवसात गेले. आमच्या विभागातील माझे  सारे सहकारी मित्र आणि मॆत्रिणी यांच्या एकमेकांची चेष्ठा-मस्करी, सुखसंवाद,कॅन्टीनमधील विशेष भजी यावर गप्पा मारत ताव मारणे  विभागात खूप मजा असायची.  आमच्या विभागाचे श्री देवधर साहेब हे कधीच साहेब बॉस या नात्यांनी न वागता ते नेहमीच  आम्हा सर्वांचे "मित्र" या नात्यांनी वागून त्यांनी आमच्या विभागाचे सौंदर्य वाढवले होते.  आमचा विभाग ऑफिसच्या प्रवेशद्वाराच्या अगदी उजव्या बाजूस होता.  तेव्हा येता जाता सर्वाशी ते नेहमीच हसतखेळत सर्वाशी बोलून चौकशी करत.  ऑफिसमधील अगदी पार्ट time स्टाफ पासून उच्च पदावरील वरिष्ठ (GM ) यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते.  सर्व शाखाप्रमुखाशी त्यांचे सलोख्याचे संबंध असून प्रत्येकाना अडीअडचणीमध्ये मित्रत्वाचा सल्ला देऊन योग्य ते मार्गदर्शन करीत असत यांचे दर्शन मला झाले.  काहीवेळा GM त्यांच्या टेबलापाशी आले असता ते शांतपणे उत्तर देत.  तेव्ह...

मैत्री दिन - 1

  आज मैत्री दिवस.. . माझे मन कॅनरा बँकेत  रिजनल ऑफिस (RO )काम करीत असताना दिवसाची आठवण झाली.  ऑफिस मध्ये काम करताना आमचा सहकारी मित्र मैत्रिणीचा ग्रुप छान जमला होता.  ऑफिस कामास प्राधान्य देऊन आम्ही सहकाराचे वाढदिवस, एकमेकांना ग्रीटिंग्स देऊन शुभेच्छा, खानपानात विविध खाद्य मेनू, ट्रिप्स, हुरडा पार्टी, कोजागिरी कार्यक्रमात प्रत्येकजण आपली कला सादर करीत असू. सगळे समारंभ, मासिक सभा  दरम्यान ठळक घडामोडी बाबत थोडक्यात माहिती , हिंदी दिवस .... आनंदाने मजेत साजरा करायचो.  कधी कधी क्रिकेट आणि कॅरम मॅचेस खेळांचे आयोजन असायचे. बदली निमित्य सेंड ऑफ कार्यक्रमावेळी सहकारीविषयी दोन शब्द मनोगत...एकमेकांची चेष्टा मस्करी  करीत असो   रंगपंचमी पण खेळत होतो.  एकूण आम्ही सारे कॅनबँक फॅमिली सारखे होतो.  अधूनमधून वडापाव हा पण जरूर हजर असायचा.  गरम गरम असल्यावर काहीजण दोन दोन फस्त करून काहींना फक्त मिरची शिल्लक रहायची.. गंमत असायची.   आज जवळजवळ ३१ वर्षे झाली तरी या  सुखद आठवणी अजुनी मनात घर करून आहेत.  प्रत्यक्ष संवाद जरी नसला तरी ...